S M L

हैदराबाद हिटलिस्टवर असल्याची पोलिसांना कल्पना होती !

23 फेब्रुवारीहैदराबाद हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे याची माहिती पोलिसांना होती आणि नोव्हेंबरपासून पोलिसांना अलर्ट करण्यात आलं होतं अशी कबुली हैदराबादचे पोलीस आयुक्त अनुराग शर्मा यांनी दिली. बॉम्बस्फोट रोखण्यासाठी पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण त्यात अपयश आल्याचं शर्मा यांनी म्हटलं आहे. या बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेट आणि टायमर डिव्हाईसचा वापर केल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आला असून सहा विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्फोटाच्या वेळी दिलसुखनगरमधले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते आणि त्यातल्या फूटेजचा तपास सुरू असल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटाच्या काही वेळापूर्वी हिरवी पँट घातलेली एक व्यक्ती सायकल पार्क करताना आढळून आल्याची माहिती एनआयए च्या सूत्रांनी आयबीएन-नेटवर्कला दिली. इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित अतिरेकी मकबूल, इम्राम खान, असद खान, सईद फिरोज आणि इम्रान मुस्तफा यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. पण आतापर्यंत याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2013 04:18 PM IST

हैदराबाद हिटलिस्टवर असल्याची पोलिसांना कल्पना होती !

23 फेब्रुवारी

हैदराबाद हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे याची माहिती पोलिसांना होती आणि नोव्हेंबरपासून पोलिसांना अलर्ट करण्यात आलं होतं अशी कबुली हैदराबादचे पोलीस आयुक्त अनुराग शर्मा यांनी दिली. बॉम्बस्फोट रोखण्यासाठी पोलिसांनी प्रामाणिक प्रयत्न केले. पण त्यात अपयश आल्याचं शर्मा यांनी म्हटलं आहे. या बॉम्बस्फोटात अमोनियम नायट्रेट आणि टायमर डिव्हाईसचा वापर केल्याचं त्यांनी सांगितलं. याप्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे देण्यात आला असून सहा विशेष तपास पथकांची स्थापना करण्यात आली आहे. स्फोटाच्या वेळी दिलसुखनगरमधले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू होते आणि त्यातल्या फूटेजचा तपास सुरू असल्याचं शर्मा यांनी सांगितलं आहे. दरम्यान, बॉम्बस्फोटाच्या काही वेळापूर्वी हिरवी पँट घातलेली एक व्यक्ती सायकल पार्क करताना आढळून आल्याची माहिती एनआयए च्या सूत्रांनी आयबीएन-नेटवर्कला दिली. इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित अतिरेकी मकबूल, इम्राम खान, असद खान, सईद फिरोज आणि इम्रान मुस्तफा यांची तिहार जेलमध्ये चौकशी करण्यात आली. पण आतापर्यंत याप्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2013 04:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close