S M L

आर्थिक मंदीचा पिंपरी चिंचवडला फटका

9 डिसेंबर, पिंपरी-चिंचवडसागर शिंदेआर्थिक मंदी मुळे टाटा मोर्टासने कंपनीने सहा दिवसांसाठी पिंपरी मधलं युनिट बंद केल होत तर आता याही महिन्यात पुन्हा पिंपरी युनिट अंशत: बंद ठेवण्याचा निर्णय टाटा मोर्टासने घेतलाय. फोर्जिंग क्षेत्रातील एम फोर्ज कंपनी देखील आता सतरा दिवसांसाठी बंद राहणार आहे. अशा परिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील मोठया उद्योगांवर अवलंबून असणारे लघू उद्योग मात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.अनेक मोठ्या कंपन्यांकडून मागणी बंद झाल्याचा मोठा फटका लघू उद्योगांना बसला आहे. मागणी नसल्याने कंपनीतील मशीन्स सध्या बंदच आहेत. त्यांमुळे उद्योजकांनी अनेक कामगारांना कामावरुन काढून टाकलंय. "आम्हाला मिळणार्‍या ऑर्डर्समध्ये 50 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे आमच्यासमोरही 50 टक्के कामगारकपात करण्याशिवाय पर्याय नाही" असं विजय इंडस्ट्रीजचे एम. डी. विजय शेरगे यांनी सांगितलं.कामगार कपातीचा हॉटेल्स आणि कॅन्टींग व्यवसायावर असा परिणाम झालाय. "स्टार सारख्यासारख्या कंपनी मधील कामगार कपात झाल्याने ओव्हर टाईम कमी झाल्याने कंपनीला नाश्ता सुध्दा जात नाही. आमच्या ज्या कंपनी मध्ये चाळीस ते पन्नास ऑर्डर्स असायच्या तिथे आता दहा-वीस ऑर्डर्स पण मिळत नाहीयेत" असं काळुराम जाधव या कॅन्टीनचालकानं सांगितलं.वाहन उद्योगा पाठोपाठ आता इंजिनियरिंग आणि अन्य क्षेत्रातील उद्योगांना देखिल या आर्थिक मंदीचा मोठा फटका बसतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले पिंपरी चिंचवडमधल्या लघू उद्योगांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 9, 2008 10:58 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 9, 2008 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close