S M L

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 2)

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 2) लाल मातीला अस्सल मैदानी खेळ म्हणजे कुस्ती.. भारताची, महाराष्ट्राची खरी ओळख.. पण हा खेळ नामशेष होणार असं वाटत असतानाच 2008 हे वर्ष कुस्तीसाठी ख-या अर्थानं सुवर्ण वर्ष ठरलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मल्लांनी मैदान मारत कुस्तीला गतवैभव परत मिळवून दिलं.. कुस्तीतला सुवर्णकाळ परतलाहेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीतलं पहिलं मेडल मिळवून दिलं. आणि यानंतर ऑलिम्पिक इतिहासात भारतीय कुस्तीच्या वाट्याला असे अभिमानाचे क्षण आलेच नाहीत. पण तब्बल 52 वर्षांनंतर तो सुवर्ण क्षण अखेर आला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतानं कुस्तीत इतिहास रचला. फ्री स्टाईल कुस्तीच्या 66 किलो वजनी गटात भारताच्या सुशील कुमारने ब्राँझ मेडल पटकावलं. दिवसाची सुरुवात पराभवानं झालेल्या सुशीलनं रेपीचाज राऊंडमध्ये वर्ल्ड रॅन्किंगमधल्या बेलारुसच्या दुस-या नंबरच्या, अमेरिकेच्या तिस-या नंबरच्या आणि कझाकिस्तानच्या चौथ्या नंबरच्या मल्लांना त्यानं लोऴवलं. आणि संध्याकाळी मेडल स्वीकारण्यासाठी पोडिअमवर उभा राहिला.भारताचा नवा स्पोर्ट्स हीरो बीजिंग ऑलिम्पिकमधल्या विजयानंतर नझफगडचा मल्ल सुशिलकुमारच्या रुपानं भारताला नवा स्पोर्ट्स हिरो मिळाला. आपल्या दमदार कामगिरीनं देशाचं नाव जगामध्ये उंचावणा-या सुशिलकुमारनं वर्ल्ड रँकींगमध्येही तिस-या क्रमांकावर झेप घेतली.भारतीय कुस्तीपटूंचा दरारा क्रिकेटवेड्या भारतात सुशिलकुमारनं कुस्तीचा पाया रचला होता. आणि यावर कळस चढवला तो भारताच्या युवा कुस्तीपटूंनी. पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये युवा कुस्तीपटूंनी शंभर टक्के यश मिळवलं. कुस्तीत 7 पैकी 7गोल्ड मेडल भारताने जिंकली. आणि महाराष्ट्राचा त्यात वाटा होता 3 गोल्डचा.भारतीय कुस्तीपटूंच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी ऑस्ट़ेालियाच्या कुस्तीपटुनी चक्क पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीला भेट दिली. या लाल मातीत नेमकं काय दडलंय ते या कुस्तीपटूंनी जाणून घेतलं. राहुल आवारे बनला महाराष्ट्राची शानसरत्या वर्षात महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात आणखी एक सुवर्णअध्याय जोडला राहुल आवारेनं.राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 33 वर्षानंतर त्यानं महाराष्ट्राला फ्री स्टाईलमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलंय.अयोध्येत झालेल्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुलनं 55 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं. तर याच स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारनंही 66 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं.वर्ष सरत आलं की क्रीडाक्षेत्रात मैदान गाजवणा-या खेळांचा आणि खेळाडूंचा आढावा घेतला जातो.पण अभावानंच यात कुस्तीचा उल्लेख असतो.2008 हे वर्ष मात्र याला अपवाद ठरलं असंच म्हणावं लागेल.राज्य आणि राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुवर्ण कामगिरी करत भारतीय मल्लांनी ख-या अर्थानं आखाडा जिंकला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 31, 2008 08:03 PM IST

आढावा स्पोर्टस 2008 (भाग 2)

