S M L

करिअर लेखनातलं (भाग - 1)

टेक ऑफचा विषय थोडा हटके होता. तो म्हणजे लेखनातलं करिअर. क्रियेटिव्ह रायटिंग किंवा कमर्शिअल रायटिंग म्हणजे काय तर... मनाला येईल तेव्हा चांगल्या पद्धतीनं लिहायचं आणि जे लिहिलंय ते विकून दाखवायचं... अशा धाटणीचं लिखाण करावं असं अनेकांना वाटतं. पण ते कसं केलं पाहिजे , ते सगळ्यांना जमतं का, ते किती अवघड आहे, जे लोक क्रियेटिव्ह रायटिंग लिहतात किंवा कॉपी रायटिंग करतात त्यांच्यासमोर काय आव्हानं असतात... या सा-यांचीच आपल्याला उत्सुकता असते. क्रियेटिव्ह रायटिंग आणि कॉपी रायटिंग या विषयावर बोलण्यासाठी टेक ऑफ ' मध्ये दोन अत्यंत नामवंत पाहुणे आले होते. क्रियेटिव्ह कन्सलटंट अभय दखणे आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर देवेन संसारे या दोघांनी कॉपी रायटिंग, क्रियेटिव्ह रायटिंग या विषयावर मागदर्शन केलं. कॉपी रायटिंग किंवा क्रियेटिव्ह रायटिंगच्या शाळेत जाऊन ते प्रकार शिकता येतात का ? आपल्या सगळ्या शिक्षणपद्धतीचं लेखनाकडं दुर्लक्ष झालं आहे, पण सध्याच्या काळात लेखनाची गरज तर भासत आहे. मग हे करिअर होणार तरी कसं ? तुम्ही कसं ते घडवलंत ? अभय दखणे - मला सुरुवातीपासूनच जे.जे.त जायचं होतं. मी जे.जे.चा स्टुडंट आहे. मला सुरुवातीपासून चित्रपासून चित्र काढणं आणि वाचनाची आवड होती. जे.जे.त पोहोचल्यावर भलतीकडं आल्याचं लक्षात आलं. कारण चित्रांमध्ये माझं रमणं कमी झालं होतं. आपल्याला आयडियाज सुचतायत, लाईन्स सुचतायत हे आपसुचकच लक्षात यायला लागलं. सुदैवानं मला शिक्षक चांगले लागले होते. माझा लिखाणातला कल त्यांच्या लक्षात आला होता. त्यांनी माझं मन लिखाणाकडं वळवलं. त्या उत्साहानं मी एकांकिका लिहिली. मी जे करतोय ते लोकांना आवडतंय हे मला कळून आलं. तसा माझ्या लिखाणाच्या कामाला हुरुप चढला. हे सगळं करताना वाड्ण्मयाची आवड होती का ?अभय दखणे - हो. माझा हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी अजूनही प्रचंड वाचतोय. मी जेवढा पुस्तकांत रमतोय तेवढा कुठल्याच गोष्टीत रमत नाही. त्यामुळे लिखाणाला आपोआपच बहर येतो. मीही बराच भटकून कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात आलो आहे. आता म्हणाल तर मी अत्यंत समाधानी आहे. कारण आवडतं ते करायला मिळतं. पैसेही चांगले मिळतात. देवेन तुमचा या क्षेत्रातला अनुभव प्रचंड दांडगा आहे. तुम्ही सुरुवात कॉपी रायटर म्हणून केलीत. आता तुम्ही ऍनिमेशन सिनेमासाठीही लिखाण करत आहात. मराठी माणसं या क्षेत्रात कमी आहेत. तुम्ही त्यांना काय सांगाल ? देवेन संसारे - कॉपी रायटरची शाळा नाहीये. कारण कॉपी रायटरची शाळा असणं शक्य नाहीये. हा इथे विचार करायला शिकवलं जाईल. विचार कशापद्धतीनं करावा हेही शिकवलं जाईल. लिहायला मात्र कोणीच शिकवणार नाही. त्यामुळं कॉपी रायटरची शाळा असणं शक्य नाही. युएसमध्ये क्रियेटिव्ह रायटिंग स्कूल्स आहेत. पण तुमच्याकडे जर बेसिक टॅलेन्टच नसेल, आवड नसेल, किंवा लिखाणाची तुमच्याकडे शैलीच नसेल तर कोणाला लिहायला शिकवता येत नाही. आत्तापर्यंत खूप ट्रेनी कॉपी रायटर आले, गेले, त्यातले काही यशस्वीही झालेत. काही बिझनेसमधून