S M L

करिअर लेखनातलं (भाग - 2)

टेक ऑफचा विषय होता करिअर लेखनातलं.लेखनातलं करिअरचा दुसरा भाग तुम्ही इंजिनिअरिंगकडून आर्टस्‌कडे आलात. इंग्रजी साहित्यातून एम.ए. केलेत. तर कॉपीरायटर म्हणून काम करणा-या माणसाची शैक्षणिक पार्श्वभूमी काय असते ? देवेन संसारे - मी थोडा नशीबवान होतो. कारण मला इंजिनिअरिंग झेपत नाहीये हे माझ्या फर्स्ट इयरच्या सुरुवातीलाच लक्षात आलं होतं. कॉपीरायटिंग, जाहिरात कंपनीमध्ये इंजिनिअर आणि सी.ए. असणा-यांचं प्रमाण भरपूर आहे. आलोक नंदा आणि फेडी वली हे भारतातले दोन टॉपचे कॉपीरायटर सी.ए. आहेत. आलोक नंदांची स्वत:ची इंडिया टुडे ही जाहिरात कंपनी आहे. इंडिया टुडे ही भारतातली नावाजलेली जाहिरात कंपनी आहे. भाषेचा खेळ करणं हे इंजिनिअरिंग, मेडिकल, सी.ए.पेक्षा सेफ करिअर आहे, असं समजलं जातं आहे. त्यामुळे चांगले उच्चशिक्षित लोकं कॉपीरायटिंगकडे वळत आहेत. लोकांच्या मनात कॉपी रायटिंग, कॉपी राइट याविषयी संभ्रम आहे. वृत्तपत्रांमध्ये एखादी बातमी किंवा लेख दिला जातो. जर ती बातमी किंवा लेख संपादकीय चौकटीत बसत नसते तेव्हा त्या बातमीवर संस्कार केले जातात. जरी संस्कार करणारी व्यक्ती ही संदकीय विगातली उपसंपादक असली तरी ती एक प्रकारे कॉपीचं रिरायटिंग करत असते. हे काम एकप्रकारे कॉपी रायटिंगचंच आहे. जाहिरात कंपनीत कॉपीरायटिंगचं काम करणा-या व्यक्तीला ऍड कॉपी रायटर म्हणतात. कॉपी रायटर हा लेखक नसतो.कारण त्याला मनाला वाटेल तसं लिहिता येत नाही. तर कॉपी रायटिंगमध्ये लिहिण्याचा एक विशिष्ट ढाचा ठरलेला आहे. कॉपी रायटिंगमध्ये शब्दांतून लिहिलेलं विकता यायला पाहिजे. दुस-याला वाचताना खिळवून ठेवणं असं आपण लिहायला हवं. भारतातली कॉपीरायटिंगची भाषा ही इंग्रजीतली आहे. याचा अर्थ कॉपी रायटिंगमध्ये टिकण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्त्व असणं आवश्यक आहे का ? देवेन संसारे - होय. हे दुदैर्वी सत्य आहे. बिझनेसच्या दृष्टीनं याही क्षेत्रात काही अलिखित नियम आहेत. इंग्रजीवर प्रभुत्त्व असायलाच हवं. कल्पना सुचणं आणि सुचलेल्या कल्पना लोकांना विकणं हा प्रवास कसा असतो ? अभय दखणे - क्रियेटिव्ह लिखाण करताना मनाजोगतं लिहिता येत नाही. काही गरजा पूर्ण करत हे