S M L

मल्लखांब एक आव्हान

बालदिनाचं औचित्य साधून 'सलाम महाराष्ट्रात' बोलावलं होतं मल्लखांबपटू पूनम सुर्वे आणि 'श्वास'मुळे घरोघरी पोहोचलेला बालकलाकार अश्विन चितळे या दोघांना. पूनम सुर्वेला नुकतंच राज्यस्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालेलं आहे. "पहिल्यांदाच असं झालंय की मी विभागातून, शहारातून आणि राज्यांतून पहिली आले आहे. मी 10 वर्षं सातत्याने मल्लखांबचा सराव करतेय त्याचं चीज झालंय, असं मला वाटतंय.पण अजून मला खूप मजल मारायची आहे," पूनम आत्मविश्वासपूर्वक बोलत होती. वयाच्या पाचव्या वर्षांपासून पूनम मल्लखांब खेळत आहे. मल्लखांबला लागणारी एकाग्रता, शरीराचा तोल याचं महत्त्व तिला कळलं आहे. त्या दोन गोष्टी कळल्या की मल्लखांब खेळणं अधिक सोपं जातं, असंही ती म्हणाली. पूनमने दोरीचा मल्लखांब, बाटली मल्लखांब, पुरलेला मल्लखांब, निराधार मल्लखांब, टांगता मल्लखांब असे मल्लखांबचे निरनिराळे आणि वैशिष्ट्य यांची माहिती दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 14, 2008 08:02 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 14, 2008 08:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close