S M L

युएनमधलं करिअर (भाग - 3 )

युएनएचसीआरमध्ये काम करणा-या रोहिणी देशमुख यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग , ' युएनमधलं करिअर (भाग - 3 ) ' आतापर्यंत मराठी माणसाचं ग्लोबल करिअर हे आय.टी. किंवा अमेरिकेला जाणं हे होतं. पण युएनमध्ये काम करणं भारतीय माणसासाठी फारच क्वचित्‌च आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे भारतीय म्हणून काम करताना काय अनुभव आले ? रोहिणी देशमुख : लोकांना भारतीय संस्कृतीचं खूप कुतूहल आहे. आपले रितीरिवाज, आपल्या संस्कृतीबद्दल मला नेहमीच प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचं काम करताना आपल्याला आपलं सांस्कृतिक भान असलं पाहिजे. संस्कृतीची माहिती असली पाहिजे. कारण तिथे आम्ही एकप्रकारे भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणूनच जात असतो. युएनसाठी मुलगी म्हणून काम करताना तुम्हाला काय अनुभव आले ? कारण निर्वासित लोकांबरोबर सीमांवर रहावं लागतं...तर तुमचा अनुभव काय सांगतो ?रोहिणी देशमुख : या कामामध्ये स्थैर्य अजिबात नाही. कारण वर्ष -दोन वर्षांनी बदली होतात. नवीन देशात गेल्यावर त्या देशाची संस्कृती समजून घ्यावी लागते. एवढंच नाही तर तिथलं सरकार, कायदे हेही याचीही माहिती करून घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन काम करताना तुम्हाला त्यात्या देशांच्या इतिहासाची माहिती करून घ्यावी लागते तर...रोहिणी देशमुख : हो.युएनमध्ये एक मराठी मुलगी म्हणून काम करताना नाही.. तर बाई म्हणून काम करताना काही आव्हानं अनुभवायला मिळतात का ?रोहिणी देशमुख : आव्हानं म्हणाल तर कौटुंबिक आयुष्यावर भरपूर परिणाम होतो. तुमचं पोस्टिंग समजा सुदान किंवा दारफूरमध्ये झालं तर तिकडे कुटुंबाला घेऊन जाता येत नाही. अशावेळेला कुटुंबाला नैरोबित ठेवलं जातं. तिथे कुटुंबाला संरक्षण दिलं जातं. महिन्यातून एकदा सुट्टी मिळते. मग पुन्हा कामावर रुजू व्हायचं. असं करिअर करू इच्छिणा-या मुलांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल ?रोहिणी देशमुख : माझ्या आईवडिलांनी मला एवढंच सांगितलं की चांगलं शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं रहायचं आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचं. माझ्या आईवडिलांनी माझ्यामनावर ते ठसवलं होतं. त्यांचा पाठिंबा नेहमीच माझ्याबरोबर होता. असं काम करणा-यांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक आहे. कारण निर्वासितांबरोबर रहावं लागतं. काम खूप तणावाचं असतं. आंतरराष्ट्रीय वेळेची बंधनं असतात. त्या ठराविक वेळात काम पूर्ण व्हावंच लागतं. सरकार कामाच्या वेळेची बंधनं आखतं. त्या वेळांचं भान ठेवून काम करावं लागतं. युएनची वेबसाईट पाहताना वेगवेगळ्या प्रकारची जॉब लिस्टिंग्स येतात. तुम्हालाही या जॉब लिस्टिंगचा उपयोग झाला का ?रोहिणी देशमुख : हो. इंटरनेटशी तुमची चांगली ओळख असायला हवी. वेगवेगळ्या युएन एजन्सीची माहिती या साईटवर दिली जाते. काही एजन्सीच्या बाहेरून येणा-या उमेदवारांसाठी चाचणी परीक्षा असतात. तिथेही लक्ष ठेवायचं. www.unjobs.com म्हणून एक चांगली वेबसाइट आहे. युएनबाबतची अनेक प्रकारची तिथे मिळू शकते.कला शाखेकडे कोणीही गांभीर्यानं पहात नाही. पण तुम्ही तर कला शाखेच्या विद्यार्थीनी आहात. त्याचा तुम्हाला काही फायदा झाला का ? रोहिणी देशमुख : आंतरराष्ट्रीय एनजीओमध्ये काम करायचं असेल तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी गांभीर्यानं अभ्यास करायला हवा, विशेषत: इंग्रजी, इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास मन लावून करायचा. असं केलंत तर इथेच आपण अर्धी लढाई जिंकतो.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2009 06:07 PM IST

युएनमधलं करिअर (भाग - 3 )

