S M L

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 1ii)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 1ii) नेमबाजीत सुवर्ण कामगिरीभारतीय शूटिंगसाठी 2008चं वर्ष अभिनव ठरलं. तसं गेल्या काही वर्षात भारतीय शूटर्सनी जगात भारताचा दबदबा निर्माण केला होता. पण सरत्या 2008 वर्षात त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले.केवळ शूटिंगचं नव्हे तर एकूणचं भारताच्या क्रीडा इतिहासात अभिनवचं ऑलिम्पिकमधलं गोल्ड मेडल हे 2008 वर्षातील नंबर वन ठरलं. 'अभिनव' कामगिरीभारताचं पहिलं ऑलिम्पिक गोल्ड -11 ऑगस्ट 2008चा दिवस भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदला गेला. कारण त्यादिवशी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये डौलानं तिरंगा फडकला. ऑलिम्पिकच्या 108 वर्षांच्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच वैयक्तिक गोल्ड मेडल मिळालं.अभिनवंन 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात गोल्डवर नेम साधला होता.या सुवर्ण कामगिरीनंतरही बिंद्राच्या चेह-यावर होतं फक्त एक शांत हास्यऑलिम्पिकमधल्या या यशासाठी गोल्डन बॉय अभिनव बिंद्राला चेन्नईतल्या एस एम आर विद्यापीठाने साहित्यातली डॉक्टरेट बहाल केली. एमबीए ची पदवी त्याच्याकडे होतीच अन् या सन्मानामुळे तो आता डॉ. अभिनव बिंद्रा बनला.नारंगची रेकॉर्ड कामगिरी-अभिनव बिंद्रानंतर 2008 चं वर्ष गाजवलं ते शूटर गगन नारंगनं.एक नव्हे तर तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड करीत त्यानं आधी आशियाई आणि नंतर जागतिक नेमबाजी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. हैदराबादच्या गगनचं ऑलिम्पिक मेडल थोडक्यात हुकलं. पण त्याची भरपाई त्यानं जर्मनीतील वर्ल्ड कपमध्ये 600 पैकी 600 पॉइन्ट पटकावत केली. आणि त्यानंतर फायनलमध्ये पुन्हा 703.1 पॉइन्टची कमाई करीत त्यानं ऑस्ट्रेलियाच्या थॉमस फ्रॅकनिकचा विक्रम मोडीत काढला.स्ट्रार नेमबाजांचा फ्लॉप शो-भारताच्या इतर स्टार नेमबाजांना मात्र 2008चं वर्ष निराशजनकचं गेलं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये डबल्स ट्रॅप प्रकारातल्या पराभवानंतर राज्यवर्धन सिंग राठोड आपलं दु:ख लपवू शकत नव्हता. 4वर्षांपूर्वी अथेन्समध्ये ऑलिम्पिकचं सिल्व्हर मेडल जिंकणा-या राठोडला यावर्षी फायनललाही क्वालिफाय होता आलं नाही.महिलांच्या 10मीटर एअर रायफल प्रकारात अंजली भागवतने 393 पॉइन्टस मिळवले. एरवी याच प्रकारात तिचा अ‍ॅव्हरेज स्कोअर आहे 396 पॉइन्टसचा. तिची साथीदार अवनीत कौरनं मिळवले 389 पॉइन्टस. ऑलिम्पिक क्वालिफाय स्पर्धेतला तिचा स्कोअर होता 398 पुरुषांच्या 10मीटर एअर पिस्तुल प्रकारात समरेश जंग त्याच्या सर्वोत्तम वैयक्तिक स्कोअरपेक्षा 14 पॉइन्टस मागे होता.नेमबाजीतलं आशास्थान-रोंजन सोधीनं बेलग्रेडमध्ये झालेल्या नेमबाजीच्या वर्ल्डकप स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये 2वर्ल्ड रेकॉर्डकरीत गोल्ड जिंकले होते.या कामगिरीनंतरही त्याला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळाला नाही.पण त्याच्या या यशानं 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला डबल ट्रॅपमचा नवा राज्यवर्धन राठोर सापडलाय.