S M L

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 5)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 5) भारतीय टेनिससाठी 2008चं वर्ष संमिश्र ठरलं. पण आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मात्र प्रचंड उलथापालथ झाली. टेनिसचा सम्राट रॉजर फेडररंच साम्राज्य स्पेनच्या राफेल नडालनं संपुष्टात आणलं.विम्बल्डनवरील फेडरर आणि नडालमधील फायनल तर मॅच ऑफ द सेंच्युरी ठरली.नदाल बनला नंबर वनबीजिंग ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीतील या गोल्ड मेडलनं स्पेनच्या राफेल नडालच्या टेनिस जगतावरील वर्चस्वावर शिक्कामोर्तब केलं. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचं तब्बल साडे चार वर्षाचं साम्राज्य नडालनं संपुष्टात आणलं.आणि नडाल बनला टेनिसमधला नंबर एक.फेडररच्या वर्चस्वाला शहयंदाची विम्बलडनची फायनल, ही मॅच ऑफ द सेंच्युरी म्हणून गौरवली गेली. थरार...उत्कंठा...जिद्द...जिगर...आनंद...दु:ख...यांच अजब मिश्रण या फायनलमध्ये अवघ्या जगानं अनुभवलं.विम्बल्डनच्या ऐतिहासिक सेंटर कोर्ट वरील फेडरर आणि नदालमधली फायनल म्हणजे कधी संपूच नये असा वाटणारा रहस्यपट होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शेवट धक्कादायक आणि अनपेक्षित होता. 5 सेटपर्यंत दोघांमध्ये रंगलेल्या या क्लायमॅक्सच्या लढाईत टेनिस फॅन्सनी बघितलं शतकातील सर्वोत्तम टेनिस. फेडररच्या सर्व्हिसने वेळोवेळी त्याला वाचवलं. पण नशीब नदालच्या बाजूने होतं. फेडररचा आणखी एक अन फोर्स्ड एरर आणि नदानलं विम्बल्डन विजेतेपदावर नाव कोरलं. फेडररसाठी खराब वर्ष2008 चा हंगाम फेडररसाठी आत्तापर्यंतच्या करिअरमधला सगळ्यात वाईट ठरला. शांघाय मास्टर्स स्पर्धेत गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच फेडरर या स्पर्धेची सेमीफायनलही गाठू शकला नाही.शिवाय अँडी मरेनं यावर्षी चक्क तीनवेळा फेडररला हरवण्याची किमया केली.वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये नोव्हॅक याँकोविचकडून त्याला पराभवाचा धक्का बसला त्यानंतर राफेल नदालनं फेडररला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत केलं आणि त्यानंतर पाच वर्षांत पहिल्यांदाच फेडररला विम्बल्डन स्पर्धेत ग्रास कोर्टवर नदालकडून पराभवाचा आणखी एक धक्का बसला.पण वर्षाच्या शेवटच्या ग्रँड स्लॅममध्ये मात्र फेडररनं अँडी मरेला नमवत सलग पाच वेळा यू एस ओपन जिंकण्याचा पराक्रम केला.आणि करिअरमधील तब्बल 13 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली.भारतीय टेनिसची दशा...पेस, भूपती ऑलिम्पिकमध्ये फ्लॉप 2008 चं वर्ष भारतीय टेनिससाठी फारसं चांगलं गेलं नाही.बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या त्या लिअ‍ॅण्डर पेस आणि महेश भुपती जोडीकडून.पण स्वित्झर्लंडच्या फेडरर आणि वॉवरिंगानं पेस-भुपतीचं स्वप्न धुळीस मिळवलं.भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली.एकेरीत तीला थेट प्रवेश मिळाला.तर वाईल्ड कार्ड एण्ट्रीमुळे तीला सुनिता रावबरोबर दुहेरीतही खेळण्याचा चान्स मिळाला. पण दुखापतींमुळे तिच्या सर्व आशांवर पाणी फेरलं.वर्ष अखेरिस सानिया जागतिक टेनिस क्रमवारीत 101व्या क्रमांकावर फेकली गेली.पेसविरुद्ध खेळाडूंचं बंड-पण भारतीय टेनिसचं दुदैर्व इथंच संपत नाही.भारताच्या डेव्हिस कप टेनिस टीमनं कॅप्टन लिअ‍ॅण्डर पेसविरुध्द उघड बंड केलं.महेश भुपती हा या बंडाचा सेनापती होता. हे बंड संघटनेनं कसंबसं शमवलं खरं पण डेव्हिस कपमधला पराभव ते टाळू शकले नाहीत.भारतीय टेनिस महासंघ म्हणजेचं आयटा आणि महेश भुपतीची इव्हंट मॅनेजमेंट कंपनीतील शितयुध्दाचा फटकाही भारतीय टेनिसला बसला.त्यातचं केंद्रीय क्रीडा मंत्री एम.