S M L

सौमित्र सेन विरोधात महाभियोग खटला चालवणार

20 फेब्रुवारी, नवी दिल्ली सुमित पांडे कोलकाता न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सौमित्र सेन यांनी 1993 मध्ये 32 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे सौमित्र सेन यांच्याविरोधात महाभियोग चालवावा, अशी राज्यसभेतल्या सर्वपक्षीय खासदारांनी अध्यक्षांकडे मागणी केली होती. आता मुख्य न्यायमूर्ती यांच्या विरोधात महाभियोग खटला चालवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. मुख्य न्यायमूर्ती यांच्या विरोधात महाभियोग खटला चालवावा ही स्वतंत्र भारताच्या इतिहासातली ही दुसरी घटना आहे. कोलकता हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सौमित्र सेन यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी राज्यसभेच्या 58 सदस्यांनी अध्यक्षांकडं याचिका दाखल केलीय. तेलगू देसम, डावे आणि संयुक्त जनता दलाच्या 58 खासदारांनी या संदर्भातल्या याचिकेवर सह्या केल्यात. बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा सेन यांच्यावर आरोप आहे. याप्र्रकरणी सेन यांना काढून टाकावं असं पत्र सरन्यायाधीश के जी बालकृष्णन यांनीही गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये पंतप्रधानांना लिहिलं होतं. न्यायाधीश सौमित्र सेन यांनी 1993 मध्ये 32 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. हाय कोर्टाच्या न्यायाधीशांना काढून टाकण्याची प्रक्रिया किचकट आहे. न्यायाधीशांना काढून टाकण्याच्या याचिकेवर राज्यसभेच्या 50 तर, लोकसभेच्या 100 खासदारांची सही आवश्यक असते. आणि ही याचिका दोन्ही सभागृहात एकाच अधिवेशनात विशेष अशा दोन तृत्यांश बहुमतानं मंजूर होणं गरजेचं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यासारख्या युपीएच्या घटक पक्षांनी डाव्या आणि भाजपच्या या महाभियोगाच्या मोहिमेत भाग घेतलाय. पण काँग्रेसनं मात्र सध्यातरी त्यापासून दूर राहणंच पसंत केलंय. राज्यसभेचे चेअरमन या घटनेवर लवकात लवकर काय तो निर्णय घेतील, असं सीपीएमचे नेते सीताराम येचुरी यांनी सांगितलंय. " कायदा त्याची भूमिका बाजावेल, असं काँग्रेचे प्रवक्ते शकील अहमद म्हणाले. " इच्छा असेल तर मार्ग हा नक्की सापडेल, असं मत भाजपचे नेते एस. एस. अहलुवालिया यांनी व्यक्त केलं आहे. संसदेचं सध्याचं अधिवेशन पुढच्या आठवड्यात संपतंय. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया आता लगेच पूर्ण होईल, ही शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्यातरी सेन यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. या निमित्तानं संसदेच्या या शेवटच्या अधिवेशनात डावे-भाजप आणि युपीएचे घटक पक्ष एकत्र आलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 20, 2009 05:07 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 20, 2009 05:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close