S M L

कोल्हापुरात 6 हजारांहून अधिक झाडांची कत्तल

1 मार्च, कोल्हापूर प्रताप नाईक कोल्हापुरातल्या रस्ते विकास प्रकल्पामुळं शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पण हा प्रकल्प राबवताना तब्बल 6 हजारांहून अधिक झाडं तोडण्यात येणार आहेत. यावर पर्यावरण प्रेमींनी मात्र तीव्र नाराजी व्यक्त केलीये. रस्ता तयार करण्यासाठी निसर्गाची बहुमोल ठेव म्हणजेच झाडं निर्दयीपणे तोडली जातायत. यामुळं व्यस्थित झालेले निसर्ग प्रेमी केदार मुनिश्वर यांचं म्हणणं आहे की, रस्ते करताना रत्याची थोडी दिशा बदलली असती तर अनेक झाडं वाचली असती असं त्याचं मत आहे. " अन्य जर पर्यायांचा विचार केला असता तर या रस्ते प्रकल्पाअंतर्गत अणुशंघानं. तर बरीच झाडं वाचवण्यास मदत झाली असती.हा काही विचार केलेला दिसून येत नाही. त्यामुळं कायद्यामध्ये अपिलाची प्रोव्हीजन नसूनसुद्धा आम्ही एक पी.आय.एल दाखल करण्याचा निर्णय घेतलायत.या अणुशंघानं माहाराष्ट्र शासनं काहीतरी ठोस पावलं उचलेल, "असं केदार मुनिश्वर म्हणाले. एक झाड तोडल्यानंतर दुसर्‍या ठिकाणी दोन झाडं लावण्याची जबाबदारी आय.आर.बी कंपनीला देण्यात आलीये. पण कंपनीनं ती झाडं जगवलंच पाहीजे अशी अट मात्र घातलेली नाही. झाडं तोडण्याची जबाबादारी संबधीताची आहे.आणि जी झाडं लावली जाणार आहेत.रिप्लॉन्ट केले जाणार आहे. तेही जबाबदारी आय.आर.बी म्हणजे डेव्हलपर यांचीच आहे.जर त्यानी रिल्पॉन्ट केलं नाही तर आग्रीमेंट प्रमाणं पुढील कारवाई करु शकतो. पण याठिकाणी कोल्हापूर महानगरपालीका आणि एम.एस.आर.डी.सी हे दोघे सुद्धा याकडं लक्ष ठेवून आहेत, " अशी माहिती कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. कोल्हापूर महापालिकेनं हे लक्षात घेवून, रस्ते प्रकल्प करताना जास्तीत जास्त झाडं कशी वाचतील याचा विचार करायला हवा होता. पण प्रशासनानं तसं केलेलं नाही. त्यामुळं निसर्ग प्रेमीतून संताप व्यक्त होतोय.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2009 03:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2009 03:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close