S M L

बोलक्या स्ट्रक्चरचा बादशहा

युथ ट्युबमध्ये भेटला क्रियेटिव्ह डायरेक्टर, कन्स्ट्रक्शन कॅटॅलायझर धनंजय डाके. धनंज डाके म्हणजे आर्ट, इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर यांच्या संगमानं उत्तमोत्तम स्ट्रक्चर तयार करणारी असामी. त्याच्या त्या कामाबद्दल त्याला उत्तमोत्तम पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. आपल्या कालाप्रवासाबद्दल धनंजय सांगतो, " मला लहानपणापासून पेंटिंग आणि स्कल्पचर करण्याची आवड होती. दहावीनंतर मला चांगले मार्क मिळाल्यानं आई बाबांनी इंजिनिअरिंगला जा असं सांगितलं. इंजिनिअर झाल्यावर दोन - चार चांगल्या कंपन्यांसाठी इंटरव्ह्यु दिले. त्यातली टेल्को ही कंपनी मी निवडली खरी. पण टेल्कोमध्ये माझं काही मन रमेना... तिथं वर्षभर काम करून कंपनीला रामराम ठोकला. त्या दरम्यान माझा मोठा भाऊ आर्किटेक्टचं शिक्षण घेत होता. मला काही उद्योग नसल्यामुळे भावाच्या कॉलेजात जाणं व्हायचं. तिथे गेल्यावर मजा पर्यायानं आलीच की ! पण या मजेबरोबरच मला तिथे चालणा-या मॉडेलिंग एर्क्झरसाईजमध्ये रस निर्माण झाला. आर्ट, इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर यां तिनही शाखांच्या मिलाफातून काहीतरी नवीन कराता येईल असा विचार मनात आला.." 20 वर्षांपूर्वी धनंजयनं जेव्हा त्याच्या बोलक्या स्ट्रॅक्चरविषयी लोकांना सांगायला सुरुवात केली तेव्हा अनेकांच्या चेह-यांवर प्रश्नचिन्ह असायचं. हा मुलगा इतकी कठीण स्ट्रक्चर्स सहजच बनवू शकेला का, असे भाव लोकांच्या डोळ्यांवर असायचे. जशी आंतराराष्ट्रीय दर्जाची कामं भारतात येऊ लागली, भारतीय लोक परदेशात जाऊ लागले, तसं त्यांना आर्ट, इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चर या कलांच्या मिलाफानं उत्तम दर्जाच्या अप्रतिम वास्तू उभारल्या जाऊ शकतात, याचं भान यायला लागलं. तसतशी धनजंयकडे त्या धाटणीच्या कामाची मागणी वाढू लागली. त्यामुळं धनंजयनं तो बनवत असलेल्या स्ट्रक्चरमध्ये निरनिराळे प्रयोग आणि नवनिर्मितीचा ध्यास घेतला. आपल्या क्रिएटिव्ह आविष्काराविषयी धनंजय सांगतो, " अभियांत्रिकी शास्त्र आणि कला यांचा सुरेल संगम साधला तर ते सुखद आणि एक्सप्रेसिव्ह होतं. माझ्यामते माझी ही एक्सपरिमेन्ट आणि कॉन्स्टंट इनोव्हेशनची जी धडपड चालू आहे ती जगण्यासाठी आहे. तुमची जर उत्क्रांती थांबली तर मला असं वाटतं की तुमचा जीवन जगण्यातला बरचसा रस संपतो. आयुष्यात काही आव्हानात्मक काही आहे, असंही वाटत नाही. जीवन मग यंत्रासारखं बनतं. " स्पॅनिश आर्किटेक्ट कलात्रोआ हा धनंजयचा आयकॉन आहे. कारण तो आर्टिस्ट, इंजिनिअर आणि आर्किटेक्ट आहे. त्याची टेबल स्टक्चर धनंजयला चििक्कार भावतात. " कलात्रोपासून प्रेरणा घेऊन मी स्ट्रक्चर्स तयार करतो. सात - आठ वर्षांपूर्वी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी ओपन एअर ऑडि टोरिअम तयार केलं होतं. त्याचं जे कम्पोनंट डिटेलिंग आहे ते मी कलात्रोपासून प्रेरणा घेऊन केलं आहे. रेम्झो पिऑनो, रॉमझन फ्रॉॅस्ट्रे याही आर्किटेक्टस्‌ना मी माझा आदर्श मानतो. कारण हे मिनिमलायझीस आर्किटेक्ट आहेत. मिनिमलायझीस म्हणजे कोणत्याही स्ट्रक्चरमधली भव्यताही त्यांच्या बारकाव्यांसकट दाखवायची. पण त्याचबरोबरीनं ते स्ट्रक्चर पाहताच क्षणी बघणा-यांच्या डोळ्यांत भरायला हवं. तसंच ते स्ट्रक्चर बनवण्यासाठी वापरलेलं सामान हे इको फ्रेन्डली आणि रिसायकलेबल म्हणजे त्याचा वापर परत करायला यायला हवा. उदाहरणार्थ मटेरिअल कन्झमशनचं उदाहण घेऊ या. नॉर्मल स्ट्रक्चरमध्ये रुफ स्ट्रक्चर बनवायला साधारण 40 ते 50 किलो प्रत्येक स्क्वेअर फूटसाठी मटेरिअल लागतं. पण मी असं स्ट्रक्चर 20 ते 25 किलोंत बनवून देतो. मला असं वाटतं की तुम्ही ज्या छान शहरासाठी एखादं स्ट्रक्चर बनवता ते शहर कालांतरानं वाढतं. त्यामुळे त्या शहराला लागणा-या स्ट्रक्चरची गरजही बदलते. त्यामुळे 25 वर्षांनंतर जेव्हा ते स्ट्रक्चर काढून टाकण्याची गरज येते तेव्हा ते स्ट्रक्चर सहजगत्या काढता आलं पाहिजे आणि त्याचा वापरही करता आला पाहिजे. एकीकडे सिमेंट काँक्रीटच्या जंगलाचा भस्मासूर दिवसागणिक कमालीचा वाढत आहे. आणखी 50 वर्षांनी कोणतंही स्टक्चर शहरासाठी बोजा न ठरता त्याचा पुनरवापर करता आला पाहिजे. "धनंजयनं आतापर्यंत निरनिराळ्या प्रकारची आकारची दीडशेहून अधिक स्ट्रक्चर्स तयार केली आहेत. पण आता मात्र त्याला इकोफ्रन्डली स्वप्ननगरी तयार करायची आहे. या उद्याच्या विचारासाठी तो आतापासूनच तयारी करणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 11, 2009 03:36 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 11, 2009 03:36 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close