S M L

जिओ टीव्हीनं शोधलं मोहम्मद सादीकचं घर

19 फेब्रुवारी , कराची पाकिस्तानातल्या जिओ टीव्हीनं मुंबई हल्ल्यातल्या आणखी एका अतिरेक्याचं घर शोधून काढलंय. हे घर कराचीत आहे. जिओ टीव्हीचे रिपोर्टर फहीम सिद्दिकी यांनी या घराचा शोध घेतलाय. कराचीतल्या अल फलाह भागात असलेल्या या घरात मुंबई हल्ल्यातला आणखी एक मुख्य आरोपी मोहम्मद सादीक राहत होता. या घरात सादीक जवळपास चार वर्षे राहत होता. पण त्याच्या वागण्यात कधीच संशय आढळला नाही, असं शेजार्‍यांनी सांगितलंय. याच भागात आणखी एक अतिरेकी सादीकच्या काकासोबत राहत होता. यापूर्वी अजमल कसाबची ओळख फरीदकोटमधल्या गावकर्‍यांनी पटवली होती.सादिकचा ठावठिकाणा शोधण्यासाठी जिओ टीव्हीचा रिपोर्टर कराचीतल्या या भागात येऊन पोहचला. पण, सादिकविषयी माहिती द्यायला या भागातले नागरिक कचरत होते. शेवटी एकजण भेटला . सादीक याच घरात गेल्या चार वर्षांपासून राहत असल्याची पुष्टी एका नागरिकानं दिली. पण, मंुबई हल्ल्यात त्याचा हात असेल, असं सादीकचं वागणं नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 19, 2009 04:51 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 19, 2009 04:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close