S M L

सामनामधून बाळासाहेबांनी केली मुंडेंची कानउघाडणी

25 फेब्रुवारी मुंबईसद्या शिवसेना भाजपच्या नेत्यांचं फारसं पटत नाही. शिवसेनेच्या या नाराजीचं प्रतिबिंब शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पाहायला मिळालं. सामनामधून, बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांची कानउघाडणी केली आहे. काही दिवसांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना, शरद पवारांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे नाराज झाले होते.भाजप नेत्यांच्या ह्या वर्तनाला कंटाळूनच उद्धव ठाकरे चार दिवस मुंबई बाहेर गेले होते असं म्हटलं जातंय.मुंडेंच्या ह्या सल्ल्यावर सामनाच्या संपादकीयमध्ये टीका करण्यात आली. महाराष्ट्रात सद्या सल्लागारांच पीक आलंय. तसंच आता स्वकीयांपासूनच जास्त धोका असल्याचं बाळासाहेबांनी या अग्रलेखात म्हटलंय.महाजन यांच्यावर गोळ्या झाडणारा सख्खा भाऊ होता.तेव्हा विश्वास ठेवायचा कुणावर असा सवालही त्यांनी केलाय. मुंडे यांनीही त्यांच्या अस्वस्थ काळात,दिल्लीत शरद पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. याची आठवणही बाळासाहेबांनी मुंडेंना करून दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 25, 2009 05:10 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 25, 2009 05:10 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close