S M L

रिवाईंड 2008 - विज्ञान तंत्रज्ञान आणि इन्फ्रास्ट्रक्चर

आतापर्यंत गर्भ प्रतिबंधक गोळ्या या फक्त महिलांसाठीच होत्या. पुरुषांना संतती नियमनासाठी नसबंदी शस्त्रक्रिया किंवा काँडमचा वापर करावा लागतो. पण अमेरिकेत ओख्लीहोमा विद्यापीठात केवीन मूर यांनी केलेल्या संशोधनामुळे येत्या काळात पुरुषांसाठीही संततीनियमन गोळ्या तयार होऊ शकतील. मूर यांनी हे संशोधन उंदरावर केलं आहे. " उंदराच्या स्पर्ममध्ये जे एनझायम म्हणजेच वित्तंचक असतात टीपीएस वन आणि टीपीएस टु ते दडपता येतील. सप्रेस करता येतील आणि त्यामुळे गर्भधारणा होणार नसल्याचं शोधून काढलंय. उंदराप्रमाणेच माणसातही तेच वित्तंचक असतात, " असं सेक्स मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. राजन भोसले यांचं म्हणणं आहे. हे एन्झाईम्स गर्भधारणेत नेमकी काय भूमिका बजावतात ? तर शरीरात असंख्य वित्तंचक असतात. त्यापैकी गर्भधारणेसाठी दोन उपयोगी पडतात. ज्यावेळी शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात जातो त्यावेळी त्याला भेदण्याचं काम हेवित्तंचक करतात आणि शुक्राणू जो पोहत पुढे प्रवास करत असतो तो सुद्धा हालचाल करायला या वित्तंचकामुळेच मदत होत असते. तो सप्रेस झाला तर शुक्राणू हलणार नाही आणि गर्भधारणा होणार नाही. पुरुषांसाठी गर्भप्रतिबंधक गोळ्या आतापर्यंत मिळत नसल्यानं कुटुंब नियोजनाचा सगळा भर हा महिलांवरच होता. पण या गोळ्या आल्या तर कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुरुषांचाही सहभाग होऊ शकेल. " या गोळ्यांनी पुरुषाच्या पौरुषात्वावर कसलाही परिणाम होणार नाही. यामुळे मोठी सामाजिक क्रांती घडेल, असं डॉ. राजन भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. गर्भधारणा होउ नये, यासाठी संशोधन यशस्वी झाल्यानंतर गोळ्या बाजारात यायला मात्र काही वर्ष वाट पहावी लागणार आहे. पुरुष गर्भ प्रतिबंधक गोळ्यांप्रमाणं स्टेम सेल्सवरचं संशोधनही यंदा गाजलं. स्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशीसंदर्भात कोल्हापूरमध्ये पुन्हा एक नवीन संशोधन करण्यात आलं आहे. गरोदरपणामध्ये सुमारे 20 टक्के स्त्रियांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो. त्यामुळे अवेळी होणारा गर्भपात, आई किंवा बाळाचा मृत्यू असे धोके त्यातून संभवतात. पण आईच्या हाडांमधल्या स्टेम सेल्स आईच्या वारेमध्ये सोडल्या तर हा आजार संपूर्ण बरा करता येणार आहे. डॉ. सतीश पत्की यांनी 15 स्त्रियांवर हा क्लिनिकल रिसर्च यशस्वी केला आहे. " पेशंटच्या स्वत:च्या बोन मॅरोमधुन किंवा मज्जा पेशीमधुन स्टेम सेलचा उपयोग करुन गरोदरपाणातील ब्लड प्रेशर अतीशय कमी होतं.असं सिद्ध करता आलेलं आहे.अता सद्या भारतामधेचं नव्ह तर जगामध्ये सगळ्या देशामध्ये गरोदरपनामध्ये वाढलेलं प्रेशर माता मृत्यु बाल मृत्युचं प्रमुख कारण आहे. हे जर उपचार केले तर बाल मृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी करता येईल, असं गायनॉकॉलिस्ट डॉ. सतीश पत्कींचं मत आहे. ही ट्रीटमेंट एक दिवसाची असते. गरोदरपणाच्या पाच ते सात महिन्याच्या काळात ती करता येते. स्त्रीच्या हाडांमधल्या 200 दशलक्ष स्टेम सेल्स गर्भाशयात इंजेक्शनने सोडल्या जातात. त्यासाठी सोनोग्राफी तंत्र वापरलं जातं. केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि पुण्याच्या पेशी विज्ञान संस्थेनेही डॉ. पत्की यांच्या या संशोधनामध्ये सहभाग घेतला आहे. 