S M L

पोलीस दलातलं करिअर (भाग - 1)

स्वत:चा जीव धोक्यात घालून इतरांसाठी काम करणं हा पोलिसांचा धर्म आहे. हा धर्म जपणारं, त्यासाठी प्राणांची बाजी लावणारं पोलीस दलातलं करिअर हे करिअरच्या दृष्टीनं एक चांगलं ऑप्शन आहे. विशेषत: मुलींसाठी पोलीस दल काय ऑप्शन तयार करतं याची चर्चा ' टेक ऑफ 'मध्ये करण्यात आली. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे संचालक आणि विशेष पोलीसनिरीक्षक हेमंत नागराळे आणि पुण्याच्या युनिक अ‍ॅकॅडमी या प्रशिक्षण संस्थेचे संचालक तुकाराम जाधव या दोन मान्यवरांनी पोलीस दलातल्या करिअरवर मागदर्शन केलं. इंजिनिअरिंगसारखं क्षेत्र सोडून तुम्ही आयपीएसमध्ये कसे गेलात ?हेमंत नागराळे : 1984 मध्ये नागपूर इंजिनिअरिंग कॉलेजमधून मधून मी मेकॅनिकल इंजिनिअर झालो. राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर, इंडियन अॉर्डनान्स फॅक्ट्रीज अशा विविध संस्थांमधून मी 2 वर्षं नोकरी केली. या दोन वर्षांच्या काळात मी दिल्लीला युपीएससी परीक्षांच्या मुलाखतींना जायचो. तिथे मला युपीएससीची परीक्षा आणि सिव्हिल सर्व्हिसेसमधलं करिअर याविषयी माहिती कळली. दोन वर्षं केमिकल फिल्डमध्ये राहिल्यावर ठरवलं की केमिकल फॅक्टरीमध्ये किंवा थर्मल पॉवर स्टेशनमध्ये काम करण्यापेक्षा थोडी मेहनत करून सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये प्रयत्न करायला काय हरकत आहे ? या विचाराने मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागलो. 1987 मध्ये स्पर्धापरीक्षेला बसलो. आयपीएसमध्ये सिलेक्ट झालो.स्पर्धा परीक्षांना बसताना कोणत्या प्रकारची तयारी करावी लागते. तुम्ही मुलांना कशाप्रकारे तयार करतात, त्यामुलांवर काय मेहनत घेतात ?तुकाराम जाधव : स्पर्धा परीक्षा ही तीन टप्प्यांत घेतली जाते. पूर्व, मुख्य आणि मुलाखत असे कोणत्याही स्पर्धापरीक्षेचे तीन महत्त्वाचे टप्पे असतात. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी साधारण वर्षभराचा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे स्वाभाविकच या परीक्षेचं स्वरुप लक्षात घेणं, परीक्षांच्या तीन वेगळ्या टप्प्यांसाठी लागणारी वेगळेपणं समाजावून घ्यावी लागतात. वेगळेपणासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला चिकाटीनं.,जिद्दीनं प्रयत्न करावे लागतात. याची जाणीव आम्ही विद्यार्थ्यांना करून देतो. ते मुलामुलींच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. कारण पहिल्याच फटक्यात कधी कधी परीक्षा उत्तीर्ण होता येत नाही. विद्यार्थ्यांना नैराश्य येतं. या परीक्षेसाठी कुठल्याही प्रकारचे शॉर्टकट नसतात, हेही मुलांना सांगितलं जातं. प्रयत्न करताना जास्त वर्षं लागू शकतात. पण चिकाटी सोडायची नसते. मुलींसाठी हे क्षेत्र कसं आहे, काही रिझर्व्हेशन आहेत का ?हेमंत नागराळे : महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मुलींसाठी 30 टक्क्यांचं आरक्षण निश्चितच आहे. 30 टक्के आरक्षण असूनही म्हणाव्या तेवढ्या मुली सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येत नाहीत. सिर्व्हिल सर्व्हिसेससाठी बैद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता सारख्या चाळणी परीक्षा असतात, त्याची तयारी मुली काय नीट करून येत नाहीत. त्यामुळे नापास होण्याचं जे प्रमाण आहे, ते सर्वात जास्त आहे. ही परिस्थिती फक्त मुलींच्याच नाहीतर मुलांच्याही बाबतीत आहे. यासाठी स्पर्धा परीक्षांना बसणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची आवश्यकता असते. प्रत्येकाला मार्गदर्शन मिळतंच असं नाही. काहींना स्वत:हून तयारी करावी लागते. शारीरिक क्षमतांच्या परीक्षेमध्ये काय काय मॉड्युल्स आहेत, याचा सराव करावा लागतो. बैद्धिक क्षमता परीक्षेत लेखी परीक्षा महत्त्वाची असते. लेखी परीक्षेत कोणकोणते प्रश्न येणार याचा सराव करावा लागतो. साधारण सहा महिन्यांची तयारी जर प्रत्येकानं जिद्दीनं, चिकाटीनं केली तर मला नाही वाटत की अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणं ही कठीण गोष्ट आहे. कोणत्याही परीक्षांच्या एक महिना आधी अभ्यास करणं ही आपल्याकडे बहुतेकांची मानसिकता असते, ती बदलायला पाहिजे. सायबरसेलमध्ये काम करायचं असेल तर काय पात्रता असावी लागते ?हेमंत नागराळे : पोलीस भरतीतूनआमच्याकडे जे उमेदवार येतात, किंवा आमच्याकडे असणा-या ज्या पोलीस शिपायांनी, कॉन्स्टेबल्सनं कॉम्प्युटर्सशी नगडीत कोर्स केलेले असतील, लँग्वेजेस केलेल्या असतील, सॉफ्टवेअर हार्डवेअरचं कुठलंही प्रोग्रॅमिंग केलेलं असेल अशा पोलीस शिपायांचा अधिका-यांचा बायोडाटा बघितला जातो. त्यांच्या मुलाखती घेतल्या जातात. या मुलाखतींतून जे अधिकारी आम्हाला सायबर सेल या पदांसाठी काम करायला योग्य वाटत असेल त्यांची निवड आम्ही करतो. आजकाल दहशतवादी करावाया इतक्या वाढल्या आहेत की अशा घातपातांनंतर ईमेल पाठवणं, इमेल आयडी हायजॅक करणं, कॉम्प्युटर हायजॅक करणं अशा घटना घडायला लागल्या आहेत, तर ज्यांना सायबर सेलमध्ये काम करायचं असेल... त्यांना काय तयारी करावी लागते? का सायबर सेलमध्ये काम करणं ही पोलीसखात्याच्या अंतर्गत निवडीची बाब आहे ?हेमंत नागराळे : हो. पोलीस खात्याच्या सायबर सेलसाठी काम करणं हा खात्याच्या अंतर्गत निवडीचा प्रश्न आहे. पण जेव्हा पोलीस खात्यातले सायबर सेलसाठी काम करणारे शिपाई, कॉन्स्टेबल एखादी समस्या सोडवण्यासाठी असमर्थ ठरतात तेव्हा आम्ही प्रोफेशनल्स लोकांची मदत घेतो. म्हणजे सायबर सेलसाठी काम करायचं असेल तर पोलीस खात्यात येऊनच काम करायला हवं, असं काही नाही. तर बाहेर राहुन सायबरसेल, सायबर लॉ, सायबर क्राइममध्ये स्वत:ची अशी खासियत डेव्हलप करून काम केलं तरी चालतं. बाहेर राहून पोलिसांना मदत करत येते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 01:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close