S M L

मुंबईवरील हल्ल्यानंतरही रत्नागिरीचा कस्टम विभाग गाफील

8 डिसेंबर, रत्नागिरीदिनेश केळुस्करमुंबईवर हल्ला करणारे अतिरेकी हे समुद्रीमार्गाने आले होते.अतिरेकी कारवायांच्या शक्यतेमुळे सागरी सुरक्षा खूपचं महत्त्वाची झालीय. मात्र गस्तीसाठी आलेल्या जलदगती बोटींची चाचणीच कस्टम विभागाकडून अद्याप झालेली नाही. त्यामुळे या नौका रत्नागिरीच्या भगवती बंदरात तशाच पडून आहेत.मच्छीमारी नौकांपेक्षा जलद गतीने जाणा-या या गस्तीनौका लाखो रुपये खर्चून आणल्या गेल्या आहेत. पण त्या कशा चालवायच्या या विचारात कस्टम्स विभाग आहे. यासाठी असणारे ड्रायव्हर नौका चालवायचं प्रशिक्षण घ्यायला गेले आहेत अशी माहिती आमच्या रिपोर्टर्सनी दिली गेली.बंद असलेल्या नव्या को-या गस्तीनौकांविषयी विचारायला आमचे रिपोर्टर कस्टम विभाकडे पोहोचलो .पण इथे कस्टम्स अधिकारी हजर नाहीत. म्हणून रिपोर्टर्सनी अधिका-यांचा मोबाईल नंबर इथल्या कर्मचा-यांकडे मागितला.पण मोबाईल नंबर देऊ नका अशा सुचना अधिका-यांनी कर्मचा-यांना दिलेल्या आहेत. संशयास्पद हालचालींबध्दल जर कस्टम अधिका-यांना कळवायचं झाल तर ते कुठे आणि कुठल्या नंबरवर ? हा आता प्रश्नच आहे.सध्या प्रत्येकी सहा ते आठ हजार रुपये रोजाने भाड्याने घेतलेल्या मासेमारी नौकांमधूनच ही गस्त सुरू असते. पण ही गस्त न घालता कर्मचारी झोपलेले असतात असं इथल्या मच्छीमारांनी अनेक वेळा पोलीस अधिका-यांच्या लक्षात आणून दिलंय. "जॉईंट सी पेट्रोलीगच्या वेळेला आम्ही हा विषय सांगितला त्यवेळी आम्हाला असं सांगितलं गेलं की ते एखाद्या दिवशी झोपलेले असतील पण एखाद्या दिवसाचीच झोप महागात पडते ना ?" असं अप्पा वांदरकर या मच्छिमारानं सांगितलं. त्यांना भत्ता दला जातो, पगार दिला जातो. ते झोपायचे पैसे घेतात का ? असा संतप्त सवाल इथले स्थानिक मच्छिमार विचारत आहेत.गस्तीसाठी घेतलेल्या नौकांची भाडे कराराची मुदत संपेपर्यंत या जलदगती नौका चालवायच्याच नसल्यामुळे त्या बंद ठेवण्यात आल्या असाव्यात असही इथल्या मच्छीमारांकडून बोललं जातंय. पण यामुळे सागरी सुरक्षेचं गांभीर्य कस्टम विभागाला नसल्याचच दिसून येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 09:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close