S M L

इकॉनॉमिक्समधलं करियर - भाग 1

कधी काळी करियर म्हणलं की इंजिनियरिंग किंवा मेडिकल याच क्षेत्रांचा विचार केला जायचा. आताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. पण त्यातही झटपट नोकरी आणि चांगलं पॅकेज मिळवून देणारी एमबीए ही आणखीन एक डिग्री वाढलीय. पण यापलिकडेही बरीच अशी क्षेत्र आहेत जिथे खूप चांगल्या करियरच्या संधी मिळू शकतात. असंच एक क्षेत्र म्हणजे इकॉनॉमिक्स. दिवसेंदिवस इकॉनॉमिक्समधल्या करियरच्या संधी वाढत आहेत. मोहम्मद युनुस, अमर्त्य सेन यांनी इकॉनॉमिक्समध्ये नोबेल मिळवून आशियातील इकॉनॉमिक्सला एक ग्लॅमरही मिळवून दिलंय. म्हणूनच या वेळी टेक ऑफचा विषय होता 'करियर इकॉनॉमिक्समधलं. इकॉमिक्संध्ये शिक्षण घेतल्यानंतर बँकिग, प्लॅनिंग कमिशन,अ‍ॅनॅलिटिकल कॉर्पोरेट सेक्टर, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अशा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम करियर होऊ शकतं. या क्षेत्रातल्या संधी, आवश्यक स्किल्स, चांगल्या इन्स्टिट्यूट्स यासंदर्भातली उपयुक्त माहिती या कार्यक्रमात देण्यात आली. यासंदर्भात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी रुईया महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वर्षा माळवदे आणि अर्थबोध पत्रिकेचे संपादक अभय टिळक यांना टेक ऑफमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं.इकॉनॉमिक्सविषयी बोलताना प्रा. वर्षा माळवदे म्हणाल्या 'इकॉनॉमिक्समध्ये करियर करताना गणिताचा प्रामुख्याने वापर करावा लागत असला अ‍ॅनॅलिटिकल स्किल्स हा इकॉनॉमिक्समधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. बरोबरीनं तुम्हाला सामाजिक क्षेत्राचं भान असायला हवं. केवळ आकडेमोडीपेक्षा तुम्ही एखाद्या गोष्टीचं अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून कसा विचार करता, हे महत्त्वाचं ठरतं. म्हणजे उदाहरणच घ्यायचं झालं तर सिनेमा अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून पहाता आला किंवा बातम्या अर्थशास्त्रीय दृष्टीकोनातून वाचता आल्या की तुम्ही योग्य वाटेवर आहात असं समजावं'या विषयावर बोलताना प्रा. अभय टिळक म्हणाले 'अर्थशास्त्रीय लेखन म्हटलं की फक्त शेअर बाजार किंवा भांडवल एवढाच विचार केला जातो. त्यामुळे आपल्यासमोर जे लेखन येतं, ते त्याचसंदर्भात असतं. पण त्याच्यापलिकडेही अर्थशास्त्राचा व्याप फार मोठा आहे. सरकारचे आर्थिक व्यवहार, आंतरराष्ट्रीय भांडवल हस्तांतरण, ग्रामविकास, आरोग्य, शेती, अर्थसंकल्प, बेरोजगारी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात लेखन व्हायला हवं. 1991 च्या आधी अर्थशास्त्रात एक अध्यापन सोडलं तर फारसा स्कोप नव्हता. पण आता परिस्थिती बदलतीय. सरकारशिवाय प्रायव्हेट सेक्टरमध्येही पॉलिसी रिसर्चला मोठी मागणी आहे. त्यामुळे आता या सगळ्या क्षेत्रात करियर करता येऊ शकतं' स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट, पेटंट्स विषयक आंतरराष्ट्रीय कायदे, चॅनल किंवा वर्तमानपत्रात अर्थविषयक लेखनातही विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत. याशिवाय सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी इकॉनॉमिक्सच्या बॅकग्राउंडचा खूप वापर होतो. जिओ पॉलिटिक्समध्येही इकॉनॉमिक्सची पार्श्वभूमी असेल तर खूप फायदा होतो अशी माहिती प्रा. वर्षा माळवदे यांनी सांगितलं.मायक्रोफायनान्समधील करियरच्या संधींची माहिती देताना प्रा. वर्षा माळवदे म्हणाल्या 'मायक्रो फायनान्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर मायक्रोफायनान्स कंपनीजमध्ये संधी आहे. तसंच या क्षेत्रात संशोधनाला खूप वाव आहे. त्यासाठी बर्‍याच संस्था स्कॉलरशिपही देतात' दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे इकॉनॉमिक्सच्या विद्यार्थ्यांच ड्रीम डेस्टिनेशन आहे. याशिवाय दिल्लीतली जवाहरलाल नेहरू युनिव्हरसिटी (जेएनयू), पुण्यातली गोखले इन्स्टिट्यूट या ही अर्थशास्त्राचं शिक्षण देणार्‍या प्रसिद्ध इन्स्टिट्यूट आहेत. मुंबईतली आयजीआयडीआर ही देखील महत्त्वाची संस्था असून विकासाशी संबंधीत संशोधन या संस्थेत दिलं जातं, अशी माहिती प्रा. वर्षा माळवदे यांनी दिली.इकॉनॉमिक्समधल्या करियरसंदर्भातली ही चर्चा आपण सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 23, 2008 12:10 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 23, 2008 12:10 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close