एस. गिलनं भारतीय नागरिकत्व असलेल्या खेळाडूंनाच यापुढे भारताचं प्रतिनिधीत्व करता येईल अशी घोषणा केली. आणि त्याचा सर्वाधिक फटका टेनिसला बसला.स्पर्धांचं ढिसाळ नियोजन- मुंबईतली 2008ची एटीपी स्पर्धा ही 2009सालीही होणार नसल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बंगळुरूमधली डब्ल्यूटीए स्पर्धाही बंद करण्यात आली. 2009ची सनफिस्ट ओपनही रद्द करण्यात आली. सहभागी देश दुस-या फळीचे खेळाडू पाठवत असल्यानं पुण्यात होणारी एशिया मेन्स टूरही रद्द करण्यात आली.जगभरातील आर्थिक मंदीमुळे नव्हे तर नियोजनातील अभावामुळे टेनिसला हा फटका बसला.जिगरबाज पेस- सगळं काही मनासारक घडत नसतानाही पेसनं भारतीय टेनिसप्रेमींना काही आनंदाचे क्षण दिलेतं. अमेरिकनं ओपनच्या मिक्स डबलमध्ये कॅरा ब्लँकसह त्यानं ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद खेचून आणलं...तर डबल्समध्ये तो उपविजेता ठरला.मानवी क्षमतेला आव्हान देणा-या अनेक घटना क्रीडा जगतानं 2008 मध्ये अनुभवल्या. हुसैन बोल्टचा 100 मीटर शर्यतीतील अविश्‍वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड. मायकेल फेल्पचे बीजींग ऑलिम्पिकमधील 7 वर्ल्ड रेकॉर्ड आणि 8 गोल्ड मेडल. आजवर अशक्य वाटणा-या या घटना 2008मध्ये सत्यात उतरलेल्या अवघ्या जगानं पाहिलं...क्रिकेटमधील धोणी मॅनीया...बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलेलं पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल...बॉक्सिंग आणि कुस्तीतील ऑलिम्पिक ब्राँझ मेडल...बुध्दिबळावरील आनंद राज...बॅडमिंटनमधीलं सायनाचा धडाका...एकूणचं काय 2008मध्ये क्रीडा जगतानं भारताला भरभरून दिलं. क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं भारतानं 2008मध्ये पहिलं पाऊल दिमाखात टाकलंय असं म्हणायला हरकत नाही...

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 07:40 PM IST

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 5)

भारतीय टेनिससाठी 2008चं वर्ष संमिश्र ठरलं. पण आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये मात्र प्रचंड उलथापालथ झाली. टेनिसचा सम्राट रॉजर फेडररंच साम्राज्य स्पेनच्या राफेल नडालनं संपुष्टात आणलं.विम्बल्डनवरील फेडरर आणि नडालमधील फायनल तर मॅच ऑफ द सेंच्युरी ठरली.नदाल बनला नंबर वनबीजिंग ऑलिम्पिकच्या पुरुष एकेरीतील या गोल्ड मेडलनं स्पेनच्या राफेल नडालच्या टेनिस जगतावरील वर्चस्वावर शिक्कामोर्तब केलं. स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररचं तब्बल साडे चार वर्षाचं साम्राज्य नडालनं संपुष्टात आणलं.आणि नडाल बनला टेनिसमधला नंबर एक.फेडररच्या वर्चस्वाला शहयंदाची विम्बलडनची फायनल, ही मॅच ऑफ द सेंच्युरी म्हणून गौरवली गेली. थरार...उत्कंठा...जिद्द...जिगर...आनंद...दु:ख...यांच अजब मिश्रण या फायनलमध्ये अवघ्या जगानं अनुभवलं.विम्बल्डनच्या ऐतिहासिक सेंटर कोर्ट वरील फेडरर आणि नदालमधली फायनल म्हणजे कधी संपूच नये असा वाटणारा रहस्यपट होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शेवट धक्कादायक आणि अनपेक्षित होता. 5 सेटपर्यंत दोघांमध्ये रंगलेल्या या क्लायमॅक्सच्या लढाईत टेनिस फॅन्सनी बघितलं शतकातील सर्वोत्तम टेनिस. फेडररच्या सर्व्हिसने वेळोवेळी त्याला वाचवलं. पण नशीब नदालच्या बाजूने होतं. फेडररचा आणखी एक अन फोर्स्ड एरर आणि नदानलं विम्बल्डन विजेतेपदावर नाव कोरलं. फेडररसाठी खराब वर्ष2008 चा हंगाम फेडररसाठी आत्तापर्यंतच्या करिअरमधला सगळ्यात वाईट ठरला. शांघाय मास्टर्स स्पर्धेत गेल्या सात वर्षात पहिल्यांदाच फेडरर या स्पर्धेची सेमीफायनलही गाठू शकला नाही.शिवाय अँडी मरेनं यावर्षी चक्क तीनवेळा फेडररला हरवण्याची किमया केली.