S M L

रिवाईन्ड 2008 - आढावा हिंदी - इंग्रजी सिनेमांचा

बॉलिवुडसाठी 2008 हे वर्षं कसं होतं तर... तर काही खास गेलं नाही. 2008 ची सुरुवात तर एकदम झकास झाली होती. आशुतोष गोवारीकरच्या जोधा अकबर या महासिनेमानं बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं आणि आशुतोषला हॅटट्रीक मिळवता आली. त्यानंतर अब्बास मस्तानच्या रेस या सिनेमालाही चांगलं यश मिळालं, एवढंच नाही तर इमरान हाश्मीचा जन्नतही हिट झाला. हा तर एक धक्काच होताच. पण यावर्षी खरे धक्के बसले ते मोठमोठया बॅनर्सना.. बिगबजेट सिनेमे बिगफ्लॉप ठरले.सुभाष घईंनी दिग्दर्शित केलेले ब्लॅक अँड व्हाईट आणि युवराज हे दोन्ही सिनेमे मोठी स्टारकास्ट असतानाही जोरात आपटले. ' युवराज ' आधी सलमान खानचे ' गॉड तुस्सी ग्रेट हो ' आणि ' हिरोज ' हे सिनेमेसुध्दा काही ग्रेट बिझनेस करू शकले नाहीत.हॅरी बावेजाने जबरदस्त गाजावाजा करत ' लव्हस्टोरी 2050 ' मधून हरमन बावेजा या आपल्या मुलाला लाँच केलं.. पण करोडो रुपये अक्षरश: पाण्यात गेले. यशराज फिल्म्ससाठी तर हे वर्ष अगदीच अ‍ॅव्हरेज गेलं. थोडा प्यार थोडा मॅजिक थोडासा चालला, झीरो साइज करीनाचा टशन अगदी फुसका बारच निघाला. रोडसाईड रोमिओसारखी अ‍ॅनिमेटेड लव्हस्टोरी, प्रयत्न चांगला होता पण प्रेक्षकांनी त्याला साईडलाच टाकला. शेवटच्या महिन्यात रिलीज झालेल्या ' रब ने बना दी जोडी ' ने थोडाफार बिझनेस केला पण शाहरुख असतानाही हा सिनेमा सुपरहिट ठरला नाही.. पण शेवटी रणबीर कपूरच्या रुपात यशराजला यश मिळालंच. हॉट रणबीरबरोबर मिनिषा,बिपाशा आणि दीपिका या तीन हसिनांची जादू चालली आणि सिनेमा सुपरहिट ठरला..रामगोपाल वर्माचं काहीतरी बिनसलंय यावर यावर्षात शिक्कामोर्तब झालं...अंडरवर्ल्ड हा तर रामूसाठी सोपा विषय, पण असं असतानाही कॉन्ट्रॅक्ट चालला नाही, भूत नंतर आता रामूच्या सिनेमांना कोणीच घाबरत नाही हे फूँक ने सिध्दच केलं.. नाही म्हणायला सरकारराज थोडाफार चालला, पण सरकारची जादू काही त्यात नव्हती. सुभाष नागरे शिवाय अमिताभने प्रेमळ भुताचाही रोल केला.. पण भूतनाथला फारसं यश मिळालं नाही, भूतच काय पण गॉड तुस्सी ग्रेट हो मधला देवही अमिताभ भक्तांना आवडला नाही. वेगळ्या लूकमधला इंग्लिश ' द लास्ट लियर ' सुध्दा बॉक्स ऑफिसवर आठवडाभर टिकू शकला नाही.. नंतर तर वाढदिवसाच्या दिवशीच शहेनशाहला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावं लागलं. त्यामुळे सध्या तरी घरी बसून ब्लॉग लिहिणंच बिग बीने पसंद केलं आहे. राकेश रोशनच्या ' क्रेझी 4 ' ची सुध्दा प्रेक्षकांना फारशी क्रेझ वाटली नाही. स्पेशल इफेक्टसमुळे ' द्रोणा 'ची प्रचंड हवा होती. 2008चा सुपर ड्युपर हिट सिनेमा हाच असणार असंच वाटत होतं. पण पहिल्याच आठवडयात ' द्रोणा ' सुपरड्युपर फ्लॉप ठरला. पण दोस्ताना सिनेमा चालल्यामुळे अभिषेकला थोडं हायसं वाटलं. अझिझ मिर्झांसारखा दिग्दर्शक आणि शाहीद कपूर - विद्या बालनच्या अफेयरची चर्चा असतानाही ' किस्मत कनेक्शन 'ची किस्मत चमकली नाही. या सगळया वातावरणात थंडगार वा-याची झुळुक यावी तसा आला इमरान खान.. जाने तू या जाने ना साठी मामा आमिर खाननेही प्रचंड मेहनत घेतली होती. नव्या रुपातली जेनेलियाही सगळयांना आवडली. त्यानंतर भले इमरान खानचा ' किडनॅप ' फ्लॉप झाला असला तरी त्याच्या लोकप्रियतेत फारसा फरक पडला नाही.