S M L

उच्चशिक्षण @ UK (भाग 1)

परदेशात शिक्षणासाठी जाण्याकरता विद्यार्थ्यांची धडपड चालू असते. परदेशी शिक्षणाला पर्याय म्हणजे युके किंवा युएस. त्यातलं युके म्हणजे ब्रिटन आणि युएस म्हणजे अमेरिका. युएसमधल्या शिक्षणाच्या संधी सगळ्यांना ठाऊक आहेत. पण युकेमधल्या फाराशा नाहीत. उच्च शिक्षणासाठी जास्त खर्च करून परदेशी जायला हे विद्यार्थी जास्त उत्सुक असतात, पण हे जाणं कितपत सोपं आहे किंवा याच्यासाठी काय काय मदत लागते, युकेमध्ये शिक्षण घेतल्यावर काय काय संधी उपलब्ध होतात याबाबत 'टेक ऑफ'मध्ये मार्गदर्शन करण्यात आलं. हे मार्गदर्शन युके शिक्षण सल्लागार निशिकांत कोठीकर आणि ब्रिटिश काउन्सिलच्या एज्युकेशन हेड सुचिता गोकर्ण यांनी केलं.परदेशी शिक्षणासाठी दरवर्षी निरनिराळी मार्गदर्शक शिबिरं भरतात. या शिबिरांचं वैशिष्ट्य काय असतं?सुचिता गोकर्ण - परदेशी शिक्षण आणि तिथल्या शिक्षणाच्या संधी यांवर मार्गदर्शन करण्यासाठी भारतात जी शिबिरं भरतात, त्यांत परदेशात शिक्षण देणा-या निरनिराळ्या शिक्षण संस्थाचे प्रतिनिधी येतात. ते विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण, तिथल्या शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती या शिक्षणाचा आपल्या मायदेशासाठी कसा उपयोग करून घेता येईल यावर मार्गदर्शन करतात. 15 आणि 16 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत 'युके एज्युकेशन फेअर' भरलं आहे. हे परदेशी शिक्षण प्रदर्शन भारतातल्या सात शहरांमध्ये भरणार आहे. मुंबईमधल्या या प्रदर्शनाचं वैशिष्ट्यं म्हणजे त्यात 58 युकेमधल्या युनिव्हर्सिटीज आल्या आहेत. या शिक्षणसंस्था, विद्यापीठं टुरिस्ट, आर्ट, अ‍ॅडव्हेंचर स्पोर्टस् अशा व्हरायटी कोर्सेसबरोबर काय मॅनेजमेंट आणि टेक्निकल कोर्स ऑफर करताता याचीही माहिती देणार आहेत. म्हणजे युकेमधील शिक्षणाबद्दलची ही सगळी माहिती एकाच छताखाली मिळणार आहे. पूर्वी परदेशी शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी तिथेच नोकरी करण्याची योजना फक्त स्कॉटलण्डपुरती मर्यादित होती. पण आता त्या योजनेचा विस्तार संपूर्ण जगभरात झाला आहे. त्यामुळे युकेमध्ये विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना तिथे दोन वर्षं नोकरी करण्याची संधीही मिळणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना आता इंटरनॅशन एक्स्पोजर आणि परदेशी काम करण्याची संधी असा दुहेरी फायदा होणार आहे. तर अशा अनोख्या योजनेविषयीची माहिती 'युके एज्युकेशन फेअर' या प्रदर्शनात दिली जाणार आहे. युकेतल्या शिक्षणाबाबतचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो तो तिथलं विद्यापीठ निवडण्याचा. आणि त्या विद्यापीठाच्या अनुषंगाने अभ्यासक्रम निवडण्याचा.तर अशावेळी विद्यार्थ्यांनी काय करावं आणि काय करू नये?निशिकांत कोठीकर - अमेरिकेतल्या विद्यापीठांबाबत भारतात जेवढी माहिती उपलब्ध आहे तितकी माहिती युकेच्या विद्यापीठांबाबत भारतात उपलब्ध नाहीये. त्यामुळे युकेतल्या विद्यापीठांबाबात माहिती मिळवणं फार महत्त्वाचं असतं आणि ते प्रत्येक विद्यार्थ्याने जातीने करायला पाहिजे. दुसरं म्हणजे विद्यार्थी युकेत जाऊन ज्या परदेशी शिक्षणसंस्थेत आपलं शिक्षण पूर्ण करणार आहे त्या अभ्यासक्रमासाठी साधारण काय खर्च येईल त्याची अचुक माहिती काढायला हवी. कारण आपण जरी रुपयांमध्ये जास्त कमवत असलो तरी पौंडमध्ये ते कमी होतात. त्यामुळे आधा शैक्षणिक खर्चाचा अंदाज विद्यार्थ्यांनी घ्यायलाच हवा. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला परदेशात जाऊन ज्या शैक्षणिक क्षेत्रातून उच्चशिक्षण घ्यायचं असेल ज्या विषयांतून घ्यायचं असेल त्याविषयाच्या संधी तिथे उपलब्ध आहेत का हे पहायला पाहिजे. जर तुम्हाला तिथे शिक्षण घेऊन नोकरी करायची असेल तर तिथे त्या प्रकारची नोकरी उपलब्ध आहे का हे सर्वात आधी पाहिलं पाहिजे. नाहीतर काय होतं की तुम्ही जर तिथे जाऊन उच्चशिक्षण घेऊन भारतात परतलात तर तुमचा केलेला खर्च वाया जातो. भारतातल्या मुलांना तिथल्या लाईफ स्टाईलची ओळख होणं हे फार गरजेचं आहे. तुम्ही ती कशा प्रकारे करून देता?सुचिता गोकर्ण - जेव्हा विद्यार्थी परदेशात जातात तेव्हा त्यांनी तिथली जीवनशैली कशी असते याबद्दल प्रचंड उत्सुकता असते. आणि ते असणं स्वाभाविकच आहे. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांसाठी मॉक बेडरूमचं आयोजन करतो. मॉक बेडरूम म्हणजे युकेला शिक्षणासाठी गेल्यावर विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी हॉल रेसिडण्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी कायकाय सुविधा असतात हेही सांगतो. यावर मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठांचे प्रतिनिधीही आमच्याकडे येतात. विद्यार्थ्यांनी तिथल्या खाजगी संस्थांतून शिक्षण घेतलं तर त्यांची जीवनशैली असते हेही सांगतो. आम्ही जे 'युके एज्युकेशन फेअर' नावाचं प्रदर्शन भरवलं आहे त्यात आम्ही याच्यावर एक स्पेशल सेल उभा केला आहे. तिथे आम्ही मॉक बेडरु म तयार केला आहे. ज्यातून युकेत सध्या रहात असलेले विद्यार्थीच इथल्या विद्यार्थ्यांना जीवनशैली कशी असणार आहे यावर माहिती देणार आहेत. आम्ही युकेतल्या शिक्षणावर निरनिराळी प्रदर्शनं भरवतो. ब्रिटिश कौन्सिलनरिमन पॉइंट,मुंबई- 400 021फोन-022 22823560www.britishcouncil.orgएडव्हाइज ओव्हरसीज एज्युकेशन कन्सल्टन्टधोबी तलाव,मुंबई -400 002फोन-022 4081 3333 / 2200 3338वेबसाईट-www.edwiseinternational.comजीबी एज्युकेशन प्रायव्हेट लि.चर्चगेट, मुंबई, पुणे,अहमदाबाद, कोल्हापुर, भोपाळ, नागपूरफोन- 022 2282 6667/8 इ मेल-info@geebeeworld.com mailto:info@geebeeworld.comयुकेतल्या शिक्षणासाठी द्याव्या लागणा-या परीक्षाइंग्लिश भाषेसाठी-IELTSइंटरनॅशनल इंग्लिश लॅग्वेज टेस्टिंग सिस्टीम.TOEFL-टेस्ट ऑफ इंग्लिश अ‍ॅज फॉरीन लॅग्वेज.मॅनेजमेंटच्या कोर्सेससाठी GMAT द्यावी लागते.अंडर ग्रॅज्युएट, ग्रॅज्युएट,पीएच.डी. कोर्सेस करता येतात सात विद्यापीठांत अप्लाय करण्यासाठी साधारण खर्च 50 हजार रूपये.यात परीक्षा फी,अर्जाची फी,कम्युनिकेशन आणि मेलिंग फी असते.युकेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबर अखेरीस होते.युकेमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात सप्टेंबर अखेरीस होते.अंडर ग्रॅज्युएट कोर्सेससाठी UCAS तर्फे अर्ज स्वीकारले जातात. पदव्युत्तर कोर्सेससाठी ऑक्सफर्ड,केंब्रीज,लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यासारख्या संस्थांची प्रवेश परीक्षा असते. महत्त्वाच्या वेबसाईटएज्युकेशन युकेwww.educationuk.orgब्रिटिश कौन्सिलwww.britishcouncil.orgयुके व्हिसा एम्बसीज डिरेक्टरीwww.fco.gov.ukयुकेमध्ये काम करतानाwww.workingintheuk.gov.ukप्रवासासंबंधी माहितीcustoms.hmrc.gov.ukयुकेमध्ये राहण्यासाठी www.push.co.uk/livingcostsmap

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 15, 2008 03:42 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 15, 2008 03:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close