S M L

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 4)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 4) हॉकीसाठी मात्र हे वर्ष खेळापेक्षा वादविवादांनीच अधिक गाजलंहॉकीत पुन्हा निराशावर्षाचा आढावा घेताना गेल्या काही वर्षात नेहमीचं हॉकीच्या खात्यात अपयशाची मोजदाद असायची.2008चं वर्षही त्याला अपवाद ठरलं नाही.80 वर्षात भारत पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरू शकला नाही.आणि याला जबाबदार असलेल्या हॉकी महासंघाचे अध्यक्ष गिलं यांचं साम्राज्य अखेर याच वर्षात खालसा झालं.इतर खेळांच्या तुलनेत 2008मध्ये हॉकी कॉर्नर झाली ती पदाधिका-यांच्या नाकार्तेपणामुळे.पण त्याची फार मोठी पेनल्टी मोजावी लागली ती हॉकी खेळाडूंना. एकूणचं काय 2008चं वर्ष हॉकी चाहत्यांसाठी निराशाजनकचं गेलंगिल यांचं राज्य खालसाहॉकी महासंघाचे अध्यक्ष के.पी.एस. गिल आणि सचिव ज्योतीकुमारन यांच्या कार्यकाळात हॉकीचं वैभव धुळीस मिळालं. 2008 पर्यंत त्यांनी 15 कोचेसची हकालपट्टी केली. त्यांच्याच कार्यकाळात हॉकीच्या स्टिकचा खेळण्यापेक्षा मारामारीसाठी जास्त उपयोग झाला.प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरी तर धक्कादायकच होती.वर्ल्ड कपमध्ये 11व्या क्रमांकावर घसरण , 2006 च्या कॉमनवेल्थमध्ये मेडल नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत अपयश. आणि 80 वर्षात पहिल्यांदाच ऑलिम्पिकला पात्र न ठरण्याची नामुष्की.त्यातच ज्योतीकुमारनयांना लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळं हॉकी फेडरेशनची शंभरी भरली.अखेर ऑलिम्पिक असोसिएशननं इंडियन हॉकी फेडरेशन बरखास्त केली. आणि गिल यांचा गेम ओव्हर झाला.नवी सुरुवातअझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी आधी निवडलेली टीम रद्द करुन नवी टीम निवडण्यात आली.कारण याच स्पर्धेसाठीच्या टीममध्ये निवड करण्यासाठी फेडरेशनचे सेक्रेटरी ज्योतीकुमार यांनी लाच घेतल्याचा आरोप झाला होता. नव्या हॉकी खेळाडूंच्या कमिटीचे अध्यक्ष असलम शेर खान यांचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. भारतानं साखळीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 अशी धूळ चारली. फायनल मध्ये अर्जेंटिनाने आपल्याला एक्स्ट्रा टाईममध्ये हरवलं. पण टीमची कामगिरी ऑलिंपिक असेसिएशनने तात्पुरत्या नेमलेल्या कमिटीला सुखावणारी झाली.हॉकी टीमचे कोच कोण?पण भारतीय हॉकी टीम अधिकृत राष्ट्रीय कोचच्या विना किती काळ टिकणार.अपेक्षेप्रमाणेच महिला टीमचे कोच महाराज किशन कौशिक यांच्याकडे भारतीय हॉकी टीमचं प्रशिक्षक पद सोपवण्यात आलं. त्यांच्या खात्यात एक ऑलिम्पिक गोल्ड जमा आहे. आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली जात होती भारताला हॉकीतलं गतवैभव प्राप्त करुन देण्याची. मग महिला फेडरेशननं आरडा ओरडा केल्यावर एम. के. कौशिक पुरूषांच्या टीमचं कोच म्हणून काम बघणार नाही असं ठरलं.ज्युनिअर हॉकी टीम फॉर्मातएका बाजूला सीनिअर हॉकी टीममध्ये इतके गोंधळ सुरू असताना तिथे भारताची ज्युनिअर हॉकी टीम मात्र उत्तम कामगिरी करत होती. हैदाराबादमध्ये झालेल्या ज्युनिअर एशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं.फायनलमध्ये त्यांनी दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव केला.या संपूर्ण स्पर्धेत भारतीय ज्युनिअर हॉकी टीम अपराजित राहिली.या विजयापेक्षाही गाजली ती पाकिस्तानी हॉकीपटूंनी या स्पर्धेत भारतीय हॉकीपटूंशी केलेली मारामारी. हाफ टाईमला भारत एक शुन्य असा आघाडीवर होता.हाफ टाईमला काही मिनिटांचाच अवधी असताना पाकिस्तानच्या मोहम्मद इरफाननं भारताच्या मनदीप अंतीलच्या पोटात हॉकी स्टीक मारली. आणि ठिणगी पडली. त्यातचं मुंबईवरील दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानच्या ज्युनियर हॉकी टीमचा भारतातील दौराही रद्द झाला.आणि हॉकीच्या मैदानावरील कटूता 2008मध्येही कायम राहीली.चक दे इंडिया...धनराज, नेगी यांचा पुढाकारहॉकीचं वर्ष निराशाजनक ठरत असतानाच मीररंजन नेगी आणि धनराज पिल्ले यांनी हॉकीला पुर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी याच वर्षात पुढाकार घेतला.नेगीनं महिला हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबईत अकादमी स्थापन केली.तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गुणवत्ता हुडकण्यासाठी धनराजनं पुढाकार घेतलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 07:46 PM IST

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 4)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 4)