2008 हे वर्षं मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाचं मानावं लागेल. कारण या वर्षात मुंबईत वांद्रे वरळी सी लींकचा बांद्रा केबल स्टेज हा 600 मीटरचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. तर शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बरलींक हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पही योग्य त्या वेगाने पुढे सरकतोय. हे तीनही प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधेसाठी जेवढे महत्त्वाचे तेवढंच त्यांचं बांधकामही वैशिष्ट्यपूर्ण. या तीन्ही प्रकल्पाचा एक समान धागा म्हणजे यामुळे मुंबईच्या वाहतुकीवरचा ताण कमी होणारेय. गेल्या 40 वर्षात मुंबईच्या ट्रॅफीकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक अभ्यासगट नेमले गेले. त्यातल्या अनेकांनी मुंबईला असणार्‍या सागरी किनार्‍यावरून वाहतुकीचा पर्यायाची शिफारस केली. त्यामुळे Bandra Worli Sea Link हा महत्वाकांक्षी प्रकल्प अस्तित्वात आला. वर सध्यपारिस्थितीत असलेला ताण लक्षात घेता वरळी ते माहीम कॉजवे हे फक्त 8 किमीचं अंतर काप्मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एकमेव रस्ता म्हणजे माहीम कॉजवे. तेथे पोहचायला तब्बल 40 मि. लागतात. पण आता नव्याने तयार होणार्‍या 5.6 किमीच्या या Bandra Worli Sea Link मुळे या रहदारीचा ताण बराच कमी व्हायला मदत होणारेय. MSRDC चा हा प्रकल्प HCC आणि China Harbour Engineering Corporation या दोन कंपन्या साकारतायत. खरंतर एप्रिल 2008 मध्ये हा प्रकल्प पुर्ण होणं अपेक्षीत होतं. पण मे 2008 ला या प्रोजेक्टमधला महत्त्वाचा टप्पा असलेली 600 मी लांब असलेली बांद्रा केबल स्टेज पुर्ण झाली. यावर असणारे टॉवर हे 126 मी उंच आहेत. ज्यावरून कनेक्ट केलेल्या प्रत्येकी 500 मी लांबीच्या केबल्स 20 हजार टन वजन असलेल्या या स्टेजचा भार तोलून धरतील. 8 लेनच्या या ब्रीजच्या 2 लेन या फक्त बसेससाठी राखीव ठेवण्यात आल्यात. स्वयंचलित टोल गोळा करण्याची व्यवस्था हे या स्मार्ट ब्रीजचं एक वैशिष्ट्य असणारेय. तसंच या सीलिंकमुळे दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची इंधन बचत होणारेय. त्याचबरोबर ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईच्या आसपास मासेमारीला पूरक वातावरण तयार व्हायला मदत होईल असा विश्वास पर्यावरणवाद्यांना वाटतोय. तसंच अपघाताच्या प्रमाणात घट होऊन सुरक्षित प्रवास करणं मुंबईकरांना शक्य होणार आहे. " वांद्रे वरळी सीलींकप्रमाणेच शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लींक हा सुद्धा मुंबईच्या वाहतुकीत कमालीची सुधारणा घडवून आणणारा एक प्रकल्प आहे. यामुळे नवी मंुबई अगदी हाकेच्या अंतरावर असेल. पण सध्या तरी हा प्रकल्प काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलाय. जगातल्या मोठ्या ट्रान्स हार्बर लींकपैकी एक असणारा 4 ते 6 हजार कोटी रुपये अंदाजित किंमत असलेला 22 किमीचा हा प्रकल्प. याचं काम डिसेंबर 2008 मध्ये सुरू होऊन 2013 मध्ये पुर्ण होणं अपेक्षित होतं. सहा लेनच्या या ब्रीज बरोबरच शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान एक रेल्वे ब्रीज ही बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचं काम DBOOT म्हणजे DESIGN, BUILD, OWN, OPERATE AND TRANSFER या तत्वावर अनिल अंबानी ग्रुपला देण्यात आलं होतं, पण टेंडर वरून झालेल्या वादामुळे आता ती जबाबदारी पुन्हा MSRDC ला देण्यात आलीय. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई चेन्नई हायवे आणि मुंबई गोवा हायवे या मार्गांवरचा वाहतुकीचा ताण हलका होणारेय. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सेझ या दोन प्रकल्पाबरोबरच शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बरलींक हा तिसरा प्रकल्प नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहे असं म्हणता येईल.पण सध्या तरी हा प्रकल्प सुरू झालेला नाही. या प्रकल्पाचा खर्च फार मोठा आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीने या प्रकल्पासाठी 6 हजार कोटी रूपये खर्च करण्याची तयारी दाखवली होती. आणि फक्त दहा वर्षात तो सरकारला हस्तांतरित करण्यात येणार होता. मात्र आता हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे दिला गेलाय. पण त्याच्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतूदीचा मात्र कोणताही विचार केलेला दिसत नाही.भविष्यात वाहतुकीवरचा ताण आणखीन वाढत जाणारेय. त्यामुळे भविष्यात मास ट्रान्झिट सिस्टिम सारख्या एखाद्या यंत्रणेची गरज आहे, जी कार्यक्षम असेल, आर्थिकदृष्ट्या परवडणारी असेल त्याचबरोबर ती प्रदुषणाच्या दृष्टीनेही फायदेशीर असेल. नियोजित मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट हे कदाचित यावरचं उत्तर असेल. मुंबईतल्या एकूण वाहतुकीपैकी जवळपास 88 टक्के वाटा हा सार्वजनिक वाहतूकीचा आहे. उपनगरीय रेल्वेचं मुंबईतलं जाळंही या वाहतुकीचा बराचसा भार हलका करत असतं. दररोज जवळपास 60 लाख प्रवासी मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. बेस्टही या वाहतुकीचा भार हलका करण्यात रेल्वेला यथाशक्ती मदत करतेय. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे आणि बससेवेच्या विस्तारीकरणावर मर्यादा आल्यात असं म्हणता येईल. सध्या 1 कोटी 10 लाख प्रवासी दररोज मुंबईत वाहनाने प्रवास करतात. त्यापैकी रेल्वेने 48 टक्के बसने 44 टक्के तर खाजगी वाहनाने 8 टक्के प्रवासी प्रवास करतात. भविष्यातला वाहतुकीवरचा ताण पाहता 1997 ते 2000 दरम्यान Indo-German Technical Co-operation द्वारे एक अभ्यासगट नेमण्यात आला. या गटाने अनेक शक्यतांचा विचार करून अंधेरी ते घाटकोपर दरम्यान एक mass transit corridor असावा अशी शिफारस केली. मे 2004 मध्ये MMRDAने या शिफारसीवर विचार सुरू केला असतानाच DMRC दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मुंबई मेट्रोसाठी एक मास्टरप्लान तयार केला. त्यात त्यांनी हा मार्ग वर्साेव्यापर्यंत वाढवण्याची शिफारस केली. मुंबई मेट्रोचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे रेल्वेद्वारे लोकांना छोट्या अंतरावरचा प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं हे होतं. जो त्यांना आताच्या रेल्वे मार्गाच्या जाळ्यात करणं शक्य नाही. हा प्रकल्प 3 टप्प्यात पुर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य आणि पश्चिम उपनगरांना पुर्व पश्चिम असा आडवा मार्ग तयार झाल्याने या मार्गावरचा प्रवास सुलभ होणार आहे. या प्रकल्पाची काही वैशिष्ट्‌यंही आहेत. ती म्हणजे या मार्गावरची सर्व रेल्वे स्टेशन्स जमिनीपासून 12 ते 13 मीटर उंचावर असतील. त्याचबरोबर वाहतुकीच्या इतर पर्यायांद्वारेसुद्धा ही सगळी स्टेशन्स एकमेकांशी जोडलेली असतील. या स्टेशन्सपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या स्टेशन्सवर एस्केलेटर्स लावण्यात येतील. 2011 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षीत आहे. रिवाईंड 2008 - बिझनेस (जागतिक मंदीचं वर्ष) पहाण्यासाठी येथे क्लिक करा