ज्युनिअर नेमबाज चमकलेशूटिंगमध्ये सीनियर जबरदस्त कामगिरी करत असतानाच ज्युनिअर नेमबाजांनीही 2008चं वर्ष गाजवलं. पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये युवा नेमबाजांनी भारताला 6 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 1 ब्राँझ जिंकून दिलंय. आणि यात महाराष्ट्राच्या नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कोल्हापूरची राही सरनौबत औरंगाबादची तेजस्वीनी मुळे यांच गोल्ड तर मुंबई्‌या रुशाद दमानियानं भारताला बाँझ मेडल जिंकून दिलं.बॉक्सर्सची कमालसरत्या 2008 वर्षावर भारतीय बॉक्सरनी आपला विनिंग पंच उमटवला.बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदरनं ब्राँझ मेडल जिंकलं आणि वर्ष सरता सरता भारतीय बॉक्सर्सनी मॉस्कोतील वर्ल्ड कपही गाजवला.विजेंदरला ऑलिम्पिक ब्राँझबॉक्सिंगमध्ये 2008चं वर्ष विजेंदरचं ठरलं.बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकून त्यानं भारतीय बॉक्सिंगला एक नवा चेहारा दिला.भारतासाठी ऑलिम्पिकच्या बॉक्सिंगमधलं हे पहिलं मेडल होतं. विजेंदरसह अखिलकुमार आणि जिंतेंदरनंही बीजिंग ऑलिम्पिकची क्वॉर्टर फायनल गाठत जागतिक बॉक्सिंगच्या नकाशावर भारताला मानाचं स्थानं मिळवून दिलं.या विजयी पर्वाची सुरूवात केली ती अखिलेशनं.थायलंडमध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या आशियाई क्वालिफायिंग स्पर्धेत अखिलेशनं गोल्ड मेडल जिंकत स्पर्धेतील बेस्ट बॉक्सरचा किताबही पटकावला होता.अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता.अखिलेश पाठोपाठ विजेंदरही प्रेसिडेंट कप स्पर्धेत गोल्डमेडल जिंकणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरला होता.विद्यमान ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता बख्तियारला हरवून त्यानं हे यश मिळवलं होतं.वर्ल्ड चॅम्पियनशिप गाजवलीबीजिंग ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी केल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मॉस्कोतील वर्ल्ड चॅम्पियनशीपही गाजवली.विजेंदर कुमार, अखिल कुमार, जिंतेदर कुमार आणि दिनेश सिंग यांनी ब्रॉंझ मेडल जिंकली.वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिल्यांदाच 4 मेडल मिळाली होती.सहाजिकचं भारताच्या या विजयीविरांच स्वागतही त्याच थाटात झालं.'पोस्टरबॉय' विजेंदरबॉक्सिंगमधल्या या सातत्यपूर्ण यशाची मार्केटींग जगतानंही दखलं घेतली.ऑलिम्पिक चॅम्प विजेंदर पोस्टर बॉय बनला.एका इन्शुरन्स कंपनीनं विजेंदरला कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून साईन केलं फॅशन जगतातही विजेंदर सध्या हॉट मॉडेल ठरलाय. तर अखिल कुमार एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे.बॉक्सिंगच्या या यशानं सिनेस्टार संजय दत्तनंही या खेळाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्याचं मान्य केलं.मेरीकॉम 4थ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सिंग हा तसा मर्दानी खेळ.पुरुष विभागात भारताची विजयी घोडदौड सुरू असतनाच महिला बॉक्सरही मागे नव्हत्या.दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मणीपूरच्या मेरीकॉमनं गोल्ड मेडल मिळवलं. पण यानंतर ती बॉक्सींगपासून काहीशी दूर गेली.एक वर्षापूर्वी तिनं जुळ्यामुलांना जन्म दिला. आणि कौटुंबिक रगाड्यात तिच्या सुवर्ण कारकीर्दीचा अखेर होणार असं वाटत असतानाच मेरी कॉमनं पुनरागमन केलं आणि चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. मेरिकोमसोबतचं मणीपूरच्या थोकचोम नानाओ सिंगनं मेक्सिकोतील वर्ल्ड युथ बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 08:11 PM IST