बाहेर गेले. कारण तुमच्यात जर बेसिक आयडिया पोन्टेशियल नसेल तर कॉपी रायटर हे क्षेत्र तुमच्यासाठी जड जाईल. माझ्याबाबतीतला माझा कॉपीरायटिंग क्षेत्रातला प्रवास हा थोडासा वेडावाकडा होता. मी शाळेत असताना चांगला विद्यार्थी होतो. मला मार्कस्‌ही बरे असायचे. विज्ञान, गणित या विषयांतही मला चांगले मार्क होते. बोर्डाच्या परीक्षेत गणित या विषयांत दुसरा आलो होतो. मात्र गणित माझा अतिशय नावडता विषय होता. मराठी मध्यमवर्गात माझी झडणघडण झाली आहे. आई वडिलांचा मी एकच मुलगा आहे. मला एक बहीण आहे. हे सगळी पार्श्वभूमी पाहता मी सहज डॉक्टर, इंजिनिअर झालो असतो. तसं काही झालं नाही. सायन्स स्ट्रिमला मी ऍडमिशन घेतली. 12 वीत असताना मला अतिशय वाईट मार्क्स पडले. दहावीत असताना बोर्डाचं सुवर्णपदक मिळवलेल्य मला गणितात भरपूर कमी मार्क्स पडले होते. मी अक्षरश: काटावर पास झालो. तरीसुद्धा सांगलीत एका वर्षासाठी मामाच्या ओळखीनं प्रायव्हेट कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली. पण पाच विषयांमध्ये नापास झालो. सायन्स मेरे बस की बात नही हैं हे त्यावेळी लक्षात आल्यावर मुंबईत आर्टस्‌ला ऍडमिशन घेतली. मेट्रो सिनेमाजवळ गव्हर्नमेन्टची व्होकेशन इन्स्टिट्युट आहे, त्या संस्थेत मी ऍडमिशन घेतली. ऍडमिशन घेताना सरांना आधीची सगळी परिस्थिती सांगितली.सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळं ऍप्टीट्युड टेस्टविषयी सरांना विचारलं. " तुला काय करायचंय हे तुला पक्कं ठाऊक आहे. मग ऍप्टीट्युडची काय गरज आहे. वर्गात बस आणि शिकायला सुरुवात कर," असं त्या सरांनी मला सांगितलं. त्यांच्या एका वाक्यानं माझं आयुष्य बदललं. धोबीतलावला गर्व्हन्मेंट इन्स्टिट्युट आहे हे कित्येकांना ठाऊक नाहीये. पण तिथल्या एका माणसाच्या त्या पुश अपनं मी आर्टस्‌ला गेलो. मी पान भरभरून ऍप्टीट्युड टेस्ट दिल्या असत्या आणि त्यातून काही निष्पन्न झालं नसतं. त्या माणसानं मला जी पायवाट सांगितली त्या पायवाटेवरून मार्गक्रमणा करत मी पुढे गेलो. माझ्या मनात जे काही आहे ते मी करून बघण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मी त्यात यशस्वी झालोही. मला असं वाटतं की जे तुम्हाला आवडतं ते जर तुम्ही एकदा करून बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटतील. तुम्ही त्यात यशस्वी व्हाल नाही व्हाल ही तर पुढची गोष्ट आहे. म्हणजे स्वत:ला चान्स दिला पाहिजे तर... देवेन संसारे - हो. कारण त्या तरुण वयात आपली कमीत कमी 17 ते 2 0 वर्षं नोकरी झाली पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण उलट त्याच वयात आपल्या प्रत्येकाला गरज असते ती मार्गदर्शकाची. बहुतेकांना तो नाही मिळत. लोकांना जे छंद म्हणून करायला आवडतं ते तुम्ही व्यवसाय म्हणून करतात. तर काय आहे या व्यवसायाचं स्वरुप ? अभय दखणे - देवेन म्हणाला त्याप्रमाणं या क्षेत्रात प्रत्येकानं करून बघितलं पहिजे. म्हणजे मार्गदर्शन करणारी दिशा दर्शक अशीमाणसं मिळत नाहीत याबाबतीत मी फार सुदैवी आहे. माझ्या आजुबाजूला इतकी हुशार, चांगली माणसं होती की त्यांना जे काही करता आलं ते नाही ते त्यांनी