S M L

रेडिओची मल्लिका ' मलिष्का '

तुम्ही तिला रेडिओवर खूप वेळा ऐकलं असेल. तिच्या आवाजाने ' पागल ' झाला असाल. खास तिच्यासाठी म्हणून अगदी लेक्चर बंक करूनही तिचे शो ऐकले असतील. अजून नाही कळलं? मी बोलतोय आर जे मलिष्काबद्दल. युथ ट्यूबच्या या एपिसोडमध्ये आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली थेट मलिष्काकडे. नेहमी इतरांविषयी बोलणार्‍या मलिष्काला तिनं बोलतं केलं आणि तिच्याविषयी, तिच्या करियरविषयी तसंच तिच्या या जराशा ' हट के ' असणार्‍या आर जेइंग च्या अनुभवाविषयी तिच्याशी भरपूर गप्पा मारल्या.' नेहमी मी इतरांचा इंटरव्ह्यू घेते, पण आज मी चक्क इंटरव्ह्यू देणार आहे ' अशी सुरुवात करत रेडियोविषयी ती म्हणाली, ' रेडिओ हे टीव्ही आणि वर्तमानपत्राच्या मधलं माध्यम आहे. सामान्य प्रेक्षकाच्या मनात शिरून, त्यांच्यांतलंच एक बनून बोलणं, हा यशस्वी आरजेचं नेहमीचं टेक्निक आहे. कॉमन मॅनला जे बोलायचंय, ते बोलणारा आर जे हीट होतो. ' आपल्या करियरच्या सुरुवातीविषयी बोलताना ती म्हणली, ' काही ठरवून मी या क्षेत्रात आले नाही. फक्त एवढं ठरवलं होतं की माझी पर्सनॅलिटी बदलायची नाही, नाव बदलायचं नाही आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं. चांगला आर जे बनायला तुम्हाला एक पर्सनॅलिटी लागते, ती माझ्याकडे होती. मुळात मी स्वत: माझं काम खूप एन्जॉय करते, आणि त्यामुळे लोकांनाही माझा शो ऐकायला मजा येते. '' माझा शो सगळे सतत ऐकत असल्याने माझ्या आईपासून मी काहीही लपवू शकत नाही ' , असं सांगत मलिष्कानं खास आयबीएन लोकमतच्या प्रेक्षकांसाठी तिच्या कॉलेजमध्ये तिनं गायलेलं एक गाणंही म्हणून दाखवलं. मलिष्काशी भरपूर गप्पा मारल्यानंतर आमचा युथ ट्यूबचा रिपोर्टर सुकिर्त ने प्रेक्षकांना ' ज्ञान ' दिलं ते अ‍ॅक्सेसरीजबद्दल. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एक मुलगा ' अ‍ॅक्सेसरीज ' बद्दल काय सांगणार. कारण आई, बहीण, गर्लफ्रेंडबरोबर कितीही खरेदी केली तरी या क्षेत्रातलं ' मुलांचं ' ज्ञान ' म्हणजे सरड्याची धाव कुंपणापर्यंत ! पण जरा थांबा... कारण सुकिर्त बोललाय, तो ' मेल अ‍ॅक्सेसरीज ' बद्दल ! कुलाबा कॉजवेवर त्याने मेल अ‍ॅक्सेसरीजच्या लेटेस्ट ट्रेण्डबद्दल लोकांशी भरपूर गप्पा मारल्या. मार्केटमधल्या लेटेस्ट ट्रेण्ड्सची सिक्रेट्स त्याने थेट दुकानदारांकडून काढून घेतली. लॉकेट्स , चेन्स, ब्रसलेट्स, गॉगल्स बेल्ट्स या सगळ्यांविषयी त्याने भरपूर माहिती दिली. एकूणच मेल्स अ‍ॅक्सेसरीजविषयी त्याने इतकी सुंदर माहिती दिली, की निदान हा एपिसोड बघणारे आमचे मित्र नक्की स्टायलिश होणार, यात शंका नाही. यैनंतर आपण ओळख करून घेतली युवा फ्री-लान्स फोटोग्राफरश्रीपाद नाईकची.कुलाब्यामधून आमची युथ ट्यूबची टीम पोहचली ती थेट पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये. आणि फर्ग्युसनचा मूड कॅच कारयचा तर किमयापेक्षा चांगली जागा असूच शकत नाही. हे सुंदर स्ट्रक्चर म्हणजे फर्ग्युसनची जान ! लेक्चर उरकून, बंक करून, सहज म्हणून अभ्यासाला, टाइम पासला,आलेल्या मुलांबरोबर प्रियांकाने भरपूर गप्पा मारल्या. ही मुलं युथ ट्यूबवर इतकी खूश झाली की खास फर्ग्यूसनची म्हणून प्रसिद्ध असलेली जिंगलही त्यांनी युथ ट्यूबच्या प्रेक्षकांना ऐकवून दाखवली. याशिवाय किमयाच्या एका कोपर्‍यात साजरा होणारा ' बर्थडे ' पण युथ ट्यूबच्या कॅमेर्‍यात कैद झाला.पण युथ ट्यूबच्या टीमने फर्ग्युसनमध्ये फक्त टाइम पास केला नाही. युथ ट्यूबच्या या एपिसोडमध्ये आपण ओळख करून घेतली ' रेंजर्स इको क्लब ' ची. अ‍ॅड्व्हेंचर्स ट्रेकबरोबरंच कॉलेजचं कॅम्पस साफ ठेवण्याचा अनोखा उपक्रम या क्लबतर्फे राबवला जातो. हा उपक्रम राबवणार्‍या मुलांची माहिती आपण दर्शकांना करून दिली. या एपिसोडनंतर इको रेंजर्स क्लबच्या चांगल्या कामात अधिकाधिक लोक सहभागी होतील, यात शंका नाही.युथ ट्यूबच्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण काही चांगली पुस्तकं लोकांना वाचण्यासाठी सजेस्ट करतो. या एपिसोडमध्ये खास तेंडुलकरी शैलीत वास्तवाचं भान देणार्‍या विजय तेंडुलकरांचं ' सखाराम बाइंडर ' हे पुस्तक वाचावं, असं दर्शकांना सुचवलं. याशिवाय नुकातंच प्रदर्शित झालेला हिरोज हा चित्रपट ज्या पुस्तकावर आधारित आहे ते ' मोटरसायकल डायरीज ' तसंच सोपं इंग्रजी शिकवणारं ' अ‍ॅस्टेरिक्स ' हे कॉमिक पुस्तक प्रियांकानं प्रेक्षकांना सजेस्ट केलं.या एपिसोडचा व्हिडिओ तुम्हाला पहायचा असेल, तर सोबतच्या आयकॉनवर क्लिक करा. आमच्या ऑर्कुटच्या युथ ट्यूब या कम्यूनिटीवर तुम्ही आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया feedback@ibnlokmat.tv या इमेलवर पाठवू शकता. निवडक प्रतिक्रिया आमच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केल्या जातील.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2008 04:05 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2008 04:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close