युएनएचसीआरमध्ये काम करणा-या रोहिणी देशमुख यांच्या मुलाखतीचा पुढचा भाग , ' युएनमधलं करिअर (भाग - 3 ) '

आतापर्यंत मराठी माणसाचं ग्लोबल करिअर हे आय.टी. किंवा अमेरिकेला जाणं हे होतं. पण युएनमध्ये काम करणं भारतीय माणसासाठी फारच क्वचित्‌च आहे. त्यामुळे तुम्हाला तिथे भारतीय म्हणून काम करताना काय अनुभव आले ? रोहिणी देशमुख : लोकांना भारतीय संस्कृतीचं खूप कुतूहल आहे. आपले रितीरिवाज, आपल्या संस्कृतीबद्दल मला नेहमीच प्रश्न विचारले जातात. अशा प्रकारचं काम करताना आपल्याला आपलं सांस्कृतिक भान असलं पाहिजे. संस्कृतीची माहिती असली पाहिजे. कारण तिथे आम्ही एकप्रकारे भारताचे सांस्कृतिक राजदूत म्हणूनच जात असतो. युएनसाठी मुलगी म्हणून काम करताना तुम्हाला काय अनुभव आले ? कारण निर्वासित लोकांबरोबर सीमांवर रहावं लागतं...तर तुमचा अनुभव काय सांगतो ?रोहिणी देशमुख : या कामामध्ये स्थैर्य अजिबात नाही. कारण वर्ष -दोन वर्षांनी बदली होतात. नवीन देशात गेल्यावर त्या देशाची संस्कृती समजून घ्यावी लागते. एवढंच नाही तर तिथलं सरकार, कायदे हेही याचीही माहिती करून घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन काम करताना तुम्हाला त्यात्या देशांच्या इतिहासाची माहिती करून घ्यावी लागते तर...रोहिणी देशमुख : हो.युएनमध्ये एक मराठी मुलगी म्हणून काम करताना नाही.. तर बाई म्हणून काम करताना काही आव्हानं अनुभवायला मिळतात का ?रोहिणी देशमुख : आव्हानं म्हणाल तर कौटुंबिक आयुष्यावर भरपूर परिणाम होतो. तुमचं पोस्टिंग समजा सुदान किंवा दारफूरमध्ये झालं तर तिकडे कुटुंबाला घेऊन जाता येत नाही. अशावेळेला कुटुंबाला नैरोबित ठेवलं जातं. तिथे कुटुंबाला संरक्षण दिलं जातं. महिन्यातून एकदा सुट्टी मिळते. मग पुन्हा कामावर रुजू व्हायचं. असं करिअर करू इच्छिणा-या मुलांच्या पालकांना तुम्ही काय सांगाल ?रोहिणी देशमुख : माझ्या आईवडिलांनी मला एवढंच सांगितलं की चांगलं शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभं रहायचं आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचं. माझ्या आईवडिलांनी माझ्यामनावर ते ठसवलं होतं. त्यांचा पाठिंबा नेहमीच माझ्याबरोबर होता. असं काम करणा-यांना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा आवश्यक आहे. कारण निर्वासितांबरोबर रहावं लागतं. काम खूप तणावाचं असतं. आंतरराष्ट्रीय वेळेची बंधनं असतात. त्या ठराविक वेळात काम पूर्ण व्हावंच लागतं. सरकार कामाच्या वेळेची बंधनं आखतं. त्या वेळांचं भान ठेवून काम करावं लागतं. युएनची वेबसाईट पाहताना वेगवेगळ्या प्रकारची जॉब लिस्टिंग्स येतात. तुम्हालाही या जॉब लिस्टिंगचा उपयोग झाला का ?रोहिणी देशमुख : हो. इंटरनेटशी तुमची चांगली ओळख असायला हवी. वेगवेगळ्या युएन एजन्सीची माहिती या साईटवर दिली जाते. काही एजन्सीच्या बाहेरून येणा-या उमेदवारांसाठी चाचणी परीक्षा असतात. तिथेही लक्ष ठेवायचं. www.unjobs.com म्हणून एक चांगली वेबसाइट आहे. युएनबाबतची अनेक प्रकारची तिथे मिळू शकते.कला शाखेकडे कोणीही गांभीर्यानं पहात नाही. पण तुम्ही तर कला शाखेच्या विद्यार्थीनी आहात. त्याचा तुम्हाला काही फायदा झाला का ? रोहिणी देशमुख : आंतरराष्ट्रीय एनजीओमध्ये काम करायचं असेल तर कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी गांभीर्यानं अभ्यास करायला हवा, विशेषत: इंग्रजी, इतिहास आणि राज्यशास्त्राचा अभ्यास मन लावून करायचा. असं केलंत तर इथेच आपण अर्धी लढाई जिंकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2009 06:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close