माझ्यातलं ओळखून मला करायला प्रवृत्त केलं. माझ्यात काय आहे हे मला काही कळलं नव्हतं. पण त्यांनी मला ते डेअरिंग करायला लावून माझ्याकडून करून घेतलं. मग ते मला जसजसं जमायला लागलं तेव्हा त्यातली मजा मला कळुन आली. त्यामुळे मला काम करताना फारच मजा येते. आपण आता एका विशिष्ट प्रकारच्या डेडलाईनमध्ये लिहिणा-यांविषयी म्हणजे कर्मशिअल रायटिंगची आवड असणा-यांबद्दल बोलत आहोत. त्याविषयी काही विस्तारानं सांगाला का ? अभय दखणे - कॉपी रायटिंग किंवा कर्मशिअल रायटिंग हा कोणत्या शाळेत शिकवला जाणारा विषय नाहीये. काही ठिकाणी अकॅडमिकमध्ये ते शिकवलंही जातं. नियम शिकणं म्हणजे काही लिखाण नाही. लिखाण करताना काय करू नये यापेक्षा काय करावं, याला महत्त्व दिलं पाहिजे. मुर्खपणाला लिमिट नाही. हुशारीला लिमिट आहे. लोकांना काय समजेल कसं समजेल याचाविचार करून लिहायला शिकलं पाहिजे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर पत्राचं घेऊ या. पत्र जेव्हा आपण मित्राला मित्राला लिहितो तेव्हा त्या पत्राचा टोन बदलतो. वडीलधा-या माणसांना लिहितो... तेव्हा पत्राचा ढाचा बदलतो. म्हणजेच काय तर लोकांना काय हवंय काय नकोय याचा विचार करून कॉपी रायटिंग करावं. तुम्ही इंजिनिअरिंगकडून आर्टस्‌कडे आलात. इंग्रजी साहित्यातून एम.ए. केलेत. तर कॉपीरायटर म्हणून काम करणा-या माणसाची शैक्षणिक पार्श्वभूमी काय असते ? देवेन संसारे - मी थोडा नशीबवान होतो. कारण मला इंजिनिअरिंग झेपत नाहीये हे माझ्या फर्स्ट इयरच्या सुरुवातीलाच लक्षात आलं होतं. कॉपीरायटिंग, जाहिरात कंपनीमध्ये इंजिनिअर आणि सी.ए. असणा-यांचं प्रमाण भरपूर आहे. आलोक नंदा आणि फेडी वली हे भारतातले दोन टॉपचे कॉपीरायटर सी.ए. आहेत. आलोक नंदांची स्वत:ची इंडिया टुडे ही जाहिरात कंपनी आहे. इंडिया टुडे ही भारतातली नावाजलेली जाहिरात कंपनी आहे. भाषेचा खेळ करणं हे इंजिनिअरिंग, मेडिकल, सी.ए.पेक्षा सेफ करिअर आहे, असं समजलं जातं आहे. त्यामुळे चांगले उच्चशिक्षित लोकं कॉपीरायटिंगकडे वळत आहेत. लोकांच्या मनात कॉपी रायटिंग, कॉपी राइट याविषयी संभ्रम आहे. वृत्तपत्रांमध्ये एखादी बातमी किंवा लेख दिला जातो. जर ती बातमी किंवा लेख संपादकीय चौकटीत बसत नसते तेव्हा त्या बातमीवर संस्कार केले जातात. जरी संस्कार करणारी व्यक्ती ही संदकीय विगातली उपसंपादक असली तरी ती एक प्रकारे कॉपीचं रिरायटिंग करत असते. हे काम एकप्रकारे कॉपी रायटिंगचंच आहे. जाहिरात कंपनीत कॉपीरायटिंगचं काम करणा-या व्यक्तीला ऍड कॉपी रायटर म्हणतात. कॉपी रायटर हा लेखक नसतो.कारण त्याला मनाला वाटेल तसं लिहिता येत नाही. तर कॉपी रायटिंगमध्ये लिहिण्याचा एक विशिष्ट ढाचा ठरलेला आहे. कॉपी रायटिंगमध्ये शब्दांतून लिहिलेलं विकता यायला पाहिजे. दुस-याला वाचताना खिळवून ठेवणं असं आपण लिहायला हवं. भारतातली कॉपीरायटिंगची भाषा ही इंग्रजीतली आहे. याचा अर्थ कॉपी रायटिंगमध्ये टिकण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्त्व असणं आवश्यक आहे का ? देवेन संसारे - होय. हे दुदैर्वी सत्य आहे. बिझनेसच्या दृष्टीनं याही क्षेत्रात काही अलिखित नियम आहेत. इंग्रजीवर