S M L

गप्पा अशोक सराफ आणि संजय सूरकरांशी (भाग : 3)

सेन्सॉर बोर्ड अनेकदा सिनेमात कट्स सुचवतं. पण ' मास्तर एके मास्तर ' हा सिनेमाच प्राथमिक फेरित सेन्सॉर बोर्डानं रिजेक्ट केला आहे. ' मास्तर एके मास्तर ' हा सिनेमा आहे शिक्षण क्षेत्रावर आधारित आहे. सिनेमात एक वर्गी शाळा मास्तर त्याच्या चालाखीने आणि कृत्याने शिक्षण सम्राट बनतो. ते ब्लॅक कॉमेडीनं दाखवलं आहे. पण या सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाकडून प्राथमिक फेरीत बंदी घालण्यात आल्याने सिनेमातले कलाकार आणि दिग्दर्शकांची पंचाईत झाली आहे. कलाकारांची बाजू काय आहे ते मांडण्यासाठी सिनेमाचे मुख्य कलाकार अशोक सराफ आणि दिग्दर्शक संजय सूरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. ' मास्तर एके मास्तर 'मधल्या मास्तरवर सेन्सॉर बोर्डानं गैर व्यवहारी, स्त्रीलंपट, काळी कृत्य करणारा असे अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपांविषयी सिनेमाचे दिग्दर्शक संजय सूरकर सांगतात, "सिनेमातला मास्तर हा गावातला सर्वसामान्य माणूस असतो. तो सरकारच्या नियमांचा गैरफायदा घेऊन पुढे पुढे जात असतो. हा मास्तर कधीच भ्रष्टाचार करत नाही. तो कधीच शाळेतले पैसे खात नाही. शाळेच्या फायद्यासाठी जे काही करता येईल ते हा मास्तर स्वत:च्या अक्कल हुशाारीनं करतो. शाळेची इमारत बांधण्यासाठी शाळेतले इतर शिक्षक पाचवर्षांत 25 हजार रुपये जमवतात. पण हा एक वर्गी शाळा मास्तर दोन महिन्यात 15 ते 20 लाख रुपये जमवण्याचं वचन देतो आणि ते सगळं प्रामाणिकपणे पूर्ण करतो. सिनेमात ब्लॅक कॉमेडी आहे. अनेक वर्षांपासून विनोदी चित्रपट केला नव्हता. त्यामुळे अशा वेगळ्या ढंगाचा सिनेमा मी तयार केला आहे. त्यात मला अशा प्रवृत्तीचा मास्तर दिसला. ग्रामीण भागातल्या शैक्षणिक संस्था, शाळा कशा चालतात हे शहरी भागातल्या लोकांना मी माझ्या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. " अशोक सराफ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर बोलले. प्रबोधन म्हणजे काय तर वाईट गोष्टी करू नये हे सांगणं.जर प्रबोधन करायला मिळालं नाही तर वाईट गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहचणार तरी कशा? अशोक सराफ यांनी मुलाखतीत विचारला. संजय सूरकर आणि अशोक सराफ यांची ' मास्तर एके मास्तर ' या सिनेमाची मुलाखत व्हिडिओवर पाहता येईल

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2008 01:16 PM IST

गप्पा अशोक सराफ आणि संजय सूरकरांशी  (भाग : 3)

सेन्सॉर बोर्ड अनेकदा सिनेमात कट्स सुचवतं. पण ' मास्तर एके मास्तर ' हा सिनेमाच प्राथमिक फेरित सेन्सॉर बोर्डानं रिजेक्ट केला आहे. ' मास्तर एके मास्तर ' हा सिनेमा आहे शिक्षण क्षेत्रावर आधारित आहे. सिनेमात एक वर्गी शाळा मास्तर त्याच्या चालाखीने आणि कृत्याने शिक्षण सम्राट बनतो. ते ब्लॅक कॉमेडीनं दाखवलं आहे. पण या सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सॉर बोर्डाकडून प्राथमिक फेरीत बंदी घालण्यात आल्याने सिनेमातले कलाकार आणि दिग्दर्शकांची पंचाईत झाली आहे. कलाकारांची बाजू काय आहे ते मांडण्यासाठी सिनेमाचे मुख्य कलाकार अशोक सराफ आणि दिग्दर्शक संजय सूरकर यांच्याशी चर्चा करण्यात आली.

' मास्तर एके मास्तर 'मधल्या मास्तरवर सेन्सॉर बोर्डानं गैर व्यवहारी, स्त्रीलंपट, काळी कृत्य करणारा असे अनेक आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपांविषयी सिनेमाचे दिग्दर्शक संजय सूरकर सांगतात, "सिनेमातला मास्तर हा गावातला सर्वसामान्य माणूस असतो. तो सरकारच्या नियमांचा गैरफायदा घेऊन पुढे पुढे जात असतो. हा मास्तर कधीच भ्रष्टाचार करत नाही. तो कधीच शाळेतले पैसे खात नाही. शाळेच्या फायद्यासाठी जे काही करता येईल ते हा मास्तर स्वत:च्या अक्कल हुशाारीनं करतो. शाळेची इमारत बांधण्यासाठी शाळेतले इतर शिक्षक पाचवर्षांत 25 हजार रुपये जमवतात. पण हा एक वर्गी शाळा मास्तर दोन महिन्यात 15 ते 20 लाख रुपये जमवण्याचं वचन देतो आणि ते सगळं प्रामाणिकपणे पूर्ण करतो. सिनेमात ब्लॅक कॉमेडी आहे. अनेक वर्षांपासून विनोदी चित्रपट केला नव्हता. त्यामुळे अशा वेगळ्या ढंगाचा सिनेमा मी तयार केला आहे. त्यात मला अशा प्रवृत्तीचा मास्तर दिसला. ग्रामीण भागातल्या शैक्षणिक संस्था, शाळा कशा चालतात हे शहरी भागातल्या लोकांना मी माझ्या सिनेमाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. " अशोक सराफ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर बोलले. प्रबोधन म्हणजे काय तर वाईट गोष्टी करू नये हे सांगणं.जर प्रबोधन करायला मिळालं नाही तर वाईट गोष्टी ह्या लोकांपर्यंत पोहचणार तरी कशा? अशोक सराफ यांनी मुलाखतीत विचारला. संजय सूरकर आणि अशोक सराफ यांची ' मास्तर एके मास्तर ' या सिनेमाची मुलाखत व्हिडिओवर पाहता येईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2008 01:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close