S M L

राज्यसरकारनं व्हिडिओकॉनला दिली नवी मुंबईतली 100 हेक्टर जमीन ; स्थानिक अंधारात

6 मार्च , नवी मुंबई विनय म्हात्रे नारायण राणे आणि स्थानिक ग्रामस्थांनी विरोध करूनही राज्य सरकारने नवी मुंबईतली 100 हेक्टर जमीन व्हिडिओकॉनला दिली. ही जमीन सेझमध्ये वर्ग करण्यासाठी सिडकोने आता स्थानिक ग्रामस्थांकडून हरकती मागविल्यात. पण त्याची कल्पना खुद्द ग्रामस्थांनाच नाही. नवी मुंबईतील वहाळ, करंजाळे आणि द्रोणागीरी येथील 100 हेक्टर जमीन 300 करोड रुपयांना व्हिडिओकॉनला विकण्यात आली. हा तोट्यातला सौदा नियमात बसविण्यासाठी सिडकोला तारेवरची कसरत करावी लागतेय. रहिवाशी क्षेत्र आणि रिजनल पार्कसाठी राखीव असलेली ही जमीन सेझमध्ये वर्ग करण्यापूर्वी ग्रामस्थांच्या हरकती घेणे बंधनकारक आहे. नव्या वादाला तोंड फुटू नये यासाठी सिडकोने मागच्या दरवाज्याने हरकती जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय. " नवी मुंबई विकास आराखड्यात बदल सुचविल्यामुळे व्हिडिओकॉनची जमीन सेझमध्ये हस्तातरीत करण्यासाठी हरकती मागविण्यात आल्यात, " असं सिडकोचे आर्किटेक्चर दिलीप शेखदार यांनी सांगितलं. 100 हेक्टर जागेचे नकाशे सिडकोच्या मुख्यालयासह विभागीय कार्यालयात ठेवण्यात आलेत. आणि याविषयीच्या हरकती एक महिन्याच्या आत नोंदवायच्या आहेत.सिडकोचा आणखीन एक अजब कारभार समोर आलाय.खरं पाहिल तर जागा विकण्यापूर्वीच हरकती मागविल्या जातात. पण येथे जागा विकल्यानंतर हरकती नागविल्या जाताहेत. आणि ते ही ग्रामस्थांना अंधारात ठेवून. कोणत्याही परिस्थीत या हरकतींच्या माध्यमातून आपला विरोध ग्रामस्थ दर्शविणार आहेत. शेतकर्‍यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम आहे. गॅजेट बरोबरच ग्रामपंचायतीत प्रदर्शित करायला हव्या होत्या. मनमानी कारभार करायच होत, अशी प्रतिक्रिया राजेश गायकरसारख्या गावक-यांनी व्यक्त केली. जमीन व्हिडिओकॉनच्या घशात जाऊ नये यासाठी ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केलं होतं. पण राजकीय खेळीमुळे हे आंदोलन थंडावलं होतं. ते आता पून्हा पेटण्याची चिन्ह दिसतायत.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 6, 2009 08:29 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 6, 2009 08:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close