S M L

गप्पा मिलिंद साधले आणि मधुरा कुंभारशी (भाग : 1)

' सलाम महाराष्ट्र 'मध्ये कृषीतज्ज्ञ मिलिंद साधले आणि गायिका मधुरा कुंभार आले होते. 23 डिसेंबर हा दिवस जागतिक किसानदिन म्हणून ओळखला जातो. त्यानिमत्ताने कृषीतज्ज्ञ मिलिंद साधले ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आले होते. मिलिंदची ' निमित्य अ‍ॅग्रीकल्चरल फिल्म ' ही संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ते शेतीशी संबंधित वेगवेगळ्या विषयांच्या डॉक्युमेंटरीज तयार करतात. शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उद्योग यासंबंधातल्या 50 डॉक्युमेंटरीज त्यांनी केल्या आहेत. या फिल्म्स त्यांनी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून, अ‍ॅग्रीकल्चरल फिल्म महोत्सवातून शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आपल्या आगळ्यावेगळ्या संस्थेविषयी मिलिंद साधले सांगतात, " इतर क्षेत्रात जसे झपाट्यानं बदल होत आहेत, तसे बदल शेती क्षेत्रातंही होत आहेत. हे बदल शेतक-यांपर्यंत जेवढ्या वेगानं पोहोचायला हवे आहेत, तेवढ्या वेगानं पोहोचत नाहीयेत. हे तंत्रज्ञान प्रसाराचं काम ' निमित्य ' ही संस्था गेली 5 वर्षं करत आहे. शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी आम्ही शेतीशी निगडीत डॉक्यमेंट्री बनवतो. कृषी पदवीधरांनी एकत्र येऊन या ' निमित्त ' ची स्थापना केली आहे. आमची संस्था आतापर्यंत 1 लाख शेतक-यांपर्यंत पोहोचलेली आहे. " कृषीतज्ज्ञ मिलिंद साधले यांनी रिळांमध्ये बंदिस्त केलेले निरनिराळे प्रयोग, प्रतिकूल परिस्थितींवर मात करून नवारुपाला आलेले शेतकरी, काही नपीक जमिनींची कथा ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये सांगितली. सलाम महाराष्ट्रमध्ये गायिका मधुरा कुंभारचीही गाणी ऐकायला मिळाली. शास्त्रीय संगीताबरोबरच ती सुगम संगीताचाही स्वतंत्र अभ्यास करत आहे. गायिका अशा भोसले या तिच्या आदर्श आहेत. सध्या कॉलेजचं शिक्षण पूर्ण करता करता ती गाण्याकडेही एक प्रोफेशन म्हणून बघते आहे. आपल्या संगीतप्रवासाविषयी मधुरा सांगते, " दोन वर्षांपूर्वी गाण्याचा करिअर म्हणून विचार झाला. तेव्हा मी ' सारेगमप ' मध्ये पहिल्यांदा गायले होते. तिकडे गाऊनच मी गाण्यात करिअर करू शकते हे माझ्या लक्षात आलं. तेव्हापासून गांभीर्यानं गाण्याचा अभ्यास करत आहे. " मधुरा कुंभारने ' सलाम महाराष्ट्र 'मध्ये आशाबाईंची गाणीही पेश केलीत. कृषीतज्ज्ञ मिलिंद साधले आणि गायिका मधुरा कुंभार यांच्या गप्पा ऐकण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 07:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 07:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close