S M L

युएनमधलं करिअर (भाग - 1 )

' टेक ऑफ 'मध्ये ओळख करून दिली युएनमधल्या करिअरची. युएनएचसीआर मध्ये एक्स्टर्नल अफेअर्स ऑफिसर म्हणून काम करणा-या रोहिणी देशमुख यांनी त्यावर मार्गदर्शन केलं. युएनमध्ये काम करणं ही मराठी माणसासाठी अप्राप्य वाटणारी बाब आहे. पण रोहिणी देशमुख यांनी स्वत:च्या तिथल्या प्रवासाबाबत सांगितलं... रोहिणी देशमुख सांगतात, " इंग्रजी साहित्यातून बीए नंतर मी एम.ए. केलं आहे. पुढच्या शिक्षणासाठी आयएस आणि एमबीएच्या परीक्षांच्या तयारीला लागले. पीस स्टडीज अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन नावाचा नवाअभ्यासक्रम इंग्लंडमध्ये सुरू झाल्याची माहिती मला कळली. ही माहिती माझ्या बाबांचे मित्र राज खालीद यांनी दिली. इंटर नॅशनल लेव्हलवर आपल्याला काही वेगळं करायचं असेल तर या नव्या अभ्यासक्रमाची मदत होणार होती. या नव्या अभ्यासक्रमासाठी ब्रॅडफर्ड युनिव्हर्सिटी, लँकॅस्टर युनिव्हर्सिटी, अल्स्टर युनिव्हर्सिटी या इंग्लंड आणि उत्तर अमेरिकेतेल्या विद्यापीठांत अर्ज पाठवले. त्या अभ्यासक्रमामुळेच माझा युएनशी परिचय झाला.एमए झाल्यावर युएनमध्येच काम करायचं असं काही तुमचं ठरलं नव्हतं तर... फक्त तुम्ही फक्त त्या दिशेच्या शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात केलीत... रोहिणी देशमुख : हो. मला बाबांच्या मित्राकडून नव्या अभ्यासक्रमाबाबतचं मार्गदर्शन मिळालं. त्या अनुषंगानं मी विचार करायला लागले. 92-93 च्या मुंबईमध्ये झालेल्या दंगलींनंतर जे काम पोलिसांनी केलं होतं, खासकरून जी मोहल्ला कमिटीनिर्माण करण्यात आली होती... त्याचं कामही मी जवळून पाहिलं आहे. त्यामुळे मग मीही सामाजिक क्षेत्रात काम करण्याचा, अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला. तुम्ही लँकॅस्टर युनिव्हर्सिटीमधून तुमचं शिक्षण पूर्ण केलं. तो कोर्स कसा होता ? त्या अनुभवांविषयी काही सांगता का ? रोहिणी देशमुख : 1996 ला मी इंग्लंडमध्ये मास्टर्स करायला गेले. त्यावेळी लँकॅस्टर युनिव्हर्सिटीत ' पीस स्टडीज अ‍ॅण्ड कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन ' या अभ्यासक्रमाची नुकतीच कुठे सुरुवात झाली होती. डिप्लोमॅटिक प्रॅक्टिस , कॉन्फ्लिक्ट रिझॉल्युशन, निगोसिशन्स हे त्या अभ्यासक्रमाचे काही भाग आहेत. हा अभ्यासक्रम शिकवताना आधी या विषयांची माहिती दिली जाते. नंतर त्या विषयांवर काम कसं करायचंी याचं प्रात्याक्षिकांसहित प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण चालू असतानाच तिथल्या एका स्थानिक सामाजिक संस्थेसाठीही मी काम केलं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात निगोसिशन कसं करतात, याचा अनुभव मला मिळाला. म्हणजे मला थिअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही अनुभवांनी समृद्ध होता आलं. युएनएचसीआरतर्फे तुमचं पोस्टिंग इथिओपिआत झालं आहे. तुमच्या कामाचं नेमकं स्वरूप आहे तरी काय ?रोहिणी देशमुख : निर्वासितांचं संरक्षण करणं हे युएनएचसीआरचं प्रमुख काम आहे. संरक्षणाबरोबरीनं या निर्वासितांच्या छावण्यांना जीवनपयोगी वस्तू पुरवण्याचं, त्यांच्या देखभालीचं कामंही युएनएचसीआरतर्फे केलं जातं. युएनएचसीआर राजकीय पातळीवरही काम करते. राजदूत, पराराष्ट्रमंत्री, मंत्री यांना निर्वासितांच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल सांगणं, या निर्वासितांना स्वगृही घेऊन जाण्यास सांगणं, त्यांना मदत करण्यासाठी तयार करणं सारखी कामं युएनएचसीआरतर्फे केली जातात. आम्हाला राजकीय आणि सामाजिक अशा दोन्ही पातळींवर काम करावं लागतं. आमचं काम आंतरराष्ट्रीय असतं. तुमचं काम हे जागतिक पातळीवर चालतं. या ग्लोबल वर्क एन्व्हारमेंटमध्ये करताना तुम्हाला अनेक देशांतली लोक भेटतात. या सगळ्याचा तुमच्यावर कसा परिणाम झाला. तुम्ही स्वत:ला कसं या प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेतलंत ?