S M L

मस्ती ऑन व्हिल्स

कल्याण - डोंबिवलीमधला स्वराज्य प्रतिष्ठान हा तरुणांचा ग्रुप कल्याण ते डहाणू या किनारपट्टीतले जलदुर्ग बाईकवरून सर करायला निघाला होता. मोहिमेला सुरुवात झाली ती दुर्गाडी किल्ल्यावरून. दुर्गाडी किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्यार मंदिर आणि देऊळ अशा दोन्ही वास्तू आहेत. मोहिमेची सुरुवात कल्याणपासूनच का, याविषयी शरद सांगतो, " कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी आरमाराची स्थापना करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे. हा किल्ला काही काळ मुसलमान लोकांच्या ताब्यात होता. म्हणून त्यांनी इथं सुं दरशी मशीद बांधली आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधवांचे सण किल्ल्यावर गुण्यागोविंदानं साजरे होतात. " स्वराज्य प्रतिष्ठानच्या मुलांनी आपला मोर्चा वळवला तो पिंपळासची गडी किल्ल्यावर. पोर्तुगीजांनी बांधलेला हा किल्ला मराठी आरमारासाठी शह देण्यासाठी बांधला होता. सध्या किल्ला भग्नावस्थेत आहे. तिथे पूर्वीसारखी जत्राही होत नाही. जेव्हा मराठे आणि पोतुगीज यांच्यात तुंब्बळ युद्ध झालं होतं... त्या युद्धात पिंपळासची गडी या गावातली बरीच स्थानिक लोक होते. त्यामुळे किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. " स्वराज्य प्रतिष्ठानच्या मुलांचा बाईक वरून जलदुर्ग सर करण्याचा प्रकल्प आणखी दोन दिवस चालणार होता. गडं किल्ल्यांवरच्या प्रेमाखातर ही मुलं काहीही करतात. हुक्की यायचा अवकाश.. की लगेच बाईकला कीक मारून किल्ला गाठतात. स्वराज्य प्रतिष्ठानच्या मुलांचं बाईकवरचं फ्रीक आऊट बघण्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा..

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 03:31 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 03:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close