वर्षाच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये नोव्हॅक याँकोविचकडून त्याला पराभवाचा धक्का बसला त्यानंतर राफेल नदालनं फेडररला फ्रेंच ओपनमध्ये पराभूत केलं आणि त्यानंतर पाच वर्षांत पहिल्यांदाच फेडररला विम्बल्डन स्पर्धेत ग्रास कोर्टवर नदालकडून पराभवाचा आणखी एक धक्का बसला.पण वर्षाच्या शेवटच्या ग्रँड स्लॅममध्ये मात्र फेडररनं अँडी मरेला नमवत सलग पाच वेळा यू एस ओपन जिंकण्याचा पराक्रम केला.आणि करिअरमधील तब्बल 13 वी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली.भारतीय टेनिसची दशा...पेस, भूपती ऑलिम्पिकमध्ये फ्लॉप 2008 चं वर्ष भारतीय टेनिससाठी फारसं चांगलं गेलं नाही.बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या सर्वाधिक अपेक्षा होत्या त्या लिअ‍ॅण्डर पेस आणि महेश भुपती जोडीकडून.पण स्वित्झर्लंडच्या फेडरर आणि वॉवरिंगानं पेस-भुपतीचं स्वप्न धुळीस मिळवलं.भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली.एकेरीत तीला थेट प्रवेश मिळाला.तर वाईल्ड कार्ड एण्ट्रीमुळे तीला सुनिता रावबरोबर दुहेरीतही खेळण्याचा चान्स मिळाला. पण दुखापतींमुळे तिच्या सर्व आशांवर पाणी फेरलं.वर्ष अखेरिस सानिया जागतिक टेनिस क्रमवारीत 101व्या क्रमांकावर फेकली गेली.पेसविरुद्ध खेळाडूंचं बंड-पण भारतीय टेनिसचं दुदैर्व इथंच संपत नाही.भारताच्या डेव्हिस कप टेनिस टीमनं कॅप्टन लिअ‍ॅण्डर पेसविरुध्द उघड बंड केलं.महेश भुपती हा या बंडाचा सेनापती होता. हे बंड संघटनेनं कसंबसं शमवलं खरं पण डेव्हिस कपमधला पराभव ते टाळू शकले नाहीत.भारतीय टेनिस महासंघ म्हणजेचं आयटा आणि महेश भुपतीची इव्हंट मॅनेजमेंट कंपनीतील शितयुध्दाचा फटकाही भारतीय टेनिसला बसला.त्यातचं केंद्रीय क्रीडा मंत्री एम.एस. गिलनं भारतीय नागरिकत्व असलेल्या खेळाडूंनाच यापुढे भारताचं प्रतिनिधीत्व करता येईल अशी घोषणा केली. आणि त्याचा सर्वाधिक फटका टेनिसला बसला.स्पर्धांचं ढिसाळ नियोजन- मुंबईतली 2008ची एटीपी स्पर्धा ही 2009सालीही होणार नसल्याची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर बंगळुरूमधली डब्ल्यूटीए स्पर्धाही बंद करण्यात आली. 2009ची सनफिस्ट ओपनही रद्द करण्यात आली. सहभागी देश दुस-या फळीचे खेळाडू पाठवत असल्यानं पुण्यात होणारी एशिया मेन्स टूरही रद्द करण्यात आली.जगभरातील आर्थिक मंदीमुळे नव्हे तर नियोजनातील अभावामुळे टेनिसला हा फटका बसला.जिगरबाज पेस- सगळं काही मनासारक घडत नसतानाही पेसनं भारतीय टेनिसप्रेमींना काही आनंदाचे क्षण दिलेतं. अमेरिकनं ओपनच्या मिक्स डबलमध्ये कॅरा ब्लँकसह त्यानं ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद खेचून आणलं...तर डबल्समध्ये तो उपविजेता ठरला.मानवी क्षमतेला आव्हान देणा-या अनेक घटना क्रीडा जगतानं 2008 मध्ये अनुभवल्या. हुसैन बोल्टचा 100 मीटर शर्यतीतील अविश्‍वसनीय वर्ल्ड रेकॉर्ड. मायकेल फेल्पचे बीजींग ऑलिम्पिकमधील 7 वर्ल्ड रेकॉर्ड आणि 8 गोल्ड मेडल. आजवर अशक्य वाटणा-या या घटना 2008मध्ये सत्यात उतरलेल्या अवघ्या जगानं पाहिलं...क्रिकेटमधील धोणी मॅनीया...बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतानं जिंकलेलं पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल...बॉक्सिंग आणि कुस्तीतील ऑलिम्पिक ब्राँझ मेडल...बुध्दिबळावरील आनंद राज...बॅडमिंटनमधीलं सायनाचा धडाका...एकूणचं काय 2008मध्ये क्रीडा जगतानं भारताला भरभरून दिलं. क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेनं भारतानं 2008मध्ये पहिलं पाऊल दिमाखात टाकलंय असं म्हणायला हरकत नाही...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 07:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close