S M L

एमएमआरडीएच्या पुनर्वसनात मोठ्या प्रमाणात घोळ

2 मार्च मुंबईअजित मांढरेमुंबईत मेट्रो प्रकल्पासाठी अनेक ठिकाणच्या झोपड्या आणि घरं हटवली जात आहेत. हटवण्यात आलेल्या घरांचं इतर ठिकाणी पुनर्वसनही करण्यात येतंय. पण, हे पुनर्वसन करताना एमएमआरडीनं मोठ्या प्रमाणात घोळ घातला आहे. असंच एक प्रकरण नारायण शेठ चाळीचं. मेट्रोच्या अंधेरी-घाटकोपर लिंक रोडमध्ये घाटकोपरच्या काजूटेकडी भागातील नारायण शेठ चाळीतील घरं येत होती. त्यामुळे या भागातील घरंआणि झोपड्या पाडून त्याचं पुनर्वसन कांजुरमार्गमध्ये करण्यात आलं.पण हे पुनर्वसन करताना एमएमआरडीएनं मोठ्याप्रमाणात घोळ घातला आहे. त्याच्या विरोधात इथले रहिवासी गेल्या दोन दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेत.इथले स्थानिक रहिवासी बाळू कोटावळे सांगतात, आम्ही गेली 40 वर्षे इथं राहतो तरीही आम्हाला अपात्र ठरवलंय. आता आम्ही राहायचं कुठं? तसंच श्रीधर घाडगे सांगतात, माझा आयडी क्रमांक 69 आणि त्या नंबरचं घर दिपक उतेकर नावाच्या माणसाला दिलंय. गेली 40 वर्षे मी इथं राहतोय आणि घर त्याला कसं दिलं? घरांचं पुर्नवसन करताना एमएमआरडीएनं जो घोळ घातलाय तो फक्त इथल्या 69 रूमचाच नाही तर अशा अनेक रूम आहेत. पण त्यांचा फटका फक्त इथल्या सामान्य नागरिकांना बसतोय.एक जागतिक कीर्तीचं शहर म्हणून मुंबईचा कायापालट करण्यासाठी अनेक मोठं मोठे प्रोजेक्ट मुंबईत राबवले जात आहेत. पण, हे राबवताना ह्या प्रकल्पात अनेक घोटाळे होत आहेत हे आता हळूहळू समोर येत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 2, 2009 08:59 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 2, 2009 08:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close