S M L

रिवाईन्ड 2008 - आढावा मराठी नाट्यक्षेत्राचा आणि टीव्हीचा

कधी केस वाढव, कधी केस काप...पिक्चर प्रमोशनसाठी प्रत्येक हिरो किंवा हिरोईनची अशी नाटकं सुरूच असतात. ते जाऊ दे. पण या खोट्या नाटकांवरून आपण येऊया खर्‍या खुर्‍या नाटकांवर...हिंदी सिनेमा असो किंवा मराठी, अस्सल प्रेक्षकांची पावलं अखेरीस वळतात ती नाट्यगृहांकडेच. आपण पाहणार आहोत यावर्षी मराठी नाटकांनी काय बाजी मारलीय. वर्षभरातल्या मराठी रंगभुमीवरचा लेखा जोखा घ्यायचा तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की 2007 च्या तुलनेत या वर्षी लक्षात राहण्यासारखी नाटकं कमी आली. निर्मात्यांनी नव्या विषयांना हात घालण्याचं टाळलं. कदाचित चांगल्या नाटककारांपर्यंत निर्माते पोहचु शकले नाहीत किंवा मग वेगळ्या स्क्रीप्टच लेखकांकडून आल्या नसाव्यात. संतोष पवारच्या आम्ही पाचपुतेचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल कारण हे नाटक बदललेल्या रुपामुळे गाजलंच पण या नाटकाने एक दहशतही निर्माण झाली. या वर्षभरात चार नाटकं नव्या रुपात पुन्हा रंगभूमीवर आली. लोच्या झाला रे , हम तो तेरे आशिक है आणि भैय्या हात पाय पसरी आणि माकडाच्या हाती शॅम्पेनचा उल्लेख करावाच लागेल. पण नाटकाचा कितीही मेक ओव्हर झाला असल तरी या वर्षी नाटकांचं नेपथ्य विशेष लक्षवेधी नव्हतंतरुण मुलांचे विषय हाताळण्याचा प्रयत्न यावर्षी करण्यात आला. त्यात गोची प्रेमाची मधुन लव्ह स्टोरी मांडण्यात आली. तरुण वयातंलं प्रेम आणि भिन्न जातींमुळे निर्माण झालेल्या सतराशे साठ समस्या. त्याच विषयाचं दुसरं नाटकं म्हणजे शुध्द बीजापोटी..प्रेमानंद गज्वींच्या या नाटकात दोन तरुण मुलांच्या प्रेमाला घरच्यांनी केलेला विरोध आणि त्याला न जुमानता त्यांनी केलेलं लग्न. या नाटकाचं वेगळंपण एकच की त्याचे एका दिवसात सलग सहा प्रयोग करण्यात आले आता ही स्टंट बाजी होती की अनुदान मिळवण्यासाठी केलेली युक्ती हे कोडंच आहे. मग वर्ष भरात वेगळं आलं तरी काय हा प्रश्न सहाजीकच सगळयांना पडला. जुलै मध्ये भद्रकाली प्रोडक्शनचं म्हातारे जमींपर हे कॉमेडी बाजाचं नाटक आलं. ऑगस्ट मध्ये आलेल्या ओळख ना पाळख या प्रशांत दामलेच्या कॉमेडी नाटकाने कमी वेळात प्रयोगांची शंभरी गाठली. त्याच्या पाठोपाठ आलं बंटी की बबली थोडक्यात काय तर कॉमेडी रॉक्स हाच फंडा डोक्यात ठेऊन रंगभुमीवर नाटकं आली.पण या वर्षभरातली लक्षात येण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे डिसेंबरमध्ये डझन भर नाटकं आली आता ती नाटकं फक्त स्पर्धांमध्ये भाग घेऊन पाच तीन दोन या नावाप्रमाणे लाखातली बक्षीसं मिळवण्यासाठीच आलीत का याचं उत्तर प्रेक्षकांच्या रिस्पॉन्सने मिळेलच..आणि आता येणार्‍या वर्षभरात कितीशी नाटकं प्रेक्षकांना नाट्यगृहांपर्यंत खेचुन आणणार हे येत्या वर्षातली नाटकंच ठरवतील.प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी नाटकं कमीच निघाली म्हणून की काय, लोकांनी यंदाच्या वर्षी टीव्हीलाच जास्तीत जास्त चिकटणं पसंद केलं. अर्थात त्यांना तसा मसाला देणार्‍या काही नव्या वाहिन्यांचं आगमनही यासाठी कारण ठरलं. 2008 च्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीचं सर्फिंग आपण करणार आहोत.त्याला इडियट बॉक्स म्हणा किंवा छोटा पडदा, या छोट्या पडद्याने मोठ्या पडद्याच्याही नाकात दम आणला. या बड्‌ड्या बड्‌ड्या स्टार्सना आपली पब्लिसिटी मेंटेन करण्यासाठी शेवटी छोट्‌या पडद्याचाच आसरा घ्यावा लागला. शाहरुखचं पाचवी पास असो किंवा सलमानचं दस का दम... एकंदरीत टीव्हीच यावर्षी बिग बॉस ठरला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 03:33 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 03:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close