S M L

अमेरिकेच्या आऊटसोर्सिंग पॉलिसीबाबात दाद मागू- प्रणव मुखर्जी

1 मार्चकाही दिवसांपूर्वी ओबामांनी आऊटसोर्सिंगवर बंधन घातली जातील असं स्पष्ट केलं होतं. ओबामांच्या या ऍन्टी-आऊटसोर्सिंग पॉलिसीला केंद्रीय वाणिज्य मंत्री कमलनाथ यांनी विरोध दर्शवला होता.आता प्रभारी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनीही ओबामांच्या या पॉलिसीवर कडक ताशेरे ओढले आहेत. तसंच अमेरिकेसाठी होणा-या भारतीयांच्या आऊटसोर्सिंगवर बंधन घालणा-या अमेरिकेच्या या भूमिकेच्या विरोधात वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनकडे दाद मागू असं मुखर्जी यांनी सांगितलं. ऍन्टी -आऊटसोर्सिंग पॉलिसी मान्य असण्याचा किंवा त्याचा विरोध करण्याचा संबंधच येत नाही, पण सध्याच्या काळात फक्त स्वत:चाच बचाव करण्याची वृत्ती टाळली पाहीजे असं मुखर्जी ओबामांच्या पॉलिसीबद्दल म्हणाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 1, 2009 08:42 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 1, 2009 08:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close