S M L

पुणे मॅरेथॉन गाजवली केनियाच्या धावपटूनी

7 डिसेंबर पुणेपुण्यात 23 वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन पार पडली. पुरुषांच्या 42 किलो मीटरच्या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या नेल्सन रॉटीचनं 2 तास 17 मिनीटं वेळ नोंदवत बाजी मारली तर महिलांमध्ये केनियाच्याच कॅरोलाईन निलेलनं 1 तास 10 मिनीटं 17 सेकंद वेळ नोंदवत पहिलं स्थान पटकावलं. पुरुषांमध्ये टांझानियाच्या आन्द्रे सिल्विनी माट्यानं दुसरं तर इथियोपियाच्या गुडिसा लेमेसा अ‍ॅन्गेसानं तिसरं स्थान पटकावलं. महिलांच्या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंचं वर्चस्व राहिलं. महिलांमध्ये पहिल्या तीनही जागा केनियाच्या धावपटूंनी पटकावल्या. जगभरातील 50 हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते. 13 स्पर्धा प्रकारात या स्पर्धकांनी भाग घेतला होता. याअगोदर मुंबईवर झालेल्या अतिकेरी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. बीजिंग ऑलिम्पिकचा ब्रॉंझ मेडल विजेता विजेंदर कुमार आणि सिनेस्टार प्रियांका चोप्रानं झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात केली. त्याचबरोबर या मॅरेथॉनला सेलिब्रेटीजचीही प्रचंड उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, भारताचा अव्वल स्मिंर वीरधवल खाडे, हॉकीपटू धनराज पिल्ले, बॉलीवूड चा अभिनेता राहुल बोस आणि प्रियांका चोप्रा या सर्वांनी या मॅरेथॉनला उपस्थिती लावली. दहशतवादी हल्ल्यांची कृत्य लक्षात घेता या मॅरेथॉनला कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही पुरवण्यात आली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 09:31 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close