हॉकीसाठी मात्र हे वर्ष खेळापेक्षा वादविवादांनीच अधिक गाजलंहॉकीत पुन्हा निराशावर्षाचा आढावा घेताना गेल्या काही वर्षात नेहमीचं हॉकीच्या खात्यात अपयशाची मोजदाद असायची.2008चं वर्षही त्याला अपवाद ठरलं नाही.80 वर्षात भारत पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरू शकला नाही.आणि याला जबाबदार असलेल्या हॉकी महासंघाचे अध्यक्ष गिलं यांचं साम्राज्य अखेर याच वर्षात खालसा झालं.इतर खेळांच्या तुलनेत 2008मध्ये हॉकी कॉर्नर झाली ती पदाधिका-यांच्या नाकार्तेपणामुळे.पण त्याची फार मोठी पेनल्टी मोजावी लागली ती हॉकी खेळाडूंना. एकूणचं काय 2008चं वर्ष हॉकी चाहत्यांसाठी निराशाजनकचं गेलंगिल यांचं राज्य खालसाहॉकी महासंघाचे अध्यक्ष के.पी.एस. गिल आणि सचिव ज्योतीकुमारन यांच्या कार्यकाळात हॉकीचं वैभव धुळीस मिळालं. 2008 पर्यंत त्यांनी 15 कोचेसची हकालपट्टी केली. त्यांच्याच कार्यकाळात हॉकीच्या स्टिकचा खेळण्यापेक्षा मारामारीसाठी जास्त उपयोग झाला.प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरी तर धक्कादायकच होती.वर्ल्ड कपमध्ये 11व्या क्रमांकावर घसरण , 2006 च्या कॉमनवेल्थमध्ये मेडल नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत अपयश. आणि 80 वर्षात पहिल्यांदाच ऑलिम्पिकला पात्र न ठरण्याची नामुष्की.त्यातच ज्योतीकुमारनयांना लाच घेताना रंगेहात पकडल्यामुळं हॉकी फेडरेशनची शंभरी भरली.अखेर ऑलिम्पिक असोसिएशननं इंडियन हॉकी फेडरेशन बरखास्त केली. आणि गिल यांचा गेम ओव्हर झाला.नवी सुरुवातअझलन शाह हॉकी स्पर्धेसाठी आधी निवडलेली टीम रद्द करुन नवी टीम निवडण्यात आली.कारण याच स्पर्धेसाठीच्या टीममध्ये निवड करण्यासाठी फेडरेशनचे सेक्रेटरी ज्योतीकुमार यांनी लाच घेतल्याचा आरोप झाला होता. नव्या हॉकी खेळाडूंच्या कमिटीचे अध्यक्ष असलम शेर खान यांचा निर्णय चांगलाच यशस्वी ठरला. भारतानं साखळीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 2-1 अशी धूळ चारली. फायनल मध्ये अर्जेंटिनाने आपल्याला एक्स्ट्रा टाईममध्ये हरवलं. पण टीमची कामगिरी ऑलिंपिक असेसिएशनने तात्पुरत्या नेमलेल्या कमिटीला सुखावणारी झाली.हॉकी टीमचे कोच कोण?पण भारतीय हॉकी टीम अधिकृत राष्ट्रीय कोचच्या विना किती काळ टिकणार.अपेक्षेप्रमाणेच महिला टीमचे कोच महाराज किशन कौशिक यांच्याकडे भारतीय हॉकी टीमचं प्रशिक्षक पद सोपवण्यात आलं. त्यांच्या खात्यात एक ऑलिम्पिक गोल्ड जमा आहे. आणि त्यांच्याकडून अपेक्षा केली जात होती भारताला हॉकीतलं गतवैभव प्राप्त करुन देण्याची. मग महिला फेडरेशननं आरडा ओरडा केल्यावर एम. के. कौशिक पुरूषांच्या टीमचं कोच म्हणून काम बघणार नाही असं ठरलं.ज्युनिअर हॉकी टीम फॉर्मातएका बाजूला सीनिअर हॉकी टीममध्ये इतके गोंधळ सुरू असताना तिथे भारताची ज्युनिअर हॉकी टीम मात्र उत्तम कामगिरी करत होती. हैदाराबादमध्ये झालेल्या ज्युनिअर एशिया कप हॉकी स्पर्धेत भारतानं विजेतेपद पटकावलं.फायनलमध्ये त्यांनी दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव केला.या संपूर्ण स्पर्धेत भारतीय ज्युनिअर हॉकी टीम अपराजित राहिली.या विजयापेक्षाही गाजली ती पाकिस्तानी हॉकीपटूंनी या स्पर्धेत भारतीय हॉकीपटूंशी केलेली मारामारी. हाफ टाईमला भारत एक शुन्य असा आघाडीवर होता.हाफ टाईमला काही मिनिटांचाच अवधी असताना पाकिस्तानच्या मोहम्मद इरफाननं भारताच्या मनदीप अंतीलच्या पोटात हॉकी स्टीक मारली. आणि ठिणगी पडली. त्यातचं मुंबईवरील दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानच्या ज्युनियर हॉकी टीमचा भारतातील दौराही रद्द झाला.आणि हॉकीच्या मैदानावरील कटूता 2008मध्येही कायम राहीली.चक दे इंडिया...धनराज, नेगी यांचा पुढाकारहॉकीचं वर्ष निराशाजनक ठरत असतानाच मीररंजन नेगी आणि धनराज पिल्ले यांनी हॉकीला पुर्वीचं वैभव प्राप्त करून देण्यासाठी याच वर्षात पुढाकार घेतला.नेगीनं महिला हॉकीचा दर्जा उंचावण्यासाठी मुंबईत अकादमी स्थापन केली.तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गुणवत्ता हुडकण्यासाठी धनराजनं पुढाकार घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 07:46 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close