S M L

यंगिस्तानचे हिरो

युथ ट्यबचा हा भाग म्हणजे न्यू इयरच्या उंबरठ्यावरचा भाग. आणि न्यू इयर म्हटलं की नवीन वर्षाचे संकल्प आलेच. अर्थात हे संकल्प पाळण्यापेक्षा मोडण्यासाठीच केले जातात. पण याचं कारण तुम्ही कधी शोधलंय ? कारण आपण नवीन वर्षाचे संकल्प करतो ते इतरांचं ऐकून. म्हणजे काय ? तर आपण ठरवतो, 'मी खूप अभ्यास करणार', 'लेक्चर्स सिरीयसली अटेंड करणार', 'जिम जॉइन करणार' वगैरे वगैरे... पण यातलं खरच काय आपल्या उपयोगाचं असतं ? याचा कधी विचार कलायत ? नसाल केलात तर आता करा. कारण युथ ट्युबच्या आमच्या खास दर्शकांसाठी आम्ही घेऊन आलोयत मान्यवर लोकांचे करियरमधले अनुभव.हा मान्यवर शब्द खूप जड वाटतो ना ? पण घाबरू नका. आम्ही काही तुम्हाला ग्यान वाटणार नाही... तरुणाईतल्याच यशस्वी लोकांचे अनुभव तुम्हाला ऐकवणार आहोत. ही माणसं आपल्यातलीच आहेत, पण असाच काही तरी 'हट के' संकल्प करून, रुळलेल्या वाटा सोडून त्यांनी आपली करियर नेहमीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात घडवली आणि आज ते टॉपवरही पोहचले आहेत! कोण आहेत ही माणसं ? तर आत्तापर्यंत युथ ट्युबमध्येच आलेले हे 'युथ आयकॉन्स' आहेत!या भागात आहे आंतरराष्ट्रीय डी. जे. मेघा कवळेला. ती सांगते "जगाची पर्वा करू नका. तुम्हाला विश्वास असेल की आपण योग्य वाटेवरून चाललोय, तर प्रवास थांबवू नका."'द्रोणा' चा हीट संगितकार ध्रुव घाणेकर म्हणाला "मी सहजच संगिताकडे वळलो. पण त्यावेळेस माझा आवाज फाटला होता. मग मी गिटार वाजवायला लागलो. आणि मग त्यात पूर्ण गुंतून गेलो. मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं आरामात चाललं आहे, तेव्हा ताबडतोब सावध व्हा आणि चॅलेन्जेस स्वीकारायला तयार व्हा" फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे म्हणाला "बाहेरनं फॅशन वर्ल्डकडे बघताना ते गलॅमरस वाटतं. पण त्यामागची मेहनत दिसत नाही. त्यांना टीव्हीवर झळकणारी काही स्टार्स दिसतात. पण आत आल्यावर कळतं की जेव्हा या लोकांनी दिवसभरात वीस-वीस तास काम केलंय, तेव्हा ते इथे पोहचलेत"फॅशनचा सिनेमेटॉग्राफर महेश लिमये टिपिकल मराठमोळ्या वातावरणातून या क्षेत्राकडे गेलाय. आपल्या प्रवासाविषयी सांगताना तो म्हणाला "जर तुम्हाला काय करायचय हे माहित असेल तर कितीही मोठं काम आणि मोठी माणसं असतील तरी फरक पडत नाही"एम टीव्हीचा क्रिएटिव डायरेक्टर आशिष पाटील म्हणाला "असमजुतदार लोकं ती असतात जी स्वत:ला बदलायच्या ऐवजी आजुबाजूचं वातावरण बदलतात. जगात जे काही परिवर्तन झालं असेल तर अशा हट्टी लोकांमुळेच झालं आहे. तेव्हा हट्टी बना"प्रसिद्ध मॉडेल मुग्धा गोडसे सांगते "तुम्हाला जे बनायचंय ते बनू शकता, पण इच्छाशक्ती हवी. आणि वेगळ्या वाटेवर जाताना तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट नसेल, तर त्यांना हा विश्वास द्या की मी हे करू शकतो'रेडिओची मल्लिका मलिष्का सांगते "मीडियामध्ये टिकायचं असेल, तर तुमच्या दर्शकांची मानसिकता समजून घ्या. त्यांच्यातलेच एक बना"'लो वर्ल्ड वाईल्ड' या जगप्रसिद्ध ऑड कंपनीचा अमेरिकेतील क्रिएटिव हेड राज कांबळे म्हाणाला "आयडियाज कुठेही भेटू शकतात. कधी चणेवाल्याकडे, कधी सिनेमा हॉलमध्ये, कधी खाली पडल्यावर, कधी खूप आनंदात असताना तर कधी अगदी सहजच, तर कधी बाथरूममध्ये. म्हणूनच बाथरूमला त्याने नवीन नाव दिलं आहे - ' सोचालय ' ' माझ्या मते आयडिया म्हणजे जगणं. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे पहाता, यावर आयडिया अवलंबून असतात."आयआयटी, आयआयएम, नोकरी, लेखन... या सार्‍या प्रवासाबद्दल बोलताना चेतन म्हणाला "हा कोणत्याही सर्वसामान्य भारतीय मुलाचा प्रवास आहे. लहानपणी इंजिनिअरिंगला गग्लॅमर होतं, तेव्हा इंजिनिअरिंग केलं. मग लोकांनी सांगितलं की आता इंजिनिअरिंगला किंमत नाही, एमबीए कर. मग एमबीए केलं. मग नोकरीही केली... पण एका क्षणी लक्षात आलं की हे मला करायचं नाही. पुढे मला नातेवाईक किंवा शेजारी माझ्या मदतीला येणार नाहीत. मला गोष्ट सांगायची होती, मग मी लेखनाकडे वळलो." यंगिस्तानच्या या हिरोजचे अनुभव ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2008 12:41 PM IST

युथ ट्यबचा हा भाग म्हणजे न्यू इयरच्या उंबरठ्यावरचा भाग. आणि न्यू इयर म्हटलं की नवीन वर्षाचे संकल्प आलेच. अर्थात हे संकल्प पाळण्यापेक्षा मोडण्यासाठीच केले जातात. पण याचं कारण तुम्ही कधी शोधलंय ? कारण आपण नवीन वर्षाचे संकल्प करतो ते इतरांचं ऐकून. म्हणजे काय ? तर आपण ठरवतो, 'मी खूप अभ्यास करणार', 'लेक्चर्स सिरीयसली अटेंड करणार', 'जिम जॉइन करणार' वगैरे वगैरे... पण यातलं खरच काय आपल्या उपयोगाचं असतं ? याचा कधी विचार कलायत ? नसाल केलात तर आता करा. कारण युथ ट्युबच्या आमच्या खास दर्शकांसाठी आम्ही घेऊन आलोयत मान्यवर लोकांचे करियरमधले अनुभव.हा मान्यवर शब्द खूप जड वाटतो ना ? पण घाबरू नका. आम्ही काही तुम्हाला ग्यान वाटणार नाही... तरुणाईतल्याच यशस्वी लोकांचे अनुभव तुम्हाला ऐकवणार आहोत. ही माणसं आपल्यातलीच आहेत, पण असाच काही तरी 'हट के' संकल्प करून, रुळलेल्या वाटा सोडून त्यांनी आपली करियर नेहमीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात घडवली आणि आज ते टॉपवरही पोहचले आहेत! कोण आहेत ही माणसं ? तर आत्तापर्यंत युथ ट्युबमध्येच आलेले हे 'युथ आयकॉन्स' आहेत!या भागात आहे आंतरराष्ट्रीय डी. जे. मेघा कवळेला. ती सांगते "जगाची पर्वा करू नका. तुम्हाला विश्वास असेल की आपण योग्य वाटेवरून चाललोय, तर प्रवास थांबवू नका."'