S M L

न्यूझीलंडविरुध्दच्या पहिल्या लढतीसाठी टीम इंडिया सज्ज

24 फेब्रुवारी20-20ची चॅम्पियन असलेली टीम इंडिया, आता सज्ज झालीय न्यूझीलंडविरुध्दच्या लढतीला. बुधवारी न्यूझीलंडबरोबर पहिली लढत होणार आहे. न्यूझीलंडला त्यांच्याच मैदानात हरवण्याचं आव्हान भारतीय टीमसमोर असणार आहे.भारताच्या 20-20मधल्या कामगिरीवर नजर टाकल्यास हे आव्हान पार करेल असंच वाटतंय. भारत आत्तापर्यंत 20-20च्या 11 मॅच खेळलाय आणि यात भारताने तब्बल 7 मॅचमध्ये विजय मिळवलाय. यात 20-20च्या पहिल्या वहिल्या वर्ल्डकपमधल्या 5 विजयांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत केवळ दोन मॅचमध्येच पराभव पत्करावा लागला आहे. टीम इंडियाचा सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू ठरलाय तो म्हणजे धडाकेबाज ओपनर गौतम गंभीर. त्याने दहा मॅचमध्ये 312 रन्स ठोकले आहेत. यात त्यानं चार हाफ सेंच्युरीजही मारल्या आहेत. गंभीरबरोबरच मिस्टर सिक्सर युवराज सिंग दुस-या नंबरवर आहे. त्यानं आठ मॅचमध्ये 211 रन्स केलेत. विशेष म्हणजे यात तब्बल 14 फोर आणि 17 सिक्स त्याच्या नावावर आहेत.बॉलिंगमध्ये आर पी सिंग आणि ऑलराऊंडर इरफान पठाण आघाडीवर आहेत. या दोघांच्याही नावावर तेरा विकेटची नोंद आहे. आर पीनं 8 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्यात. यात 13रन्समध्ये चार विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय. तर इरफान पठाणनं 11 मॅचमध्ये 13 विकेट घेतल्यात. 16 रन्समध्ये 3 विकेट घेण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.भारत आणि न्यूझीलंड फक्त एकदाच 20-20मध्ये आमने सामने आलेत. 2007 ला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या 20-20 वर्ल्ड कपमध्ये.जोहान्सबर्गमध्ये झालेल्या या मॅचमध्ये न्यूझीलंडनं भारताचा 10 रन्सनं पराभव केला होता. न्यूझीलंडच्या या विजयाचा हिरो होता चार विकेट घेणारा कॅप्टन डॅनिअल व्हिटोरी.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 24, 2009 03:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 24, 2009 03:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close