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 1ii)

नेमबाजीत सुवर्ण कामगिरीभारतीय शूटिंगसाठी 2008चं वर्ष अभिनव ठरलं. तसं गेल्या काही वर्षात भारतीय शूटर्सनी जगात भारताचा दबदबा निर्माण केला होता. पण सरत्या 2008 वर्षात त्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब झाले.केवळ शूटिंगचं नव्हे तर एकूणचं भारताच्या क्रीडा इतिहासात अभिनवचं ऑलिम्पिकमधलं गोल्ड मेडल हे 2008 वर्षातील नंबर वन ठरलं. 'अभिनव' कामगिरीभारताचं पहिलं ऑलिम्पिक गोल्ड -11 ऑगस्ट 2008चा दिवस भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नोंदला गेला. कारण त्यादिवशी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये डौलानं तिरंगा फडकला. ऑलिम्पिकच्या 108 वर्षांच्या इतिहासात भारताला पहिल्यांदाच वैयक्तिक गोल्ड मेडल मिळालं.अभिनवंन 10 मीटर एअर रायफल क्रीडा प्रकारात गोल्डवर नेम साधला होता.या सुवर्ण कामगिरीनंतरही बिंद्राच्या चेह-यावर होतं फक्त एक शांत हास्यऑलिम्पिकमधल्या या यशासाठी गोल्डन बॉय अभिनव बिंद्राला चेन्नईतल्या एस एम आर विद्यापीठाने साहित्यातली डॉक्टरेट बहाल केली. एमबीए ची पदवी त्याच्याकडे होतीच अन् या सन्मानामुळे तो आता डॉ. अभिनव बिंद्रा बनला.नारंगची रेकॉर्ड कामगिरी-अभिनव बिंद्रानंतर 2008 चं वर्ष गाजवलं ते शूटर गगन नारंगनं.एक नव्हे तर तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड करीत त्यानं आधी आशियाई आणि नंतर जागतिक नेमबाजी स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं. हैदराबादच्या गगनचं ऑलिम्पिक मेडल थोडक्यात हुकलं. पण त्याची भरपाई त्यानं जर्मनीतील वर्ल्ड कपमध्ये 600 पैकी 600 पॉइन्ट पटकावत केली. आणि त्यानंतर फायनलमध्ये पुन्हा 703.1 पॉइन्टची कमाई करीत त्यानं ऑस्ट्रेलियाच्या थॉमस फ्रॅकनिकचा विक्रम मोडीत काढला.स्ट्रार नेमबाजांचा फ्लॉप शो-भारताच्या इतर स्टार नेमबाजांना मात्र 2008चं वर्ष निराशजनकचं गेलं. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये डबल्स ट्रॅप प्रकारातल्या पराभवानंतर राज्यवर्धन सिंग राठोड आपलं दु:ख लपवू शकत नव्हता. 4वर्षांपूर्वी अथेन्समध्ये ऑलिम्पिकचं सिल्व्हर मेडल जिंकणा-या राठोडला यावर्षी फायनललाही क्वालिफाय होता आलं नाही.महिलांच्या 10मीटर एअर रायफल प्रकारात अंजली भागवतने 393 पॉइन्टस मिळवले. एरवी याच प्रकारात तिचा अ‍ॅव्हरेज स्कोअर आहे 396 पॉइन्टसचा. तिची साथीदार अवनीत कौरनं मिळवले 389 पॉइन्टस. ऑलिम्पिक क्वालिफाय स्पर्धेतला तिचा स्कोअर होता 398 पुरुषांच्या 10मीटर एअर पिस्तुल प्रकारात समरेश जंग त्याच्या सर्वोत्तम वैयक्तिक स्कोअरपेक्षा 14 पॉइन्टस मागे होता.नेमबाजीतलं आशास्थान-रोंजन सोधीनं बेलग्रेडमध्ये झालेल्या नेमबाजीच्या वर्ल्डकप स्पर्धेत डबल ट्रॅपमध्ये 2वर्ल्ड रेकॉर्डकरीत गोल्ड जिंकले होते.या कामगिरीनंतरही त्याला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळाला नाही.पण त्याच्या या यशानं 2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला डबल ट्रॅपमचा नवा राज्यवर्धन राठोर सापडलाय.