प्रभुत्त्व असायलाच हवं. कल्पना सुचणं आणि सुचलेल्या कल्पना लोकांना विकणं हा प्रवास कसा असतो ? अभय दखणे - क्रियेटिव्ह लिखाण करताना मनाजोगतं लिहिता येत नाही. काही गरजा पूर्ण करत हे लिखाण करावं लागतं. कल्पनांना, सर्जनशिलतेला शिस्त लावावी लागते. उद्या जर कोणी आलं आणि आयत्या वेळेला म्हणालं की मला विशिष्ट पद्धतीनं एखादी जाहिरात बनवून हवी आहे. तर तुम्हाला ती तेवढ्या वेळेत सुचायला हवी. मग त्यावेळेला मला मूड लागतो वगैरेसारख्या मुद्द्यांना थाराच नसतो. म्हणजे याचा अर्थ काय आणि कसा विचार केलात तर तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी सुचतील. हे आहे. यापाठी थोडासा अभ्यास असतो. थोडासा विचार असतो. एकदा त्या प्रश्नांची नॅक कळली की, सगळं काही सहज जमतं. कॉपीरायटिंगमधलं करिअर हा मुक्त छंदातला प्रकार नाहीये. तर त्याला काही एक प्रकारची शिस्त असते... अभय दखणे - हो. आणि हे फक्त कॉपी रायटिंगलाच लागू पडत नाही तर प्रिंट मीडियात काम करतानाही तिथल्या लिखाणालाही एक प्रकारची शिस्त आहे. म्हणजे मानात आलं आणि लिहून मोकळं झालं असं काही नाहीये. पहिल्या वाक्यात लोकांना धरून कसं ठेवायचं, दुसरा मुद्दा कुठे मांडायचा याची काही नियम असतात. हे तंत्र अनेक प्रतिभावंतांनी वापरलं आहे. हे तंत्र वापरलं की कल्पना आपोआपच सुचायला लागतात. त्या शिवाय निरीक्षण लागतं ती वेगळी गोष्ट आहे. कॉपी रायटिंगमध्ये भाषेला महत्त्व द्यावं लागतं. तुम्ही कॉपी रायटिंगकडून मालिकांच्या आणि मालिकांकडून सिनेमाच्या लिखाणाकडे वळलात. तर ही माध्यमं वेगळी आहेत. या माध्यमांशी तुम्ही स्वत:ला कसं काय जुळवून घेतलंत ? अभय दखणे - एकदा मी मान्य केलं की मी कमर्शिअल आर्टिस्ट आहे आणि कोणी मला सुचवलं तर मला सुचू शकतं. आता सॅच्युरेशनच्या बाबतीत म्हणाल तर तो प्रश्न माझ्याबाबतीतही निर्माण झाला होता. सतत करून करून कुठंतरी साचलेपण आलं होतं. मलाही वाटायचं की आता लाइट लिखाण केलं पाहिजे. पण ती संधी मिळत नव्हती. ती संधी मला मालिका आणि सिनेमाच्या लिखाणातून मिळाली. त्यामुळे मला कधी कोणत्याही माध्यमांचा प्रश्न आला नाही. नव्या लेखकांना यातला स्ट्रगल खूप जास्त आहे का ? अभय दखणे - स्ट्रगल कोणत्या गोष्टीत नाहीये. तर स्ट्रगल सगळीेकडे आहे. आणि मला जर माझ्या आवडीच्या गोष्टीत स्ट्रगल करायला मिळत असेल तर स्ट्रगल स्ट्रगल वाटत नाही. कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला किती महत्त्व असतं ? अभय दखणे - जर तुम्ही व्हिज्युअल मीडियात काम करत असाल तर कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला महत्त्व नाहीये. आणि जर तुम्ही प्रिंट मीडियामध्ये काम करत असाल तर शुद्ध लेखनाला महत्त्व दिलं पाहिजे. शिवाय हस्ताक्षरही नीट वळणदार असलं पाहिजे. शुद्धलेखन आणि वळणदार हस्ताक्षरातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो. आणि व्हिज्युअल मीडियात शुद्ध लेखन लागत नाही म्हणून शुद्ध लेखन चांगलं नसलं पाहिजे असं काही नाहीये. शुद्ध लेखनातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो... देवेन संसारे - हो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आणि