S M L

मार्शल आर्टचा बादशहा 'मेहुल व्होरा'

युथ ट्यूबच्या या भागात आपण भेटलो मार्शल आर्ट एक्स्पर्ट मेहुल व्होराला. मेहुल मार्शल आर्ट्सच्या सात प्रकारात पारंगत आहे. आपल्याला फक्त मार्शल आर्ट्स माहीत असतात. पण त्यातही अनेक प्रकार असतात. मेहुल म्हणाला की डान्स ही एक मोठी कन्सेप्ट आहे. त्यात भरतनाट्य, पॉप, जॅझ, सालसा, रस्त्यावरचा गणपती डान्स असे अनेक प्रकार असतात. तसेंच मार्शल आर्ट्स ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि त्यात वेगवगेळे प्रकार असतात. त्यातल्या सात प्रकारात मेहुल पारंगत आहे. "मी या कलांमध्ये मास्टर नाही, तर अजूनही विद्यार्थी आहे" असंही मेहुल नम्रपणे सांगतोलहानपणी मेहुल हा बराच अशक्त आणि दुबळा होता. खूप मुलं त्याला त्रास द्यायचे. त्यामुळे त्याच्या आईनी त्याला मार्शल आर्ट्सच्या क्लासला घातलं. पण वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्याला मार्शल आर्ट्स अजिबातच आवडत नव्हते. मात्र 12 व्या वर्षी त्याला जाणवलं की जी मुलं आपल्याला त्रास देतात, त्यांची आता आपण धुलाई करू शकतो. पण केवळ इथेच न थांबता त्यानं वयाच्या फक्त 15व्या वर्षी नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली. पण त्याबद्दलंही तो नम्रपणे बोलतो. "मी वयाच्या तिसर्‍या वर्षी मार्शल आर्ट्स शिकायला सुरुवात केली. एवढ्या वर्षांच्या सरावानंतर चॅम्पियनशिप मिळाली तर त्याचं फारसं आश्चर्य नाही" असं मेहूलनं सांगितलं.टीव्हीवरचे जवळपास 90 टक्के मार्शल आर्ट्स मेहुलनं कोरियोग्राफ केले आहे. त्याविषयी बोलताना तो म्हणाला, "मार्शल आर्ट्सची कोरियोग्राफी किंवा फिल्मी फायटिंगची अशी टेक्निक्स असतात का जी टीव्हीवर दिसायला फार चांगली वाटतात, पण त्याचा खर तर काही उपयोग नसतो. ते सगळं दिखाऊ असतं" मेहुलनं आजपर्यंत पारले, शाहारुख, चिरंजीवी आणि सनी दोओलबरोबर सोना चांदी च्यवनप्राशची अ‍ॅड केली आहे. अक्षयकुमारबरोबर 'सेवन डेडली आर्टस' ही सिरियलही केली आहे. "सैन्याचा मार्शल आर्ट सोडला तर राहिलेल्या सगळ्या मार्शल आर्टसचा मंत्र असतो संरक्षण. समोरच्याने सुरुवात केल्याशिवाय पहिला हल्ला केला जात नाही" असं मेहुलनं सांगितलंइआयडो या मार्शल आर्ट फॉर्मचं शिक्षण देण्याची परवानगी असणारा मेहुल एकमेव भारतीय आहे. जॅपनीझ सामुरायची तलवार म्हणजेच 'कताना' वापरण्याची कला म्हणजे इआयडो. 1999 मध्ये जपानला मेहुलनं ही कला शिकायला सुरुवात केली. 2005 मध्ये मेहुलचे गुरू भारतात आले आणि त्यानंतर ही कला शिकवण्याची परवानगी असलेला मेहुल हा पहिला भारतीय बनला. भविष्यात सध्या मेहुलला येत असलेल्या सातही मार्शल आर्टसमध्ये मास्टरी मिळवायचीय. "मी जे शिकलोय, ते मला इथल्या मुलांना शिकवायचंय, म्हणजे माझ्यासारखं कोणाला त्यासाठी जपानपर्यंत जायला नको" असंही मेहुलनं सांगितलं.मेहुलबरोबरच्या या गप्पा तुम्ही सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 6, 2008 02:49 PM IST

