S M L

मौलाना मसूद अझर पाकिस्तान सरकारच्या नजरकैदेत

9 डिसेंबर, पाकिस्तानजैश ए मोहम्मद या संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अझर याला पाकिस्तान सरकरानं नजरकैदेत ठेवण्यात आल्याचं पीटीआय या वृत्तसंस्थेनं म्हटलंय. पाकिस्तानमधल्या बहावलपूरातून त्याला ताब्यात घेतलं गेलंय. मौलाना मसूद अझर हा कंदहार अपहार प्रकरणातही सहभागी होता. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री पाक संरक्षण मंत्री चौधरी अहमद मुख्तार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चौधरी अहमद मुख्तार यांनी सीएनएन आयबीएनला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले "अझरला ताब्यात घेण्यात आलंय. रेहमान लखवीला सोमवारीच अटक करण्यात आलीय" अशी माहिती यांनी दिली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या तपासात पाकिस्ताननं भारताला पूर्ण सहकार्य दिल्याचं सांगत "जर भारताकडे पुरावे असतील तर त्यांनी ते पाकिस्तानला दाखवावेत. पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या अतिरेक्यांची चौकशी करण्याची परवानगी भारताला देण्यात येईल" असं ते म्हणाले. दहशतवादाच्या निर्मुलनासाठी भारत आणि पाकिस्ताननं एकत्र काम करण्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं,1999 मध्ये कंदहार विमान अपहरण प्रकरणी ओलीस प्रवाशांच्या बदल्यात मौलाना मसूद अझरसह अन्य दोन अतिरेक्यांची मुक्तता करण्यात आली होती. मौलाना मसूद अझर पाकिस्तानात असून त्याला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारतानं वारंवार केली होती. आत्तापर्यंत या मागणीकडे पाकिस्तान सरकारनं वारंवार दुर्लक्ष केलं असलं तरी 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत चालला होता. त्यामुळेच पाकिस्तान सरकारनं ही कारवाई केल्याचं मानलं जात आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 06:20 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 06:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close