ती म्हणजे चित्रात झालेली चूक ही कळून येत नाही. पण लिखाणात झालेली चूक कळून येते. कारण कोणता शब्द हा दीर्घ असतो, -हस्व असतो हे सगळ्यांना ठाऊक असतं. त्यामुळे शक्यतो कोणी शुद्ध लेखनातल्या चुका करू नये. अनेक मराठी मुलं कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात जातात. आणि जेव्हा ही मुलं लेखनाच्या प्रांतात जातात तेव्हा ते कॉपी रायटर म्हणून जातात. जाहिरातींचा एक भाषांतरकार म्हणून जाणं आणि कॉपी रायटर म्हणून जात भेद तो काय आहे ? देवेन संसारे - जाहिरात क्षेत्रातले बहुतेक कॉपी रायटर हे इंग्रजीभाषेतून लिहिणारे आहेत. काही हिंदी भाषेतूनही लिहितात. जर एखादा मराठीतून लिहिणारा असेल तर तो ट्रान्सलेटर म्हणून जातो. माझ्या ऑफिसमधलाच मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. साधारण 1994 मध्ये मी ज्युनिअर कॉपीरायटर म्हणून लागलो होतो. मला जाहिरात क्षेत्रात येऊन दोन वर्षं पण झाली नव्हती. माझ्या मित्राचा मित्र माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की मला ब्रोशर लिहायचं आहे. मी त्याला मी 5 हजार रुपये चार्ज सांगितला. मी त्यांना त्यापद्धतीनं मी त्यांना करून दिलं. मग ते म्हणाले की मला मराठीत भाषांतर करून हवंय. मी ते माझ्या सिनिअर कॉपी रायटर्सना सांगितलं. त्यांनी त्याचे 250 रुपये घेतले. म्हणजे कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात प्रादेशिक भाषेत थोडसे कमी पैसे मिळतात. ' र ' ला ' ट ' जोडून कधीच प्रादेशिक भाषातलं भाषांतर करू नये. कॉपी रायटिंग आणि क्रियेटिव्ह रायटिंगचं प्रशिक्षण देणा-या संस्था - सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबई फोन : 022-22621366 वेबसाईट : xaviercomm.org नासीर मुन्शी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज वेबसाईट : www.nmims.edu डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन जर्नालिझम गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक फोन : 9120-25654069/25673188 वेबसाईट : www.123careers.net सिम्बॉयसेस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट वेबसाईट : www.sibm.edu फोन : 020-39116000/39116007/39116007 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीडिपार्टमेंट ऑफ जर्नालिझम औरंगाबाद फोन : 0240-2400333 वेबसाईट:www.bamu.net नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीडिपार्टमेंट ऑफ जर्नलिझमउमवी नगर, जळगावफोन: 257-2258428 / 2258438 वेबसाईट:www.nmu.ac.in शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूरडिपार्टमेन्ट ऑफ जर्नालिझमफोन: 0231- 2609000वेबसाईट:www.unishivaji.ac.in राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, नागपूर फोन : 0712-2522456, वेबसाईट : www.nagpuruniversity.org महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धाफोन : 07152-230901, 230904, 230905, 230907वेबसाईट : www.hindivishwa.org करिअर लेखनातलं (भाग - 2) करिअर लेखनातलं (भाग - 3)

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2009 02:05 PM IST

