S M L

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर शिकतायत इंग्रजी

7 डिसेंबर, सोलापूर सिद्धार्थ गोदाम लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता 'काय बाई सांगू' या लोकनाट्यातून स्टेजवर येणार आहेत. त्यात त्या एक लावणी इंग्रजी भाषेतून गाणार आहेत. त्यासाठी त्यांनी इंग्रजीभाषा शिकायला सुरुवात केली आहे. " मी काही इंग्रजी शिकले नव्हते. लावणी इंग्रजी भाषेतून सादर करायची म्हणजे इंग्रजी यायला पाहिजे. त्यासाठी मी इंग्रजी शिकतेय, " अशी माहिती सुरेखा पुणेकर यांनी दिली. ' नटरंगी नार 'मध्ये बाईंनी नाच, गाणं आणि अदाकारी केली होती. 'काय बाई सांगू' या लोकनाट्यात बाई नाच, गाणं, संवादआणि अदाकारी अशा चारटप्यात काम करणार आहेत. त्यांनी निवडणुकांसाठी काही राजकीय पक्षही आपल्या संपर्कात असल्याचं सांगितलं आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आता लोकनाट्याची निर्मिती करीत आहेत. ' काय बाई सांगू ' हे त्याचं लोकनाट्य डिसेंबर अखेर प्रदर्शित होत आहे .येणा-या लोकसभा विधानसभेसाठी त्यांना तीन राजकीय पक्षाकडून ऑफर असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 04:52 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 04:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close