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2008 12:46 PM IST

आतापर्यंत गर्भ प्रतिबंधक गोळ्या या फक्त महिलांसाठीच होत्या. पुरुषांना संतती नियमनासाठी नसबंदी शस्त्रक्रिया किंवा काँडमचा वापर करावा लागतो. पण अमेरिकेत ओख्लीहोमा विद्यापीठात केवीन मूर यांनी केलेल्या संशोधनामुळे येत्या काळात पुरुषांसाठीही संततीनियमन गोळ्या तयार होऊ शकतील. मूर यांनी हे संशोधन उंदरावर केलं आहे. " उंदराच्या स्पर्ममध्ये जे एनझायम म्हणजेच वित्तंचक असतात टीपीएस वन आणि टीपीएस टु ते दडपता येतील. सप्रेस करता येतील आणि त्यामुळे गर्भधारणा होणार नसल्याचं शोधून काढलंय. उंदराप्रमाणेच माणसातही तेच वित्तंचक असतात, " असं सेक्स मेडिसीन एक्स्पर्ट डॉ. राजन भोसले यांचं म्हणणं आहे. हे एन्झाईम्स गर्भधारणेत नेमकी काय भूमिका बजावतात ? तर शरीरात असंख्य वित्तंचक असतात. त्यापैकी गर्भधारणेसाठी दोन उपयोगी पडतात. ज्यावेळी शुक्राणू स्त्रीच्या गर्भाशयात जातो त्यावेळी त्याला भेदण्याचं काम हेवित्तंचक करतात आणि शुक्राणू जो पोहत पुढे प्रवास करत असतो तो सुद्धा हालचाल करायला या वित्तंचकामुळेच मदत होत असते. तो सप्रेस झाला तर शुक्राणू हलणार नाही आणि गर्भधारणा होणार नाही. पुरुषांसाठी गर्भप्रतिबंधक गोळ्या आतापर्यंत मिळत नसल्यानं कुटुंब नियोजनाचा सगळा भर हा महिलांवरच होता. पण या गोळ्या आल्या तर कुटुंब नियोजन कार्यक्रमात पुरुषांचाही सहभाग होऊ शकेल. " या गोळ्यांनी पुरुषाच्या पौरुषात्वावर कसलाही परिणाम होणार नाही. यामुळे मोठी सामाजिक क्रांती घडेल, असं डॉ. राजन भोसले यांनी स्पष्ट केलं आहे. गर्भधारणा होउ नये, यासाठी संशोधन यशस्वी झाल्यानंतर गोळ्या बाजारात यायला मात्र काही वर्ष वाट पहावी लागणार आहे. पुरुष गर्भ प्रतिबंधक गोळ्यांप्रमाणं स्टेम सेल्सवरचं संशोधनही यंदा गाजलं. स्टेम सेल्स म्हणजेच मूळ पेशीसंदर्भात कोल्हापूरमध्ये पुन्हा एक नवीन संशोधन करण्यात आलं आहे. गरोदरपणामध्ये सुमारे 20 टक्के स्त्रियांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास होतो. त्यामुळे अवेळी होणारा गर्भपात, आई किंवा बाळाचा मृत्यू असे धोके त्यातून संभवतात. पण आईच्या हाडांमधल्या स्टेम सेल्स आईच्या वारेमध्ये सोडल्या तर हा आजार संपूर्ण बरा करता येणार आहे. डॉ. सतीश पत्की यांनी 15 स्त्रियांवर हा क्लिनिकल रिसर्च यशस्वी केला आहे. " पेशंटच्या स्वत:च्या बोन मॅरोमधुन किंवा मज्जा पेशीमधुन स्टेम सेलचा उपयोग करुन गरोदरपाणातील ब्लड प्रेशर अतीशय कमी होतं.असं सिद्ध करता आलेलं आहे.अता सद्या भारतामधेचं नव्ह तर जगामध्ये सगळ्या देशामध्ये गरोदरपनामध्ये वाढलेलं प्रेशर माता मृत्यु बाल मृत्युचं प्रमुख कारण आहे. हे जर उपचार केले तर बाल मृत्यू आणि माता मृत्यूचं प्रमाण कमी करता येईल, असं गायनॉकॉलिस्ट डॉ. सतीश पत्कींचं मत आहे. ही ट्रीटमेंट एक दिवसाची असते. गरोदरपणाच्या पाच ते सात महिन्याच्या काळात ती करता येते. स्त्रीच्या हाडांमधल्या 200 दशलक्ष स्टेम सेल्स गर्भाशयात इंजेक्शनने सोडल्या जातात. त्यासाठी सोनोग्राफी तंत्र वापरलं जातं. केंद्र सरकारचा जैवतंत्रज्ञान विभाग आणि पुण्याच्या पेशी विज्ञान संस्थेनेही डॉ. पत्की यांच्या या संशोधनामध्ये सहभाग घेतला आहे. 