S M L

' द हॉलिवुड रिपोर्टर ' यादीत ओप्रा विनफ्रे

8 डिसेंबर, मुंबई मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या 100 पॉवरफुल महिलांची 'द हॉलिवुड रिपोर्टर' नावानं यादी बनवण्यात येते. मानाच्या समजल्या जाणार्‍या या यादीत यावर्षी प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन सूत्रसंचालिका ओप्रा विनफ्रे हिनं पहिलं स्थान पटकावलं आहे. याच यादीमध्ये विनफ्रे गेल्यावर्षापर्यंत सहाव्या स्थानावर होती. पण यावर्षी मात्र तिने पहिलं स्थान पटकावलंय. या शर्यतीत तिने अनेक दिग्गज महिलांना मागे टाकलंय, हे विशेष. तिच्यानंतर डिस्ने- ABC टेलिव्हिजन ग्रुपच्या अध्यक्षा अ‍ॅने स्वीनी यांचा दुसर्‍या स्थानावर तर तिसर्‍या स्थानावर सोनी पिक्चर्सच्या चेअरमन अ‍ॅमी पास्कल यांचा नंबर लागलाय. " गेली 20 वर्षं जे मी करत आले आहे तेच मी आताही करत आहे. जर तुम्ही स्वत:च्या कामाशी आणि स्वतःशी प्रामाणिक असाल तर कोणीच तुमच्यावर वरचढ ठरु शकत नाही, या विचारानं जगत आल्याचं प्रामाणिक मत विनफ्रेनं यावेळी व्यक्त केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 8, 2008 11:49 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2008 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close