लिखाण करावं लागतं. कल्पनांना, सर्जनशिलतेला शिस्त लावावी लागते. उद्या जर कोणी आलं आणि आयत्या वेळेला म्हणालं की मला विशिष्ट पद्धतीनं एखादी जाहिरात बनवून हवी आहे. तर तुम्हाला ती तेवढ्या वेळेत सुचायला हवी. मग त्यावेळेला मला मूड लागतो वगैरेसारख्या मुद्द्यांना थाराच नसतो. म्हणजे याचा अर्थ काय आणि कसा विचार केलात तर तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी सुचतील. हे आहे. यापाठी थोडासा अभ्यास असतो. थोडासा विचार असतो. एकदा त्या प्रश्नांची नॅक कळली की, सगळं काही सहज जमतं. कॉपीरायटिंगमधलं करिअर हा मुक्त छंदातला प्रकार नाहीये. तर त्याला काही एक प्रकारची शिस्त असते... अभय दखणे - हो. आणि हे फक्त कॉपी रायटिंगलाच लागू पडत नाही तर प्रिंट मीडियात काम करतानाही तिथल्या लिखाणालाही एक प्रकारची शिस्त आहे. म्हणजे मानात आलं आणि लिहून मोकळं झालं असं काही नाहीये. पहिल्या वाक्यात लोकांना धरून कसं ठेवायचं, दुसरा मुद्दा कुठे मांडायचा याची काही नियम असतात. हे तंत्र अनेक प्रतिभावंतांनी वापरलं आहे. हे तंत्र वापरलं की कल्पना आपोआपच सुचायला लागतात. त्या शिवाय निरीक्षण लागतं ती वेगळी गोष्ट आहे. कॉपी रायटिंगमध्ये भाषेला महत्त्व द्यावं लागतं. तुम्ही कॉपी रायटिंगकडून मालिकांच्या आणि मालिकांकडून सिनेमाच्या लिखाणाकडे वळलात. तर ही माध्यमं वेगळी आहेत. या माध्यमांशी तुम्ही स्वत:ला कसं काय जुळवून घेतलंत ? अभय दखणे - एकदा मी मान्य केलं की मी कमर्शिअल आर्टिस्ट आहे आणि कोणी मला सुचवलं तर मला सुचू शकतं. आता सॅच्युरेशनच्या बाबतीत म्हणाल तर तो प्रश्न माझ्याबाबतीतही निर्माण झाला होता. सतत करून करून कुठंतरी साचलेपण आलं होतं. मलाही वाटायचं की आता लाइट लिखाण केलं पाहिजे. पण ती संधी मिळत नव्हती. ती संधी मला मालिका आणि सिनेमाच्या लिखाणातून मिळाली. त्यामुळे मला कधी कोणत्याही माध्यमांचा प्रश्न आला नाही. नव्या लेखकांना यातला स्ट्रगल खूप जास्त आहे का ? अभय दखणे - स्ट्रगल कोणत्या गोष्टीत नाहीये. तर स्ट्रगल सगळीेकडे आहे. आणि मला जर माझ्या आवडीच्या गोष्टीत स्ट्रगल करायला मिळत असेल तर स्ट्रगल स्ट्रगल वाटत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2009 02:03 PM IST

