S M L

सायना नेहवालचं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधलं आव्हान संपुष्टात

5 मार्च भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्याच राऊंडमध्ये पराभव पत्करावा लागला. बुधवारी उशिरा झालेल्या मॅचमध्ये फ्रान्सच्या होनयान पाईने तिचा 21-15, 21-16 असा पराभव केला.ही मॅच 34 मिनिटं चालली. सायनाने पाईला लढत द्यायचा चांगला प्रयत्न केला. पण पाईच्या जोरकस स्मॅश शॉटचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. सायना खांद्याच्या दुखापतीतून नुकतीच बरी झाली आहे. या दुखापतीमुळे एक महिन्यापूर्वी झालेल्या नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही ती खेळू शकली नव्हती. याचा फटकाही सायनाला बसला. भारताचा आणखी एक खेळाडू चेतन आनंदचं आव्हानही संपुष्टात आलं आहे. इंग्लंडच्या अँड्र्यू स्मिथने त्याचा 21-6, 17-21 आणि 12-21 असा पराभव केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2009 03:18 PM IST

सायना नेहवालचं ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमधलं आव्हान संपुष्टात

5 मार्च

भारताची नंबर वन बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप स्पर्धेत पहिल्याच राऊंडमध्ये पराभव पत्करावा लागला. बुधवारी उशिरा झालेल्या मॅचमध्ये फ्रान्सच्या होनयान पाईने तिचा 21-15, 21-16 असा पराभव केला.ही मॅच 34 मिनिटं चालली. सायनाने पाईला लढत द्यायचा चांगला प्रयत्न केला. पण पाईच्या जोरकस स्मॅश शॉटचं उत्तर तिच्याकडे नव्हतं. सायना खांद्याच्या दुखापतीतून नुकतीच बरी झाली आहे. या दुखापतीमुळे एक महिन्यापूर्वी झालेल्या नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही ती खेळू शकली नव्हती. याचा फटकाही सायनाला बसला. भारताचा आणखी एक खेळाडू चेतन आनंदचं आव्हानही संपुष्टात आलं आहे. इंग्लंडच्या अँड्र्यू स्मिथने त्याचा 21-6, 17-21 आणि 12-21 असा पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2009 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close