S M L

रिवाईंड 2008 - बिझनेस (स्टॉक मार्केट)

या सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडिंचे प्रतिसाद भारतीय शेअरबाजारातही उमटत होते. सेन्सेक्स यावर्षात तब्बल 57 टक्के घसरला. मोठमोठ्या स्टॉक्सनी यावर्षी त्यांच्या आतापर्यंतच्या सर्वात लोएस्ट लेव्हल्स पाहिल्यात . एक नजर टाकूयात स्टॉकमार्केट्सच्या प्रवासावर....2008 शेअरमार्केटसाठी एक रोलर कोस्टर राईड वर्ष ठरलं.याच वर्षात इन्वेस्टर्सनी ऐन जानेवारीतच दिवाळी साजरी केली जेव्हा सेन्सेक्सनं एकवीस हजाराच्या लेव्हलला स्पर्श केला होता आणि याच वर्षाअखेर आज सेन्सेक्सला 10 हजारांच्या वर येण्यासाठीदेखील धडपड करावी लागतेय. 10 जानेवारी 2008, ज्या दिवशी सेन्सेक्स 21,206 वर होता आणि निफ्टीनंही याच वेळी सहा हजारांचा पलीकडचा टप्पा गाठला होता. मात्र अवघ्या तेरा दिवसातच म्हणजे 21 जानेवारी 2008ला मार्केट खुलं झाल्यानंतर काही क्षणांतच 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आणि 1 तास सर्किट लागून मार्केट बंद ठेवावं लागलं. यादिवशी सेंसेक्स 1,408 पॉइंट खाली बंद झाला. 22 जानेवारीलाही सेंसेक्स एकूण 2,273 पॉइंट खाली गेला. त्यानंतर मार्केट रिकव्हर तर झालं पण इंडेक्सची घसरगुंडी सुरू झाली ती आजतागायत कायमच राहिली. सेन्सेक्सची अधोगती1 जानेवारी 2008 21,3018 जानेवारी 2008 20,87310 जानेवारी 2008 21,2065 मे 2008 17,4919 जुलै 2008 15,06615 सप्टेंबर 2008 13,53129 सप्टेंबर 2008 12,5006 ऑक्टोबर 2008 11,80116 ऑक्टोबर 2008 10,58117 ऑक्टोबर 2008 9,97524 ऑक्टोबर 2008 8,70127 ऑक्टोबर 2008 8,150 19 डिसेंबर 2008 10,100वर्षभरातल्या सेंसेक्सच्या अधोगतीवर बोलताना मार्केटतज्ज्ञ एस. पी. तुलसीयन म्हणतात, " तुमचं टाइम होरायझन पक्कं असेल की तुम्ही मर्केटमध्ये सहजच साधारणपणे वर्षभर तरी मार्केटमध्ये तग धरू शकता. कारण भारतीय बाजारपेठेत तशी संधी आपल्याला मिळणार आहे. भारतातली शुगर इंडस्ट्री, बँकिंग सेक्टरला फारसा धोका नाहीये. " अमेरिकेतल्या हाऊसिंग सेक्टरमधून सुरू झालेल्या सबप्राईम संकटाचे पडसाद आंतराष्ट्रीय मार्केट्समध्ये उमटले. अमेरिकेसह रशिया, जपान, चीन, ब्राझील,कोरिया अशा अनेक देशांच्या स्टॉकमार्केट्सना तग धरणं कठीण होऊन बसलं. भारतासह आशिया आणि युरोपमधल्या अनेक देशांमध्ये स्टॉकमार्केट्स कोसळणं ही नित्याचीच गोष्ट झाली. ब्राझिल, रशियाला तर दोन दिवसांसाठी मार्केट ट्रेडिंग बंद ठेवावं लागलं. जागतिक शेअरबाजारांमधल्या या घडामोडींनी भारतीय इंडेक्सेसना देखील अस्थिर ठेवलं. काही वेळा तर पडझड इतकी वाढली की ट्रेडिंगवर सर्किट लावावं लागेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. मार्च-एप्रिलमध्ये कंपन्यांचे दुसर्‍या तिमाहीचे रिझल्ट्स आले पण त्यांनीही मार्केटला विशेष प्रोत्साहन दिलं नाही. " साधारण ज्यावेळेला मार्केटमध्ये 20, हजार इंडेक्स होता त्यावेळेस मी गुंतवणूक केली होती आणि आता ज्यावेळेला 10 हजार 600 इंडेक्स आहे तेव्हा माझ्याकडे अडीच लाखांपैकी 46 हजार रुपये शिल्लक आहेत. बाजारपेठेत एवढं 70 टक्क्यांचं डिप्रेशन झालेलं आहे, " ही प्रतिक्रिया आहे संजय नावाच्या एका गुंतवणूकदाराची. यावरून बाजारपेठेच्या परिस्थितीचा अंदाज येतो. जुलै महिन्यात संसदेत नोटांची बंडलं आणली गेली आणि एकवीस जुलैला संसदेत विश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरू झाली आणि मार्केटमध्येदेखील सरकार राहणार की पडणार याबाबत चर्चा रंगल्या. पण एकूणच यादिवशी संसदेतल्या घडामोडींनी शेअरमार्केटचा इंडेक्सदेखील सतत हलता ठेवला. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या झाली आणि मार्केटमध्येदेखील सरकार राहणार की पडणार याबाबत चर्चा रंगल्या. पण एकूणच यादिवशी संसदेतल्या घडामोडींनी शेअरमार्केटचा इंडेक्सदेखील सतत हलता ठेवला. भारत आणि अमेरिका यांच्यातल्या अणुकरारादरम्यान शेअरमार्केटमध्येदेखील दबाव जाणवत होता. एकिकडे जागतिक मंदीमुळे सर्वच आंतराराष्ट्रीय मार्केट्समध्ये चिंतेचं वातावरण होतं. अमेरिकेत सातशे अब्जांचं बेलआऊट पॅकेज जाहीर झाल्यानंतरही भारतीय शेअरबाजारात फारसा फरक पडला नाही. " सध्या मार्केटमध्ये काय कधी होईल याची शाश्वती नाहीये. गुंतवणुकदारांनी आणि लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जोपर्यंत अधिकृतरित्या कोणती माहिती समोर येत नाहीये, " अशी माहिती मार्केट अ‍ॅनालिस्ट अशुतोष वखरे यांनी दिली. या वर्षातला ऑक्टोबर महिना शेअरमार्केट्ससाठी अत्यंत महत्वाचा ठरला. याच महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीनं नवे नीचांक बनवले. सेन्सेक्सचा बारा हजारांवरुन आठ हजारांवरचा प्रवास याच महिन्यातला...निफ्टीनंदेखील ऑक्टोबरमध्येच चार हजारांवरुन दोन हजारांची पातळी गाठली. रिझर्व्ह बँकेनं या वर्षात मार्केटमध्ये पतपुरवठा वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर्षी मंदीमुळे शेअरमार्केटमधून विदेशी वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर पैसा काढला गेला आणि मार्केट सुधारण्याच्या ऐवजी घसरत गेलं. याचवर्षी रिलायन्स इंडस्ट्री, रिलायन्स पॉवर, रिलायन्स कम्युनिकेशन,टिसीएस, सत्यम, एल अँड टी, टाटा मोटर्स,टाटा स्टील, एचडिएफसी, आयसीआयसीआय बँकेसारख्या अनेक बड्या बड्या स्टॉक्सनी त्यांचे ऑलटाईम लोज पाहिले. रिअल्टी,एव्हिएशन, आयटी, पॉवर अशा बहुतेक सार्‍या सेक्टर्ससाठी हे वर्ष नुकसानीचं होतं.एकूणच स्टॉकमार्केटचा या वर्षातला हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान उतरता प्रवास ठरला आहे. यावर गुंतवणुकतज्ज्ञ माझ्यामते भारतीय बाजारपेठेत जर 15 ते 20 टक्क्यांनी 2009मध्ये वाढ दिसून आली तर चांगलंच आाहे. भारतामध्ये आगामी 8 वर्षांत तरी पॉवर डफिशयन्सी होणार नाहीये. कारण नवीन न्युक्लिअर प्रकल्प लावले जात आहेत. नवीन न्युक्लिअर प्रकल्प लावले तर इन्फ्रास्ट्रक्चर लागणारच ना. तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरल ग्रोथ आणि पॉवर डेफिशियन्सीवर लक्ष दिलं तर सगळं काही साध्य होईल, असं मत गुंतवणूक तज्ज्ञ गणेश शानबाग यांनी व्यक्त केलं आहे. हे तर झालं स्टॉकमार्केटविषयी..अर्थातच 2009 साली सेन्सेक्स कुठपर्यंत जाऊन पोचेल हे आताच सांगता येणार नाही, पण अर्थव्यवस्थेसमोर काही आव्हानं आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 12:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 12:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close