करिअर लेखनातलं  (भाग - 2)

टेक ऑफचा विषय होता करिअर लेखनातलं.लेखनातलं करिअरचा दुसरा भाग

तुम्ही इंजिनिअरिंगकडून आर्टस्‌कडे आलात. इंग्रजी साहित्यातून एम.ए. केलेत. तर कॉपीरायटर म्हणून काम करणा-या माणसाची शैक्षणिक पार्श्वभूमी काय असते ? देवेन संसारे - मी थोडा नशीबवान होतो. कारण मला इंजिनिअरिंग झेपत नाहीये हे माझ्या फर्स्ट इयरच्या सुरुवातीलाच लक्षात आलं होतं. कॉपीरायटिंग, जाहिरात कंपनीमध्ये इंजिनिअर आणि सी.ए. असणा-यांचं प्रमाण भरपूर आहे. आलोक नंदा आणि फेडी वली हे भारतातले दोन टॉपचे कॉपीरायटर सी.ए. आहेत. आलोक नंदांची स्वत:ची इंडिया टुडे ही जाहिरात कंपनी आहे. इंडिया टुडे ही भारतातली नावाजलेली जाहिरात कंपनी आहे. भाषेचा खेळ करणं हे इंजिनिअरिंग, मेडिकल, सी.ए.पेक्षा सेफ करिअर आहे, असं समजलं जातं आहे. त्यामुळे चांगले उच्चशिक्षित लोकं कॉपीरायटिंगकडे वळत आहेत. लोकांच्या मनात कॉपी रायटिंग, कॉपी राइट याविषयी संभ्रम आहे. वृत्तपत्रांमध्ये एखादी बातमी किंवा लेख दिला जातो. जर ती बातमी किंवा लेख संपादकीय चौकटीत बसत नसते तेव्हा त्या बातमीवर संस्कार केले जातात. जरी संस्कार करणारी व्यक्ती ही संदकीय विगातली उपसंपादक असली तरी ती एक प्रकारे कॉपीचं रिरायटिंग करत असते. हे काम एकप्रकारे कॉपी रायटिंगचंच आहे. जाहिरात कंपनीत कॉपीरायटिंगचं काम करणा-या व्यक्तीला ऍड कॉपी रायटर म्हणतात. कॉपी रायटर हा लेखक नसतो.कारण त्याला मनाला वाटेल तसं लिहिता येत नाही. तर कॉपी रायटिंगमध्ये लिहिण्याचा एक विशिष्ट ढाचा ठरलेला आहे. कॉपी रायटिंगमध्ये शब्दांतून लिहिलेलं विकता यायला पाहिजे. दुस-याला वाचताना खिळवून ठेवणं असं आपण लिहायला हवं. भारतातली कॉपीरायटिंगची भाषा ही इंग्रजीतली आहे. याचा अर्थ कॉपी रायटिंगमध्ये टिकण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्त्व असणं आवश्यक आहे का ? देवेन संसारे - होय. हे दुदैर्वी सत्य आहे. बिझनेसच्या दृष्टीनं याही क्षेत्रात काही अलिखित नियम आहेत. इंग्रजीवर प्रभुत्त्व असायलाच हवं. कल्पना सुचणं आणि सुचलेल्या कल्पना लोकांना विकणं हा प्रवास कसा असतो ? अभय दखणे - क्रियेटिव्ह लिखाण करताना मनाजोगतं लिहिता येत नाही. काही गरजा पूर्ण करत हे लिखाण करावं लागतं. कल्पनांना, सर्जनशिलतेला शिस्त लावावी लागते. उद्या जर कोणी आलं आणि आयत्या वेळेला म्हणालं की मला विशिष्ट पद्धतीनं एखादी जाहिरात बनवून हवी आहे. तर तुम्हाला ती तेवढ्या वेळेत सुचायला हवी. मग त्यावेळेला मला मूड लागतो वगैरेसारख्या मुद्द्यांना थाराच नसतो. म्हणजे याचा अर्थ काय आणि कसा विचार केलात तर तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी सुचतील. हे आहे. यापाठी थोडासा अभ्यास असतो. थोडासा विचार असतो. एकदा त्या प्रश्नांची नॅक कळली की, सगळं काही सहज जमतं. कॉपीरायटिंगमधलं करिअर हा मुक्त छंदातला प्रकार नाहीये. तर त्याला काही एक प्रकारची शिस्त असते... अभय दखणे - हो. आणि हे फक्त कॉपी रायटिंगलाच लागू पडत नाही तर प्रिंट मीडियात काम करतानाही तिथल्या लिखाणालाही एक प्रकारची शिस्त आहे. म्हणजे मानात आलं आणि लिहून मोकळं झालं असं काही नाहीये. पहिल्या वाक्यात लोकांना धरून कसं ठेवायचं, दुसरा मुद्दा कुठे मांडायचा याची काही नियम असतात. हे तंत्र अनेक प्रतिभावंतांनी वापरलं आहे. हे तंत्र वापरलं की कल्पना आपोआपच सुचायला लागतात. त्या शिवाय निरीक्षण लागतं ती वेगळी गोष्ट आहे. कॉपी रायटिंगमध्ये भाषेला महत्त्व द्यावं लागतं. तुम्ही कॉपी रायटिंगकडून मालिकांच्या आणि मालिकांकडून सिनेमाच्या लिखाणाकडे वळलात. तर ही माध्यमं वेगळी आहेत. या माध्यमांशी तुम्ही स्वत:ला कसं काय जुळवून घेतलंत ? अभय दखणे - एकदा मी मान्य केलं की मी कमर्शिअल आर्टिस्ट आहे आणि कोणी मला सुचवलं तर मला सुचू शकतं. आता सॅच्युरेशनच्या बाबतीत म्हणाल तर तो प्रश्न माझ्याबाबतीतही निर्माण झाला होता. सतत करून करून कुठंतरी साचलेपण आलं होतं. मलाही वाटायचं की आता लाइट लिखाण केलं पाहिजे. पण ती संधी मिळत नव्हती. ती संधी मला मालिका आणि सिनेमाच्या लिखाणातून मिळाली. त्यामुळे मला कधी कोणत्याही माध्यमांचा प्रश्न आला नाही. नव्या लेखकांना यातला स्ट्रगल खूप जास्त आहे का ? अभय दखणे - स्ट्रगल कोणत्या गोष्टीत नाहीये. तर स्ट्रगल सगळीेकडे आहे. आणि मला जर माझ्या आवडीच्या गोष्टीत स्ट्रगल करायला मिळत असेल तर स्ट्रगल स्ट्रगल वाटत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2009 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close