मधुर भांडारकरने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली.. प्रियांका चोप्रा, कंगना राणावत यांना त्याने अ‍ॅक्टींग तर करायला लावलीच पण ' फॅशन' सारखा विषयही यश मिळवू शकतो हे सिध्द केलं. 2008 ची सुरुवात अजय देवगणसाठी लकी नव्हती. स्वत:ची निर्मिती असलेला ' यू मी और हम ' हिट होऊ शकला नाही. राजकुमार संतोषीचा ' हल्लाबोल ' सुध्दा वेगळा विषय असूनही चालू शकला नाही. संडे सारख्या मॅड कॉमेडीनेही अजय देवगण फारसा प्रभाव पाडू शकला नाही. पण गोलमाल रिटर्न्स सारखी मॅड मॅड कॉमेडी मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडली. अशीच एक मॅड कॉमेडी म्हणजे ' सिंग इज किंग '. अक्षय कुमारने आपणच बॉलिवुडचा किंग असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. श्रेयस तळपदे गोलमाल रिटर्न्समध्ये फुल्ल फॉर्मात दिसला, पण त्याआधी ' बॉम्बे टू बँकॉक ' हा नागेश कुकूनूरचा सिनेमा मात्र अगदीच फ्लॉप झाला होता. यामुळेच कदाचित ' वेलकम टू सज्जनपूर 'चं यश त्याला सुखावून गेलं असणार. मोठे सिनेमे अपयशी ठरत असतानाच फरहान अख्तरच्या ' रॉक ऑन ', नीरज पांडेच्या ' THE WEDNESDAY ' , आणि रजत गुप्ताच्या 'आमिर 'चं यश उठून दिसलं. पण छोट्या बजेटच्या सिनेमांना यश मिळायला लागलंय हा समज मात्र 2008 ने खोटा ठरवला.. विनय पाठकचा ' दसविदानिया ', परेश रावलचा महत्त्वांकाक्षी ' महारथी ', खोसला का घोसला टीमचा 'ओये लक्की लक्की ओये ' असे सिनेमे फार काळ तग धरू शकले नाहीत. यावर्षी दहशतवादावर अनेक सिनेमे आले. मुंबईतल्या 7/11 बॉम्बस्फोटांवर निशिकांत कामतचा ' मुंबई मेरी जान ', सीमेवरील दहशतवादावर तहान आणि ' रामचंद पाकिस्तानी ', जगमोहन मुंध्राचा ' शूट ऑन साईट '.. वेगळे प्रयत्न असले तरी सर्वांनाच यश मिळू शकलं नाही. पण या सिनेमांपेक्षाही भयंकर वास्तव सव्वीस नोव्हेंबरपासून एकोणसाठ तास मुंबईत बघायला मिळालं आणि तेही छोटया पडद्यावर.एकंदरीत 2008 हे वर्ष बॉलीवूडसाठी एकदम confusing होतं. मॅड कॉमेडी पण लोकांना आवडली, कॉश्च्युम ड्रामाही हिट झाला, रॉक ऑन सुध्दा चालला. प्रेक्षकांना नेमकं हवंय काय याचा विचार करायला लावणारं असंच हे वर्ष होतं.ठीक आहे, बरेच सिनेमे फ्लॉप झाले असले तरी जागतिक मंदी, दहशतवाद अशी संकटं बॉलिवुडवरसुद्धा कोसळली. त्यात भर म्हणून की काय सुपरस्टार्सच्या सुपर किंमती हे एक आतलं संकट आहेच, ज्याचा धोका वाढतोच आहे. हे सारं ठीक आहे पण आता पुढे काय, दोन हजार नऊ मध्ये कोणते सिनेमे आहेत ज्यावर नजर ठेवायला लागेल. ' चांदनी चौक टू चायना ', ' राज - द मिस्ट्री ', ' बिल्लो बार्बर ', ' रावण ' , 'वीर ' हे सिनेमा यदाचं आकर्षण आहेत. या सगळ्या भाऊगर्दीत हॉलिवुडला विसरुन चालणार नाही. कारण ब-याचदा बॉलिवुड सिनेमांच्या आयडीयाची कल्पना ही हॉलिवुडमधूनच आलेली असते. हॉलिवुडमध्ये यावर्षी बरंच काही घडलं अगदी दरवर्षीप्रमाणे.. पण मुख्य म्हणजे यावर्षी मोठया सिनेमांचे भव्य दिव्य सिक्वेल बघायला मिळाले.. पण त्यातही जेम्स बाँडचा क्वांटम ऑफ सोलेस आणि बॅटमॅनचा द डार्क नाइट विशेष लक्षात राहिले. सुमार दर्जाचे सिनेमा हॉलिवुडमध्ये आले. सिनेमा तंत्रात हरवल्या सारखा वाटला. अ‍ॅनिमेशपटांना चांगला प्रतिसाद लाभला. जेम्सबॉण्ड पटांमध्ये तोच तोचपणा जाणवला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 03:38 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 03:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close