S M L

बातचीत प्रशांत दामले आणि परी तेलंगबरोबर

2008 ला 15 ऑगस्टला ' ओळख ना पाळख ' हे नाटक आहे. या नाटकाने अभिनेते प्रशांत दामले यांना निर्माता ही वेगळी ओळख मिळवून दिली आहे. प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका या नाटकात आहे. मुख्य म्हणजे येत्या 25 डिसेंबरला या नाटकाचे शंभर प्रयोग पूर्ण होत आहेत. किमया प्रशांत दामले यांनी कशी काय साधली, या नाटकाचे त्यांचे काही अनुभव यावर प्रशांत दामले आणि नाटकाची मुख्य अभिनेत्री परी तेलंग यांच्याशी चर्चा केली. प्रशांत दामले सांगतात, " निर्माता म्हणून काम करणं हा माझ्या दृष्टीनं अतिशय कठीण टास्क होतं. याचा अनुभव तो जॉब करायला घेतल्यावर आला. ज्यावेळेला मी कलाकार होतो त्यावेळेला इतर निर्मात्यांनी आखलेल्या प्रयोगांवर मी काम करत होतो. जेव्हा मी निर्माता म्हणून उभा राहिलो तेव्हा अभिनय, निर्मिती आणि ग्रुप सांभाळणं या तिनही गोष्टी एकाचवेळी कराव्या लागातात. सुरुवातीला थोडासा त्रास झाला पण दौ-यांची, प्रयोगांची आखणी नीट केल्यानं कुठे त्यात गडबड झाली नाही. फक्त त्यात्या वेळी त्यात्या गोष्टी घडतायत की नाही यावर लक्ष ठेवावं लागलं. 15 जुलैला तालमी सुरू केल्या आणि 15 ऑगस्टला नाटक उभं राहिलं." निर्माता प्रशांत दामलेंबरोबर काम करण्याचा परी तेलंगचा अनुभव चांगला होता. " अभिनेता म्हणून त्यांनी आधी भरपूर कामं केलं आहे. त्यामुळे त्यांना कलाकारांच्या काय काय समस्या असतात हे चांगलंच ठाऊक आहे. त्यांनी प्रत्येकाची काळजी घेतलेली आहे. ती घेऊन प्रत्येकाला त्यांच्या अभिनयावरही टीप्स दिल्या आहेत. " प्रशांत दामले आणि परी तेलंगबरोबर यांच्याबरोबरच्या गप्पांचा सिलसिला व्हिडिओवर ऐकता येईल .

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2008 11:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2008 11:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close