S M L

'एमआयटी' मध्ये फूल टू धमाल

युथ ट्यूबच्या या भागात आमची रिपोर्टर प्रियांका पोहचली थेट पुण्याच्या एमआयटी कॉलेजमध्ये. इंग्जिनिअरिंग, जर्नलिझम, स्कूल ऑफ बिझनेस, टेलिकम्युनिकेशन अशा सगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम इथे एकाच कॅम्पसमध्ये चालवले जातात. आणि मग एवढ्या वेगवेगळ्या स्ट्रीम्सच्या मुलांना आपण भेटलो तर धम्माल, मस्ती, मज्जा येणारचं. एमआयटीला येऊन अण्णाच्या टपरीमध्ये आणि दुर्गामध्ये गेलो नाहीत तर अर्ध आयुष्य वाया ! आणि अर्थातच आम्ही ही सुवर्णसंधी सोडली नाही. म्हणजे अण्णाच्या टपरीवरचा चहा, फ्राईडराईस आणि दुर्गाची कोल्डकॉफी पिण्याची आणि ते ऑन कॅमेरा दाखवून प्रेक्षकांना जळवण्याची देखील! या भागात खास युथ ट्यूबच्या प्रेक्षकांसाठी अण्णाच्या टपरीवर रचलेलं स्पेशल गाणंही एमआयटीच्या मुलांनी गाऊन दाखवलं. एमआयटी कॉलेजमधल्या वेगवेगळ्या मुलांशी या भागात खूप सार्‍या गप्पा मारल्या, मस्ती केली. मार्केटिंगच्या मुलांनी खास युथ ट्यूबसाठी एक अ‍ॅडही तयार केली. ती पण कसली ? करा करा विचार करा... अरे कितीही विचार केला तरी नाहीच सुचणार! कारण खास युथ ट्यूबच्या 'सुपीक ' डोक्यातून निघालेली हा अ‍ॅड होती कुत्र्यांच्या डायपर्सची! युथ ट्यूबच्या टीमनं एमआयटीमध्ये केलेली ही फूल टू धमाल तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर पाहू शकता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 22, 2008 03:29 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 22, 2008 03:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close