S M L

नंदुरबारमधल्या जीप अपघातात 9 जण ठार

2 मार्च नंदुरबारनंदुरबारमध्ये जीप नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात नऊजण ठार झाले आहेत. नवापूरमधल्या राळेगण शिवार इथल्या रंगावल्ली नदीत ही दुर्घटना घडली आहे. या जीपमधील ठार झालेले 9 विद्यार्थी गुजरातचे रहिवासी आहेत.पहाटे साडे चार दरम्यान ही घटना घडली. हे सगळे विद्यार्थी गुजरातमधल्या उच्छल गावातून कम्प्युटर परीक्षेसाठी चालले होते. मृतांमध्ये 6 विद्यार्थी, 2 विद्यार्थीनी आणि जीपचालकाचा समावेश आहे. पुलाचा कठडा तोडून जीप सुमारे 100 फूट नदीच्या कोरड्या भागात कोसळली. या दुर्देवी विद्यार्थ्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2009 05:41 AM IST

नंदुरबारमधल्या जीप अपघातात 9 जण ठार

2 मार्च नंदुरबार

नंदुरबारमध्ये जीप नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात नऊजण ठार झाले आहेत. नवापूरमधल्या राळेगण शिवार इथल्या रंगावल्ली नदीत ही दुर्घटना घडली आहे. या जीपमधील ठार झालेले 9 विद्यार्थी गुजरातचे रहिवासी आहेत.पहाटे साडे चार दरम्यान ही घटना घडली. हे सगळे विद्यार्थी गुजरातमधल्या उच्छल गावातून कम्प्युटर परीक्षेसाठी चालले होते. मृतांमध्ये 6 विद्यार्थी, 2 विद्यार्थीनी आणि जीपचालकाचा समावेश आहे. पुलाचा कठडा तोडून जीप सुमारे 100 फूट नदीच्या कोरड्या भागात कोसळली. या दुर्देवी विद्यार्थ्यांचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी नवापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2009 05:41 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close