ज्युनिअर नेमबाज चमकलेशूटिंगमध्ये सीनियर जबरदस्त कामगिरी करत असतानाच ज्युनिअर नेमबाजांनीही 2008चं वर्ष गाजवलं. पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये युवा नेमबाजांनी भारताला 6 गोल्ड, 3 सिल्व्हर आणि 1 ब्राँझ जिंकून दिलंय. आणि यात महाराष्ट्राच्या नेमबाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. कोल्हापूरची राही सरनौबत औरंगाबादची तेजस्वीनी मुळे यांच गोल्ड तर मुंबई्‌या रुशाद दमानियानं भारताला बाँझ मेडल जिंकून दिलं.बॉक्सर्सची कमालसरत्या 2008 वर्षावर भारतीय बॉक्सरनी आपला विनिंग पंच उमटवला.बीजिंग ऑलिम्पिकमध्ये विजेंदरनं ब्राँझ मेडल जिंकलं आणि वर्ष सरता सरता भारतीय बॉक्सर्सनी मॉस्कोतील वर्ल्ड कपही गाजवला.विजेंदरला ऑलिम्पिक ब्राँझबॉक्सिंगमध्ये 2008चं वर्ष विजेंदरचं ठरलं.बीजिंग ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकून त्यानं भारतीय बॉक्सिंगला एक नवा चेहारा दिला.भारतासाठी ऑलिम्पिकच्या बॉक्सिंगमधलं हे पहिलं मेडल होतं. विजेंदरसह अखिलकुमार आणि जिंतेंदरनंही बीजिंग ऑलिम्पिकची क्वॉर्टर फायनल गाठत जागतिक बॉक्सिंगच्या नकाशावर भारताला मानाचं स्थानं मिळवून दिलं.या विजयी पर्वाची सुरूवात केली ती अखिलेशनं.थायलंडमध्ये झालेल्या ऑलिम्पिकच्या आशियाई क्वालिफायिंग स्पर्धेत अखिलेशनं गोल्ड मेडल जिंकत स्पर्धेतील बेस्ट बॉक्सरचा किताबही पटकावला होता.अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला होता.अखिलेश पाठोपाठ विजेंदरही प्रेसिडेंट कप स्पर्धेत गोल्डमेडल जिंकणारा एकमेव भारतीय बॉक्सर ठरला होता.विद्यमान ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेता बख्तियारला हरवून त्यानं हे यश मिळवलं होतं.वर्ल्ड चॅम्पियनशिप गाजवलीबीजिंग ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी केल्यानंतर भारतीय बॉक्सर्सनी मॉस्कोतील वर्ल्ड चॅम्पियनशीपही गाजवली.विजेंदर कुमार, अखिल कुमार, जिंतेदर कुमार आणि दिनेश सिंग यांनी ब्रॉंझ मेडल जिंकली.वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिल्यांदाच 4 मेडल मिळाली होती.सहाजिकचं भारताच्या या विजयीविरांच स्वागतही त्याच थाटात झालं.'पोस्टरबॉय' विजेंदरबॉक्सिंगमधल्या या सातत्यपूर्ण यशाची मार्केटींग जगतानंही दखलं घेतली.ऑलिम्पिक चॅम्प विजेंदर पोस्टर बॉय बनला.एका इन्शुरन्स कंपनीनं विजेंदरला कंपनीचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून साईन केलं फॅशन जगतातही विजेंदर सध्या हॉट मॉडेल ठरलाय. तर अखिल कुमार एका म्युझिक अल्बममध्ये झळकणार आहे.बॉक्सिंगच्या या यशानं सिनेस्टार संजय दत्तनंही या खेळाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होण्याचं मान्य केलं.मेरीकॉम 4थ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बॉक्सिंग हा तसा मर्दानी खेळ.पुरुष विभागात भारताची विजयी घोडदौड सुरू असतनाच महिला बॉक्सरही मागे नव्हत्या.दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मणीपूरच्या मेरीकॉमनं गोल्ड मेडल मिळवलं. पण यानंतर ती बॉक्सींगपासून काहीशी दूर गेली.एक वर्षापूर्वी तिनं जुळ्यामुलांना जन्म दिला. आणि कौटुंबिक रगाड्यात तिच्या सुवर्ण कारकीर्दीचा अखेर होणार असं वाटत असतानाच मेरी कॉमनं पुनरागमन केलं आणि चौथ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली. मेरिकोमसोबतचं मणीपूरच्या थोकचोम नानाओ सिंगनं मेक्सिकोतील वर्ल्ड युथ बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close