S M L

मराठवाड्यातून पुरवली अतिरेक्यांना सिम कार्ड

9 डिसेंबर, औरंगाबादमाधव सावरगावे दोन महिन्यांपूर्वी दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये झालेल्या चकमकीत अतिरेकी मारले गेले होते. दिल्लीत ही कारवाई सुरू असताना अतिरेक्यांनी ज्या मोबाईलवर संपर्क साधला होता, त्यातील एका सिम कार्डची औरंगाबादजवळच्या चित्तेपिंपळगाव इथून विक्री झाल्याचं उघड झालंय. त्यामुळं दहशतवाद्यांचे धागेदोर औरंगाबादपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.औरंगाबादजवळच्या या चित्तेपिंपळगावमधील एका मोबाईल शॉपमधून 15 बनावट सिमकार्डस् एक वर्षापुर्वी विक्री करण्यात आले. त्यातील एका नंबरवर दिल्लीतल्या बाटला हाऊस इथल्या चकमकीत ठार झालेल्या दोन आणि एका जिवंत पकडलेल्या अतिरेक्यानं वारंवार संपर्क साधल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे एटीएसनं तपासणी करुन सिमकार्ड विकणा-या मंगेश डोईफोडे या आरोपीस अटक केली आहे. "आम्ही एका आरोपीस अटक केली आहे. या सिम कार्डचा वापर नेमका कुठे कुठे झाला, ती नेमकी कोणी कोणी वापरली, याचा तपास चालू आहे" अशी माहिती चिखलठाणा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर अनिल गायकवाड यांनी दिली.बनावट सिमकार्ड विकताना मंगेश डोईफोडेनं चित्तेपिंपळगाव ग्रामपंचायतीचा बनावट शिक्काही तयार केला होता. "सिमकार्ड घेताना सादर केलेली कागदपत्र बनावट आहेत. सरपंच आणि ग्रामपंचायतीचे बनावट शिक्के त्यासाठी वापरण्यात आले आहेत" अशी माहिती एटीएस अधिकारी व्ही. एन. जटाळे यांनी दिली.मंगेश डोईफोडे हा आरोपी मुळचा चित्ते पिंपळगावचा नाही. त्यानं इथे चार महिने बनावट दुकान थाटलं होतं. याच दुकानातून त्यानं सिमकार्ड विकल्याची माहिती मिळाली आहे. मात्र चार महिने दुकान चालवूनही इथे त्याला कोणी ओळखत नाही. औरंगाबादहूनच सिमकार्ड विक्री केलं असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा एटीएसनी तपासणी सुरु केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 11:55 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 11:55 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close