S M L

फिल्ममेकर राही अनिल बर्वे

यूथ ट्यूबच्या या भागात आपण भेटलो राही अनिल बर्वेला. राही लेखक आहे, तो उत्तम अ‍ॅनिमेशन करतो आणि तो फिल्ममेकरही आहे. पण एवढं सगळ त्याला कसं काय जमलं ? राही म्हणाला "बारावीला मी नापास झालो. आणि मग करायला काही नव्हतं. मग मी 15 व्या वर्षी काम करायला सुरुवात केली. बराच फिरलो, अ‍ॅडव्हान्स कॉम्प्यूटर ग्राफिक्सचा कोर्स केला. मग मला परत बारावी द्यावीशी वाटली नाही. कारण शिकून काय करणार ? सायकॉलॉजी ? तर सायकॉलॉजिस्ट बनायचं नव्हतं. कॉमर्स करायचं तर अकाउंट्समध्ये जायचं नाही. नोकरी तर अजिबात करायची नाही. मग एवढी वर्ष 'सो कॉल्ड' शिक्षण का घ्यायचं ? त्यापेक्षा मी त्याचा अभ्यास केला जे मला करायचं होतं "अ‍ॅनिमेशनमध्ये राहीला रंगांनी भुरळ घातली. त्या वेळेस भारतात हे सगळं नवीन होतं आणि तेच राहीला सर्वात जास्त आवडलं. भारतातली अगदी बेसिक टेक्नॉलॉजीही राहीला आवडली. मग राहीनं सगळे प्रॉडक्शन हाऊसेस पालथे घातले आणि त्यातनं राही शिकत गेला. मग त्यानं त्याचा आवडता उद्योग करायला घेतला - 'फिल्म मेकिंग' राहिला भिडणार्‍या फिल्म्स जराशा वेगळ्या असतात. 'सिटी ऑफ गॉड', 'डेव्हिड लिंच' 'स्टॉकर' या राहीच्या आवडत्या फिल्म्स. "मला माझ्या पद्धतीच्या फिल्म्स आवडतात. म्हणजे त्या काही खूप दर्जेदार वगैरे असतात असं मला म्हणायचं नाही, पण मला भिडणार्‍या फिल्म्स थोड्याशा वेगळ्या असतात" असं राहीनं सांगितलं.राहीच्या मते फिल्म मेकिंग म्हणजे टीम वर्क. "सगळे जण एका फिल्मसाठी एकत्र आले असतात. त्यांना गाईड करायचं असतं, त्यांच्याकडून शिकायचं असतं, त्यांना शिकवायचं असतं. पण फिल्म पूर्ण झाल्यावर विरघळणंही तितकच महत्त्वाचं असतं" असं राहीनं सांगितलं. 'मांजा' ही राहीची पहिली फिल्म. 750 बकार्डीच्या अमलाखाली तो लिहून झाला, असं राहीनं सांगितलं. अर्थात हे काही इतकं सोपं नव्हतं. मांजाची ओरिजनल लांबी होती अडीच तास. पण प्रोड्युसर मिळेना. मग माझ्या जिमनॅस्टिकच्या सरांनीच तो प्रोड्यूस केला. "मला असं अजिबात वाटलं नाही की मी हा पहिल्यांदा बनवतोय. आम्हाला माहीत होतं की मांजा कदाचित कुठेच प्रदर्शित होणार नाही, कोणालाच दिसणार नाही. पण आम्ही तो 'कोणासाठी' असा बनवतच नव्हतो. पण आम्ही त्या काळात अतिशय डिप्रेस होतो. आणि 'मांजा' हा आमच्यासाठी त्यावरचा उपाय होता" असं राहीनं सांगितलं.मांजाच्या वेळी राहीचा क्रू होता फक्त सात जणांचा. राही, त्याचा मित्र हेमंत, त्याच्या बहिणीचा नवरा दीपक, दीपकनं रस्त्यावरून उचलेली लहान मुलगी गौरव आणि राहीचे अ‍ॅक्टर्स. ज्या भागात दिवसा जाणं पण धोक्याचं असतं, अशा भागात राहीनं 'मांजा' शूट केला. सात दिवस ती लहान मुलगी सोडून कोणीच झोपलं नव्हतं. सात दिवसात दिवस रात्र जागून फिल्म पूर्ण केली. त्या काळात रात्री तीन वाजता सडकून मारही खाल्ला. राहीची बिग बजेट फिल्म 'तुंबाड' फ्लोअरवर गेली आहे, लवकरच ती प्रेक्षकांसमोर येईल. "जगात दोन प्रकारची माणसं असतात" राही सांगत होता "जगात दोन प्रकारची माणसं असतात. जी काहीतरी बनायला येतात आणि दुसरी ती जी काहीतरी बनवायला येतात. मी दुसर्‍या प्रकारात मोडतो. मला एवढं माहितीय मला जे करावसं वाटतंय, ते मी करतोय. मी मांजा बनवला तेव्हा मला नेमकं काय करायचय, हे मला माहीत नव्हतं. ती फिल्म कशीही असेल, मांजासाठी मी जी मेहनत केली, तेवढी मेहनत मी माझ्या सगळ्या आयुष्यात केली नव्हती. तुंबाड नी मला बरच काही शिकवलंय, बरच काही शिकणं बाजूला आहे.""पुढल्या 20 वर्षांचा विचार करून आज जे काही माझ्यात धुमसतंय, ते मी करत नसेन आणि त्यालाच जर करिअर म्हणत असतील, तर ते गेलं तेल लावत. मला एवढं माहीतीय की आत्ता मला जे करावसं वाटतंय ते मी करत असेन, तर 20 वर्षांनंतरही मी काही ना काही करतच असेन" एवढ्या सोप्या शब्दात राहीनं करिअरचा अर्थ सांगितला. राहीबरोबरच्या या मनमोकळ्या गप्पा तुम्ही सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करून पाहू शकता

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2008 04:24 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2008 04:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close