द्रोणा' चा हीट संगितकार ध्रुव घाणेकर म्हणाला "मी सहजच संगिताकडे वळलो. पण त्यावेळेस माझा आवाज फाटला होता. मग मी गिटार वाजवायला लागलो. आणि मग त्यात पूर्ण गुंतून गेलो. मला असं वाटतं की जेव्हा आपल्याला वाटतं की सगळं आरामात चाललं आहे, तेव्हा ताबडतोब सावध व्हा आणि चॅलेन्जेस स्वीकारायला तयार व्हा" फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे म्हणाला "बाहेरनं फॅशन वर्ल्डकडे बघताना ते गलॅमरस वाटतं. पण त्यामागची मेहनत दिसत नाही. त्यांना टीव्हीवर झळकणारी काही स्टार्स दिसतात. पण आत आल्यावर कळतं की जेव्हा या लोकांनी दिवसभरात वीस-वीस तास काम केलंय, तेव्हा ते इथे पोहचलेत"फॅशनचा सिनेमेटॉग्राफर महेश लिमये टिपिकल मराठमोळ्या वातावरणातून या क्षेत्राकडे गेलाय. आपल्या प्रवासाविषयी सांगताना तो म्हणाला "जर तुम्हाला काय करायचय हे माहित असेल तर कितीही मोठं काम आणि मोठी माणसं असतील तरी फरक पडत नाही"एम टीव्हीचा क्रिएटिव डायरेक्टर आशिष पाटील म्हणाला "असमजुतदार लोकं ती असतात जी स्वत:ला बदलायच्या ऐवजी आजुबाजूचं वातावरण बदलतात. जगात जे काही परिवर्तन झालं असेल तर अशा हट्टी लोकांमुळेच झालं आहे. तेव्हा हट्टी बना"प्रसिद्ध मॉडेल मुग्धा गोडसे सांगते "तुम्हाला जे बनायचंय ते बनू शकता, पण इच्छाशक्ती हवी. आणि वेगळ्या वाटेवर जाताना तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट नसेल, तर त्यांना हा विश्वास द्या की मी हे करू शकतो'रेडिओची मल्लिका मलिष्का सांगते "मीडियामध्ये टिकायचं असेल, तर तुमच्या दर्शकांची मानसिकता समजून घ्या. त्यांच्यातलेच एक बना"'लो वर्ल्ड वाईल्ड' या जगप्रसिद्ध ऑड कंपनीचा अमेरिकेतील क्रिएटिव हेड राज कांबळे म्हाणाला "आयडियाज कुठेही भेटू शकतात. कधी चणेवाल्याकडे, कधी सिनेमा हॉलमध्ये, कधी खाली पडल्यावर, कधी खूप आनंदात असताना तर कधी अगदी सहजच, तर कधी बाथरूममध्ये. म्हणूनच बाथरूमला त्याने नवीन नाव दिलं आहे - ' सोचालय ' ' माझ्या मते आयडिया म्हणजे जगणं. तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसे पहाता, यावर आयडिया अवलंबून असतात."आयआयटी, आयआयएम, नोकरी, लेखन... या सार्‍या प्रवासाबद्दल बोलताना चेतन म्हणाला "हा कोणत्याही सर्वसामान्य भारतीय मुलाचा प्रवास आहे. लहानपणी इंजिनिअरिंगला गग्लॅमर होतं, तेव्हा इंजिनिअरिंग केलं. मग लोकांनी सांगितलं की आता इंजिनिअरिंगला किंमत नाही, एमबीए कर. मग एमबीए केलं. मग नोकरीही केली... पण एका क्षणी लक्षात आलं की हे मला करायचं नाही. पुढे मला नातेवाईक किंवा शेजारी माझ्या मदतीला येणार नाहीत. मला गोष्ट सांगायची होती, मग मी लेखनाकडे वळलो."

यंगिस्तानच्या या हिरोजचे अनुभव ऐकण्यासाठी सोबतच्या व्हिडिओवर क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2008 12:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close