रोहिणी देशमुख : मला तसा फारसा त्रास झाला नाही. कारण आपल्यला भारतात कोणाशी कसं बोलावं, कसं वागावं यांचं शिक्षण द्यायला कोणी लागत नाही. तर आपण ते आपसुकच शिकतो. तसंच मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात एकमेकांशी कसं मिळून मिसळून रहायचं हे शिकल्यानं तिथल्या वातावरणाशी जुळून घेण्यास वेळ लागला नाही. युएनमध्ये काम करणारी भारतीय माणसं ही फार थोडी आहेत. त्यात मराठी माणसांची नावं क्वचित् ऐकायला मिळतात. युएनमध्ये डिप्लोमॅटिक स्तरावर पॉलिसी मेकिंगमध्ये मराठी माणसाला जायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे ?रोहिणी देशमुख : मी तुम्हाला माझंच उदाहरण देते. कॉलेजमध्ये असतानापासूनच मी इंटरनॅशनल अफेअर्समध्ये चौकस असायची. त्या दृष्टीनं मी वाचनही केलं आहे. टाइम मेगेझिन वाचायचे. निरनिराळीआंतराराष्ट्रीय मासिकं, पाक्षिक वाचायचे. देश आणि देशाच्या बाहेर घडणा-या घडामोडींबाबत चौकस होते. निरनिराळ्या राजकीय विश्लेषणांचाही मी अभ्यास केला आहे. एम.ए. करताकरता मी हे सगळं चालू ठेवलं होतं. परदेशी भाषांचाही उपयोग होते. लँकॅस्टर युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स डीग्री घेत असताना फ्रेंच भाषेचा अभ्यास करायला सुरुवात केला. त्याचाही मला फायदा झाला. मुंबईत राहून मी आंतरराष्ट्रीय घडामोडींचाही अभ्यास सुरू ठेवला. स्वत:ला खूप अपडेट ठेवलं.रोहिणी तुम्ही निर्वासितांबरोबर काम करतात. तर तुमच्या कामाचं स्वरूप हे फक्त इथिओपियापुरतंच मर्यादित आहे का ?रोहिणी देशमुख : नाही. युएनएचसीआरच्या कामाचं मुख्य केंद्र हे इथिओपिआत आहे. पण आमाचं काम हे आफ्रिकेतल्या निर्वासितांसाठी चालतं. तिथून मिळणा-या माहितीचं आम्ही विश्लेषण करतो. मग युएनच्या बैठकांमध्ये, आफ्रिकन युनियनच्या बैठकांमध्ये जेव्हा पॉलिसी मेकर्स येतात, नेते येतात त्यांना आम्ही माहिती पुरवतो. तिथे मग निर्वासितांच्या निरनिराळ्या मागण्या, गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे उत्तम पद्धतीनं इंग्रजीतून बोलता येणं, लिहिता येणं गरजेचं आहे. कारण इंग्रजीही आंतरराष्ट्रीय भाषा झाली आहे. इंग्रजी भाषेबरोबरीनं फ्रेंच, स्पॅनिश, रशियन, अरेबिक आणि चायनीज यापैकी कोणतीही एक युएन भाषा येणं गरजेचं आहे. युएनमध्ये करिअर करण्यासाठी भाषेबरोबरीनं अजून काय लागतं ? रोहिणी देशमुख : युएनमध्ये इतर जे देश आहेत, त्या देशांच्या सरकारची ज्युनिअर प्रोबेशनल ऑफिसरची योजना असते. या योजनांच्या माध्यमांतून तरुण मुलामुलींना युएनमध्ये कामाचा अनुभव घेण्यासाठी पाठवलं जातं. सध्या भारतात आपल्याकडे युएनची योजना नाहीये. तर भारतात तशी योजना होणं आवश्यक आहे. असं जर झालं तर युएनमध्ये पॉलिसी मेकिंग या क्षेत्रात मोठमोठ्या पदावर भारतीयांना काम करण्याची संधी मिळू शकते. भारतसरकारने आपल्याकडच्या मुलांना ही संधी द्यायला पाहिजे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 16, 2009 06:15 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 16, 2009 06:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close