S M L

पोलीस दलातलं करिअर (भाग - 2)

कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी अशा वेगवेगळ्या श्रेण्यांमध्ये पोलीस दलांत भरती होते. त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायलाआवडेल...हेमंत नागराळे : पोलीस खात्यांत मुख्यत्वे करून चार टप्प्यात भरती होते. सर्वात पहिला टप्पा असतो तो पोलीस कॉन्स्टेबलसाठीचा. 12 वीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या कोणताही उमेदवार पोलीस कॉन्स्टेबलच्या जागेसाठी अर्ज करू शकतो. पोलीस कॉन्स्टेबलची परीक्षा ही शारीरिक क्षमता, लेखीपरीक्षा आणि मुलाखती अशा तीन परीक्षा द्याव्या लागतात. त्या तीन परीक्षा दिल्यानंतर जागेप्रमाणे उमेदवारांची निवड केली जाते. महाराष्ट्रातल्या 11 हजार जागांसाठी गेल्या दोन वर्षांपूर्वीच सिलेक्शन झालेलं आहे. युपीएससीच्या परीक्षेसाठी कोणते विषय निवडल्यावर यशाची खात्री मिळू शकते ?हेमंत नागराळे : युपीएससीच्या परीक्षेसाठी परीक्षार्थीला स्वत:ला कोणत्या विषयात जास्त कन्फर्टेबल वाटतं, तो कोणत्या विषयातल्या प्रश्नांची उत्तरं चांगल्याप्रकारे लिहू शकतो, अशाच विषयांची निवड परीक्षार्थीनं करावी. कलाशाखेतल्या सोशोलॉजी, अ‍ॅन्थ्रोपोलॉजी, सासकोलॉजी अशा विषय विद्यार्थी सर्वात जास्त निवडतात. या विषयांना सर्वात जास्त मागणी असते. कारण हे विषय समजायला सोपे असतात, या विषयांवर फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. मी जेव्हा युपीएससीची परीक्षा दिली होती तेव्हा समाजशास्त्र ( सोशोलॉजी ), मानववंशशास्त्र (अ‍ॅन्थ्रपोलॉजी) आणि मानसशास्त्र ( सायकोलॉजी ) हे दोन विषय घेऊन दिली होती. ज्या विद्यार्थ्यांनी एकदा परीक्षा दिलेली असते..अशा विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी काय तयारी करावी ?तुकाराम जाधव : ज्या विद्यार्थ्यांनी आधी एमपीएसची परीक्षा दिलेली आहे, त्यांनी गेल्यावर्षी आपण कुठे कमी पडलो याचं परीक्षण करायचं. त्यानंतर चालू वर्षाच्या परीक्षेच्या तयारीला लागायचं. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून नीट अभ्यास करायचा. त्याप्रमाणे प्रश्नांची तयारी करायची.सर पोलीसभरती हा प्रकार काय असतो ? हेमंत नागराळे : युपीएससी परीक्षांचा एक सेट पॅटर्न असतो. डिसेंबर महिन्यात त्या परीक्षांची जाहिरात येते. एमपीएसीच्या परीक्षेला बसायला इच्छुक असणारे विद्यार्थी अर्ज भरतात. जून महिन्यात प्रिलिम परीक्षा होते. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मुख्य परीक्षा होते. एप्रिल -मे महिन्यात मुलाखती होतात. हा युपीएससीचा अगदी फिक्स पॅटर्न असतो. पण एमपीएसीच्या परीक्षांचं असं वेळेनुसारच होईल, असं काही सांगता येत नाही. कारण काहीच ठरलेलं नसतं. दरवर्षी एमपीएससीची राज्य सेवा परीक्षा आणि युपीएससीची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा या दरवर्षी नियमित कालावधी नुसार होत असतात. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची वेळ न पाहता सुरुवातीपासूनच परीक्षेची तयारी करायची. याचा जास्त फायदा विद्यार्थ्यांना होतो. त्यांना अभ्यास करायलाही वेळ मिळतो. पोलिसदलात भरती होण्यासाठी काय त-हेचा माईण्ड सेट लागतो ?हेमंत नागराळे : आपल्या आजुबाजुला घडणा-या घटना पाहता पोलिसदलात ज्या उमेदवारांना भरती व्हायचंआहे ते धीट लागतात, जिगरबाज लागतात. जर पोलिसदलात भरती होण्यासाठी आलेला उमेदवार हा कमकुवत मनाचा असेल, कचखाऊ वृत्तीचा असेल, आव्हानांना तोंड द्यायला आयत्या वेळी हिम्मत होत नसेल तर मग तुम्ही यशस्वी होऊ शकणार नाही. पोलिसदलात भरती होणारा उमेदवार हा खंबीरमनाचा असायला हवा. उमेदवारामध्ये अहोरात्र काम करण्याची वृत्ती असायला हवी. पोलिसदलात कष्टाला पर्यायच नाहीये. पोलिसांच्या कामाच्या स्वरुपाला वेळेचं बंधन नसतं. या सगळ्याची कल्पना उमेदवाराच्या कुटुंबालाही असायला हवी. जर घरातला कर्ता पुरुष दोन-दोन, तीन - तीन दिवस येत नसेल तर घरातल्यांना टेन्शन येणं स्वाभाविकच आहे. अशावेळेला पोलिसाला नैतिक जबाबदारीची सर्वात जास्त गरज असते.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 13, 2008 01:45 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2008 01:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close