S M L

राजस्थानात कोण बनणार मुख्यमंत्री ?

10 डिसेंबर, राजस्थान भाजपाला जोरदार टक्कर देत काँगेसने राजस्थानमध्ये बाजी मारली पण आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात टाकायची असा गहन प्रश्न काँग्रेसश्रेष्ठींना पडलाय. कारण या विजयावर दावेदारी सांगणारे अनेक लोक पुढं येऊ लागलेत. नवा मुख्यमंत्री कुणाला निवडायचं याचा, आता काँग्रेसची थिंक टँक विचार करतेय आणि या शर्यतीत माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष सी पी जोशी आणि जाट समाजाचे नेते कर्नल सोनाराम आहेत. अर्थातच अशोक गेहलोत यांच्या नावाला पहिली पसंती दिली जात आहे. पण मुख्यमंत्री निवडीचा सर्वस्वी निर्णय काँग्रेस हायकमांडच घेणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जाट समाज काँग्रेसलाच पाठिंबा देत आलाय. त्यामुळे त्यांच्या समाजाचा मुख्यमंत्री असावा, अशी त्यांची कित्येक वर्षांची मागणी आहे. त्यामुळेच सोनाराम आणि सिसराम ओलासारखे नेते आघाडीवर आहेत. हे सर्व असलं तरीही सी. पी. जोशी आणि गिरीजा व्यास यांची नावंही दुर्लक्ष न करता येण्यासारखी आहेत. उदयपूरच्या या दोघांनाही मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा आहेच. त्यामुळे तीनजणांच्या निरीक्षक टीमला लवकरच नवा मुख्यमंत्री विचारपूर्वक निवडावा लागणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2008 11:27 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2008 11:27 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close