2008 हे वर्षं मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाचं मानावं लागेल. कारण या वर्षात मुंबईत वांद्रे वरळी सी लींकचा बांद्रा केबल स्टेज हा 600 मीटरचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला. तर शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बरलींक हा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू होण्याच्या मार्गावर आहे. मेट्रो रेल्वे प्रकल्पही योग्य त्या वेगाने पुढे सरकतोय. हे तीनही प्रकल्प मुंबईच्या पायाभूत सुविधेसाठी जेवढे महत्त्वाचे तेवढंच त्यांचं बांधकामही वैशिष्ट्यपूर्ण. या तीन्ही प्रकल्पाचा एक समान धागा म्हणजे यामुळे मुंबईच्या वाहतुकीवरचा ताण कमी होणारेय. गेल्या 40 वर्षात मुंबईच्या ट्रॅफीकच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक अभ्यासगट नेमले गेले. त्यातल्या अनेकांनी मुंबईला असणार्‍या सागरी किनार्‍यावरून वाहतुकीचा पर्यायाची शिफारस केली. त्यामुळे Bandra Worli Sea Link हा महत्वाकांक्षी प्रकल्प अस्तित्वात आला. वर सध्यपारिस्थितीत असलेला ताण लक्षात घेता वरळी ते माहीम कॉजवे हे फक्त 8 किमीचं अंतर काप्मुंबई शहर आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा एकमेव रस्ता म्हणजे माहीम कॉजवे. तेथे पोहचायला तब्बल 40 मि. लागतात. पण आता नव्याने तयार होणार्‍या 5.6 किमीच्या या Bandra Worli Sea Link मुळे या रहदारीचा ताण बराच कमी व्हायला मदत होणारेय. MSRDC चा हा प्रकल्प HCC आणि China Harbour Engineering Corporation या दोन कंपन्या साकारतायत. खरंतर एप्रिल 2008 मध्ये हा प्रकल्प पुर्ण होणं अपेक्षीत होतं. पण मे 2008 ला या प्रोजेक्टमधला महत्त्वाचा टप्पा असलेली 600 मी लांब असलेली बांद्रा केबल स्टेज पुर्ण झाली. यावर असणारे टॉवर हे 126 मी उंच आहेत. ज्यावरून कनेक्ट केलेल्या प्रत्येकी 500 मी लांबीच्या केबल्स 20 हजार टन वजन असलेल्या या स्टेजचा भार तोलून धरतील. 8 लेनच्या या ब्रीजच्या 2 लेन या फक्त बसेससाठी राखीव ठेवण्यात आल्यात. स्वयंचलित टोल गोळा करण्याची व्यवस्था हे या स्मार्ट ब्रीजचं एक वैशिष्ट्य असणारेय. तसंच या सीलिंकमुळे दरवर्षी सुमारे 100 कोटी रुपयांची इंधन बचत होणारेय. त्याचबरोबर ध्वनी आणि वायू प्रदूषण कमी होऊन मुंबईच्या आसपास मासेमारीला पूरक वातावरण तयार व्हायला मदत होईल असा विश्वास पर्यावरणवाद्यांना वाटतोय. तसंच अपघाताच्या प्रमाणात घट होऊन सुरक्षित प्रवास करणं मुंबईकरांना शक्य होणार आहे. " वांद्रे वरळी सीलींकप्रमाणेच शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लींक हा सुद्धा मुंबईच्या वाहतुकीत कमालीची सुधारणा घडवून आणणारा एक प्रकल्प आहे. यामुळे नवी मंुबई अगदी हाकेच्या अंतरावर असेल. पण सध्या तरी हा प्रकल्प काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलाय. जगातल्या मोठ्या ट्रान्स हार्बर लींकपैकी एक असणारा 4 ते 6 हजार कोटी रुपये अंदाजित किंमत असलेला 22 किमीचा हा प्रकल्प. याचं काम डिसेंबर 2008 मध्ये सुरू होऊन 2013 मध्ये पुर्ण होणं अपेक्षित होतं. सहा लेनच्या या ब्रीज बरोबरच शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान एक रेल्वे ब्रीज ही बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचं काम DBOOT म्हणजे DESIGN, BUILD, OWN, OPERATE AND TRANSFER या तत्वावर अनिल अंबानी ग्रुपला देण्यात आलं होतं, पण टेंडर वरून झालेल्या वादामुळे आता ती जबाबदारी पुन्हा MSRDC ला देण्यात आलीय. या प्रकल्पामुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवे, मुंबई चेन्नई हायवे आणि मुंबई गोवा हायवे या मार्गांवरचा वाहतुकीचा ताण हलका होणारेय. आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सेझ या दोन प्रकल्पाबरोबरच शिवडी न्हावाशेवा ट्रान्स हार्बरलींक हा तिसरा प्रकल्प नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या आहे असं म्हणता येईल.