S M L

कुत्र्याला वाचवण्यासाठी मुंबईकर धावले

7 डिसेंबर मुंबईमुंबईत अतीरेक्यांनी सीएसटी स्टेशनवर अंदाधुंद गोळीबार केला होता. यावेळी अतिरेक्यांची गोळी लोकांबरोबरच तिथल्या एका कुत्र्यालाही गोळी लागली होती. मुंबईकरांनी त्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी, त्याला प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आणि आज तो कुत्रा वाचला. वेटेरनरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करून त्याला आता बरं केलंय. मुंबईतल्या रस्त्यांवर लोखो कुत्रे आहेत. आणि त्या सर्वांचा त्रास होतो अशी ओरड मुंबईकर गेली कित्येक वर्ष करत आहेत. पण जेव्हा मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला, तेव्हा लोकांना वाचवण्यासाठी जसा मुंबईकर धावला होता. तसाच या हल्ल्यात जखमी झालेल्या प्राण्यांना वाचवण्यासाठीही धावला. मुंबईवर कोणतंही संकट आलं की, मुंबईकर खंबीरपणे त्या संकटाचा सामना करतो. जखमींना मदत करताना तो मागेपुढे पाहत नाही. मग तो आपल्या सारखी माणसं असोत नाहीतर कोणताही प्राणी असो. मुंबईवर आलेल्या संकटांच्यावेळी मुंबईकरांनी त्यांचं स्पिरिट नेहमीच दाखवलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 7, 2008 07:36 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2008 07:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close