S M L

हिंगोलीत दलित तरूणाची जाळून हत्या

09 मार्चहिंगोली : येथील कानरखेडामध्ये एका दलित तरुणाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. मुकबधीर असलेला 23 वर्षांचा सतीश भगत 9 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनी त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला.या प्रकरणी पोलिसांनी अट्रॉसिटी कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. पण सतीशची हत्या म्हणजे नरबळी आहे. आणि पोलिसांनी सतीशचा भाऊ सुनीललाच आरोपी करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस योग्य रितीने तपास करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर तपास योग्य दिशेनं होत असून नरबळीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, सतीशच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पंतप्रधान, गृहमंत्री, मानवाधिकार आयोग, अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 9, 2013 10:14 AM IST

हिंगोलीत दलित तरूणाची जाळून हत्या

09 मार्च

हिंगोली : येथील कानरखेडामध्ये एका दलित तरुणाची जाळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. मुकबधीर असलेला 23 वर्षांचा सतीश भगत 9 फेब्रुवारी रोजी बेपत्ता झाला होता. दोन दिवसांनी त्याचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला.या प्रकरणी पोलिसांनी अट्रॉसिटी कायद्याअंर्गत गुन्हा दाखल करून सहा आरोपींना अटक केली आहे. पण सतीशची हत्या म्हणजे नरबळी आहे. आणि पोलिसांनी सतीशचा भाऊ सुनीललाच आरोपी करण्याची धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस योग्य रितीने तपास करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तर तपास योग्य दिशेनं होत असून नरबळीचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, सतीशच्या नातेवाईकांनी याप्रकरणी पंतप्रधान, गृहमंत्री, मानवाधिकार आयोग, अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रारी केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 9, 2013 10:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close