पण सध्या तरी हा प्रकल्प सुरू झालेला नाही. या प्रकल्पाचा खर्च फार मोठा आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीने या प्रकल्पासाठी 6 हजार कोटी रूपये खर्च करण्याची तयारी दाखवली होती. आणि फक्त दहा वर्षात तो सरकारला हस्तांतरित करण्यात येणार होता. मात्र आता हा प्रकल्प एमएसआरडीसीकडे दिला गेलाय. पण त्याच्यासाठी लागणार्‍या आर्थिक तरतूदीचा मात्र कोणताही विचार केलेला दिसत नाही.भविष्यात वाहतुकीवरचा ताण आणखीन वाढत जाणारेय. त्यामुळे भविष्यात मास ट्रान्झिट सिस्टिम सारख्या एखाद्या यंत्रणेची गरज आहे, जी कार्यक्षम असेल, आर्थिकदृष्ट्या परवडणारी असेल त्याचबरोबर ती प्रदुषणाच्या दृष्टीनेही फायदेशीर असेल. नियोजित मेट्रो रेल्वे प्रोजेक्ट हे कदाचित यावरचं उत्तर असेल. मुंबईतल्या एकूण वाहतुकीपैकी जवळपास 88 टक्के वाटा हा सार्वजनिक वाहतूकीचा आहे. उपनगरीय रेल्वेचं मुंबईतलं जाळंही या वाहतुकीचा बराचसा भार हलका करत असतं. दररोज जवळपास 60 लाख प्रवासी मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. बेस्टही या वाहतुकीचा भार हलका करण्यात रेल्वेला यथाशक्ती मदत करतेय. मुंबईच्या भौगोलिक परिस्थितीमुळे रेल्वे आणि बससेवेच्या विस्तारीकरणावर मर्यादा आल्यात असं म्हणता येईल. सध्या 1 कोटी 10 लाख प्रवासी दररोज मुंबईत वाहनाने प्रवास करतात. त्यापैकी रेल्वेने 48 टक्के बसने 44 टक्के तर खाजगी वाहनाने 8 टक्के प्रवासी प्रवास करतात. भविष्यातला वाहतुकीवरचा ताण पाहता 1997 ते 2000 दरम्यान Indo-German Technical Co-operation द्वारे एक अभ्यासगट नेमण्यात आला. या गटाने अनेक शक्यतांचा विचार करून अंधेरी ते घाटकोपर दरम्यान एक mass transit corridor असावा अशी शिफारस केली. मे 2004 मध्ये MMRDAने या शिफारसीवर विचार सुरू केला असतानाच DMRC दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मुंबई मेट्रोसाठी एक मास्टरप्लान तयार केला. त्यात त्यांनी हा मार्ग वर्साेव्यापर्यंत वाढवण्याची शिफारस केली. मुंबई मेट्रोचं मुख्य उद्दीष्ट म्हणजे रेल्वेद्वारे लोकांना छोट्या अंतरावरचा प्रवास करण्यासाठी जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देणं हे होतं. जो त्यांना आताच्या रेल्वे मार्गाच्या जाळ्यात करणं शक्य नाही. हा प्रकल्प 3 टप्प्यात पुर्ण होणार आहे. या प्रकल्पामुळे मध्य आणि पश्चिम उपनगरांना पुर्व पश्चिम असा आडवा मार्ग तयार झाल्याने या मार्गावरचा प्रवास सुलभ होणार आहे. या प्रकल्पाची काही वैशिष्ट्‌यंही आहेत. ती म्हणजे या मार्गावरची सर्व रेल्वे स्टेशन्स जमिनीपासून 12 ते 13 मीटर उंचावर असतील. त्याचबरोबर वाहतुकीच्या इतर पर्यायांद्वारेसुद्धा ही सगळी स्टेशन्स एकमेकांशी जोडलेली असतील. या स्टेशन्सपर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्या स्टेशन्सवर एस्केलेटर्स लावण्यात येतील. 2011 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं अपेक्षीत आहे.

रिवाईंड 2008 - बिझनेस (जागतिक मंदीचं वर्ष) पहाण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2008 12:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close