लाल मातीला अस्सल मैदानी खेळ म्हणजे कुस्ती.. भारताची, महाराष्ट्राची खरी ओळख.. पण हा खेळ नामशेष होणार असं वाटत असतानाच 2008 हे वर्ष कुस्तीसाठी ख-या अर्थानं सुवर्ण वर्ष ठरलं. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या मल्लांनी मैदान मारत कुस्तीला गतवैभव परत मिळवून दिलं.. कुस्तीतला सुवर्णकाळ परतलाहेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला कुस्तीतलं पहिलं मेडल मिळवून दिलं. आणि यानंतर ऑलिम्पिक इतिहासात भारतीय कुस्तीच्या वाट्याला असे अभिमानाचे क्षण आलेच नाहीत. पण तब्बल 52 वर्षांनंतर तो सुवर्ण क्षण अखेर आला. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारतानं कुस्तीत इतिहास रचला. फ्री स्टाईल कुस्तीच्या 66 किलो वजनी गटात भारताच्या सुशील कुमारने ब्राँझ मेडल पटकावलं. दिवसाची सुरुवात पराभवानं झालेल्या सुशीलनं रेपीचाज राऊंडमध्ये वर्ल्ड रॅन्किंगमधल्या बेलारुसच्या दुस-या नंबरच्या, अमेरिकेच्या तिस-या नंबरच्या आणि कझाकिस्तानच्या चौथ्या नंबरच्या मल्लांना त्यानं लोऴवलं. आणि संध्याकाळी मेडल स्वीकारण्यासाठी पोडिअमवर उभा राहिला.भारताचा नवा स्पोर्ट्स हीरो बीजिंग ऑलिम्पिकमधल्या विजयानंतर नझफगडचा मल्ल सुशिलकुमारच्या रुपानं भारताला नवा स्पोर्ट्स हिरो मिळाला. आपल्या दमदार कामगिरीनं देशाचं नाव जगामध्ये उंचावणा-या सुशिलकुमारनं वर्ल्ड रँकींगमध्येही तिस-या क्रमांकावर झेप घेतली.भारतीय कुस्तीपटूंचा दरारा क्रिकेटवेड्या भारतात सुशिलकुमारनं कुस्तीचा पाया रचला होता. आणि यावर कळस चढवला तो भारताच्या युवा कुस्तीपटूंनी. पुण्यात झालेल्या कॉमनवेल्थ युथ गेम्समध्ये युवा कुस्तीपटूंनी शंभर टक्के यश मिळवलं. कुस्तीत 7 पैकी 7गोल्ड मेडल भारताने जिंकली. आणि महाराष्ट्राचा त्यात वाटा होता 3 गोल्डचा.भारतीय कुस्तीपटूंच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी ऑस्ट़ेालियाच्या कुस्तीपटुनी चक्क पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीला भेट दिली. या लाल मातीत नेमकं काय दडलंय ते या कुस्तीपटूंनी जाणून घेतलं. राहुल आवारे बनला महाराष्ट्राची शानसरत्या वर्षात महाराष्ट्राच्या कुस्ती इतिहासात आणखी एक सुवर्णअध्याय जोडला राहुल आवारेनं.राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत तब्बल 33 वर्षानंतर त्यानं महाराष्ट्राला फ्री स्टाईलमध्ये गोल्ड मेडल जिंकून दिलंय.अयोध्येत झालेल्या सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राहुलनं 55 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकलं. तर याच स्पर्धेत ऑलिम्पिकमध्ये ब्राँझ मेडल जिंकणा-या सुशील कुमारनंही 66 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं.वर्ष सरत आलं की क्रीडाक्षेत्रात मैदान गाजवणा-या खेळांचा आणि खेळाडूंचा आढावा घेतला जातो.पण अभावानंच यात कुस्तीचा उल्लेख असतो.2008 हे वर्ष मात्र याला अपवाद ठरलं असंच म्हणावं लागेल.राज्य आणि राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही सुवर्ण कामगिरी करत भारतीय मल्लांनी ख-या अर्थानं आखाडा जिंकला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 31, 2008 08:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close