S M L

औरंगाबादमधली विमानसेवा अपुरी

10 डिसेंबर, औरंगाबादसंजय वरकड अविकसित म्हणून गणल्या जाणार्‍या मराठवाड्यात तीन ठिकाणी विमानतळ उभे राहिली पण मराठवाड्यातून मुंबई आणि इतरत्र जाणार्‍या उड्डाणांची संख्या त्याप्रमाणात वाढली नाही. जोपर्यंत ही उड्डाण वाढत नाहीत, तोपर्यंत ही विमानतळं फक्त नेत्यांच्या. आगमनांसाठी वापरली जाणार आहेत. फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये काम करणारे हेमंत लांडगे हे औरंगाबादमध्ये विमानतळ झाल्यामुळे आनंदात आहेत. हॉटेल व्यवसायामुळं पर्यटक, कॉर्पोरेट कंपनीचे अधिकारी, उद्योजक आणि राजकीय मंडळी त्यांच्या संपर्कात येतात. या विमानतळामुळे व्यवसाय वाढण्याची त्यांना आशा आहे. "हे विमानतळ झालं याचा आनंद वाटतोय. पण आता त्यासोबतच आता कोणत्या एअर कंपन्याशी आपण करार करतो, किती नवी उड्डाणं वाढतात, किती शहराशी आपला संपर्क जोडला जातो, हे महत्वाचं आहे. औद्योगिक विकासासाठीही याचा उपयोग व्हायला हवा" असं हेमंत लांडगे यांनी सांगितलं.वेरुळ-अजिंठा लेण्यांमुळे औरंगाबादमध्ये पर्यटक येत असतात. फाइव्ह स्टार हॉटेलमधला जेमतेम वीस टक्के व्यवसाय पर्यटकांमुळे होतो. पण आता या विमानतळामुळे तो वाढू शकेल. त्यासाठी गरज आहे ती नव्या उड्डाणांची. बजाजनंतर स्कोडाचा अपवाद वगळता एकही महत्वाचा उद्योग औरंगाबादेत आला नाही. आता तो येऊ शकेल. आंतरराष्ट्रीय दर्जाची दोन विमानतळ मराठवाड्यात झाली. औरंगाबादहून मुंबईला आणि दिल्लीला प्रत्येकी तीन विमान रोज जातात उदयपूरला आठवड्यातून जेमतेम तीन विमानं जातात त्यामुळे कमीत कमी मुंबईपर्यंतची उड्डाणं वाढली तरी गुंतवणूकदारांसाठी ती महत्वाची ठरतील. देशातला सर्वात मोठा मॉल, बॅकिंग क्षेत्रातली झेप, शैक्षणिक व आरोग्य विषयक सुविधा आणि आता आंतरराष्ट्रीय विमानतळ , पण विमातळासोबतच विमानांची उड्डाणं वाढली तरच त्याचा फायदा होईल, नाही तर राजकीय नेत्यांची विमान उतरण्यापलिकडे काहीही साध्य होणार नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 08:40 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 08:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close