युथ ट्यूबच्या या भागात आपण भेटलो मार्शल आर्ट एक्स्पर्ट मेहुल व्होराला. मेहुल मार्शल आर्ट्सच्या सात प्रकारात पारंगत आहे. आपल्याला फक्त मार्शल आर्ट्स माहीत असतात. पण त्यातही अनेक प्रकार असतात. मेहुल म्हणाला की डान्स ही एक मोठी कन्सेप्ट आहे. त्यात भरतनाट्य, पॉप, जॅझ, सालसा, रस्त्यावरचा गणपती डान्स असे अनेक प्रकार असतात. तसेंच मार्शल आर्ट्स ही एक ब्रॉड कन्सेप्ट आहे आणि त्यात वेगवगेळे प्रकार असतात. त्यातल्या सात प्रकारात मेहुल पारंगत आहे. "मी या कलांमध्ये मास्टर नाही, तर अजूनही विद्यार्थी आहे" असंही मेहुल नम्रपणे सांगतोलहानपणी मेहुल हा बराच अशक्त आणि दुबळा होता. खूप मुलं त्याला त्रास द्यायचे. त्यामुळे त्याच्या आईनी त्याला मार्शल आर्ट्सच्या क्लासला घातलं. पण वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत त्याला मार्शल आर्ट्स अजिबातच आवडत नव्हते. मात्र 12 व्या वर्षी त्याला जाणवलं की जी मुलं आपल्याला त्रास देतात, त्यांची आता आपण धुलाई करू शकतो. पण केवळ इथेच न थांबता त्यानं वयाच्या फक्त 15व्या वर्षी नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली. पण त्याबद्दलंही तो नम्रपणे बोलतो. "मी वयाच्या तिसर्‍या वर्षी मार्शल आर्ट्स शिकायला सुरुवात केली. एवढ्या वर्षांच्या सरावानंतर चॅम्पियनशिप मिळाली तर त्याचं फारसं आश्चर्य नाही" असं मेहूलनं सांगितलं.टीव्हीवरचे जवळपास 90 टक्के मार्शल आर्ट्स मेहुलनं कोरियोग्राफ केले आहे. त्याविषयी बोलताना तो म्हणाला, "मार्शल आर्ट्सची कोरियोग्राफी किंवा फिल्मी फायटिंगची अशी टेक्निक्स असतात का जी टीव्हीवर दिसायला फार चांगली वाटतात, पण त्याचा खर तर काही उपयोग नसतो. ते सगळं दिखाऊ असतं" मेहुलनं आजपर्यंत पारले, शाहारुख, चिरंजीवी आणि सनी दोओलबरोबर सोना चांदी च्यवनप्राशची अ‍ॅड केली आहे. अक्षयकुमारबरोबर 'सेवन डेडली आर्टस' ही सिरियलही केली आहे. "सैन्याचा मार्शल आर्ट सोडला तर राहिलेल्या सगळ्या मार्शल आर्टसचा मंत्र असतो संरक्षण. समोरच्याने सुरुवात केल्याशिवाय पहिला हल्ला केला जात नाही" असं मेहुलनं सांगितलंइआयडो या मार्शल आर्ट फॉर्मचं शिक्षण देण्याची परवानगी असणारा मेहुल एकमेव भारतीय आहे. जॅपनीझ सामुरायची तलवार म्हणजेच 'कताना' वापरण्याची कला म्हणजे इआयडो. 1999 मध्ये जपानला मेहुलनं ही कला शिकायला सुरुवात केली. 2005 मध्ये मेहुलचे गुरू भारतात आले आणि त्यानंतर ही कला शिकवण्याची परवानगी असलेला मेहुल हा पहिला भारतीय बनला. भविष्यात सध्या मेहुलला येत असलेल्या सातही मार्शल आर्टसमध्ये मास्टरी मिळवायचीय. "मी जे शिकलोय, ते मला इथल्या मुलांना शिकवायचंय, म्हणजे माझ्यासारखं कोणाला त्यासाठी जपानपर्यंत जायला नको" असंही मेहुलनं सांगितलं.

मेहुलबरोबरच्या या गप्पा तुम्ही सोबतच्या व्हिडियोवर पाहू शकता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2008 02:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close