S M L

'भाजपचं नेतृत्व अहंकारी'

06 मार्चदिल्ली : पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भाजपावर जोरदार हल्ला चढवला. निमित्त होतं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तराचं..2004 चं भाजपचं इंडीया शायनिंग ही मोहीम सपशेल अपयशी ठरली. जनतेला उग्र प्रचार आवडत नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं. भाजपला कदाचित त्याचीच किंमत येत्या निवडणुकीत भोगावी लागेल, असा इशाराच त्यांनी दिला. जग अत्यंत गंभीर अशा आर्थिक संकटातून जात असताना भारताने सांभाळलेला प्रगतीचा दर हा निश्चीतच समाधानकारक आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. एनडीएचा 6 वर्षांचा काळ आणि युपीएचा 9 वर्षाचा काळ ह्यांची तुलना करताना आमच्या काळात विकास दर जास्त होता हे दिसून येईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं.नरेंद्र मोदींच्या सध्याच्या कॅम्पेनबद्दलही त्यांनी 'जो गरजते है वो बरसते नही' असा टोमणा मारला. अडवाणींना लोह पुरूष म्हणून भाजपने 2009 साली मैदानात उतरवलं होतं, त्याचं काय झालं तेही आपण बघितलं, असं म्हणत पंतप्रधानांनी अडवाणींनाही चिमटा काढायची संधी सोडली नाही. भाजपाने आमच्याबद्दल ज्या भाषेत प्रचार चालवला आहे, त्या पातळीवर आपण त्याला उत्तर देणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2013 04:16 PM IST

'भाजपचं नेतृत्व अहंकारी'

06 मार्च

दिल्ली : पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज भाजपावर जोरदार हल्ला चढवला. निमित्त होतं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेला उत्तराचं..2004 चं भाजपचं इंडीया शायनिंग ही मोहीम सपशेल अपयशी ठरली. जनतेला उग्र प्रचार आवडत नाही, असं पंतप्रधानांनी म्हटलं. भाजपला कदाचित त्याचीच किंमत येत्या निवडणुकीत भोगावी लागेल, असा इशाराच त्यांनी दिला. जग अत्यंत गंभीर अशा आर्थिक संकटातून जात असताना भारताने सांभाळलेला प्रगतीचा दर हा निश्चीतच समाधानकारक आहे, असंही पंतप्रधान म्हणाले. एनडीएचा 6 वर्षांचा काळ आणि युपीएचा 9 वर्षाचा काळ ह्यांची तुलना करताना आमच्या काळात विकास दर जास्त होता हे दिसून येईल असंही पंतप्रधानांनी म्हटलं.नरेंद्र मोदींच्या सध्याच्या कॅम्पेनबद्दलही त्यांनी 'जो गरजते है वो बरसते नही' असा टोमणा मारला. अडवाणींना लोह पुरूष म्हणून भाजपने 2009 साली मैदानात उतरवलं होतं, त्याचं काय झालं तेही आपण बघितलं, असं म्हणत पंतप्रधानांनी अडवाणींनाही चिमटा काढायची संधी सोडली नाही. भाजपाने आमच्याबद्दल ज्या भाषेत प्रचार चालवला आहे, त्या पातळीवर आपण त्याला उत्तर देणार नाही, असंही त्यांनी निक्षून सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2013 04:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close