करिअर लेखनातलं  (भाग - 1)

टेक ऑफचा विषय थोडा हटके होता. तो म्हणजे लेखनातलं करिअर. क्रियेटिव्ह रायटिंग किंवा कमर्शिअल रायटिंग म्हणजे काय तर... मनाला येईल तेव्हा चांगल्या पद्धतीनं लिहायचं आणि जे लिहिलंय ते विकून दाखवायचं... अशा धाटणीचं लिखाण करावं असं अनेकांना वाटतं. पण ते कसं केलं पाहिजे , ते सगळ्यांना जमतं का, ते किती अवघड आहे, जे लोक क्रियेटिव्ह रायटिंग लिहतात किंवा कॉपी रायटिंग करतात त्यांच्यासमोर काय आव्हानं असतात... या सा-यांचीच आपल्याला उत्सुकता असते. क्रियेटिव्ह रायटिंग आणि कॉपी रायटिंग या विषयावर बोलण्यासाठी टेक ऑफ ' मध्ये दोन अत्यंत नामवंत पाहुणे आले होते. क्रियेटिव्ह कन्सलटंट अभय दखणे आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर देवेन संसारे या दोघांनी कॉपी रायटिंग, क्रियेटिव्ह रायटिंग या विषयावर मागदर्शन केलं. कॉपी रायटिंग किंवा क्रियेटिव्ह रायटिंगच्या शाळेत जाऊन ते प्रकार शिकता येतात का ? आपल्या सगळ्या शिक्षणपद्धतीचं लेखनाकडं दुर्लक्ष झालं आहे, पण सध्याच्या काळात लेखनाची गरज तर भासत आहे. मग हे करिअर होणार तरी कसं ? तुम्ही कसं ते घडवलंत ? अभय दखणे - मला सुरुवातीपासूनच जे.जे.त जायचं होतं. मी जे.जे.चा स्टुडंट आहे. मला सुरुवातीपासून चित्रपासून चित्र काढणं आणि वाचनाची आवड होती. जे.जे.त पोहोचल्यावर भलतीकडं आल्याचं लक्षात आलं. कारण चित्रांमध्ये माझं रमणं कमी झालं होतं. आपल्याला आयडियाज सुचतायत, लाईन्स सुचतायत हे आपसुचकच लक्षात यायला लागलं. सुदैवानं मला शिक्षक चांगले लागले होते. माझा लिखाणातला कल त्यांच्या लक्षात आला होता. त्यांनी माझं मन लिखाणाकडं वळवलं. त्या उत्साहानं मी एकांकिका लिहिली. मी जे करतोय ते लोकांना आवडतंय हे मला कळून आलं. तसा माझ्या लिखाणाच्या कामाला हुरुप चढला. हे सगळं करताना वाड्ण्मयाची आवड होती का ?अभय दखणे - हो. माझा हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी अजूनही प्रचंड वाचतोय. मी जेवढा पुस्तकांत रमतोय तेवढा कुठल्याच गोष्टीत रमत नाही. त्यामुळे लिखाणाला आपोआपच बहर येतो. मीही बराच भटकून कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात आलो आहे. आता म्हणाल तर मी अत्यंत समाधानी आहे. कारण आवडतं ते करायला मिळतं. पैसेही चांगले मिळतात. देवेन तुमचा या क्षेत्रातला अनुभव प्रचंड दांडगा आहे. तुम्ही सुरुवात कॉपी रायटर म्हणून केलीत. आता तुम्ही ऍनिमेशन सिनेमासाठीही लिखाण करत आहात. मराठी माणसं या क्षेत्रात कमी आहेत. तुम्ही त्यांना काय सांगाल ? देवेन संसारे - कॉपी रायटरची शाळा नाहीये. कारण कॉपी रायटरची शाळा असणं शक्य नाहीये. हा इथे विचार करायला शिकवलं जाईल. विचार कशापद्धतीनं करावा हेही शिकवलं जाईल. लिहायला मात्र कोणीच शिकवणार नाही. त्यामुळं कॉपी रायटरची शाळा असणं शक्य नाही. युएसमध्ये क्रियेटिव्ह रायटिंग स्कूल्स आहेत. पण तुमच्याकडे जर बेसिक टॅलेन्टच नसेल, आवड नसेल, किंवा लिखाणाची तुमच्याकडे शैलीच नसेल तर कोणाला लिहायला शिकवता येत नाही. आत्तापर्यंत खूप ट्रेनी कॉपी रायटर आले, गेले, त्यातले काही यशस्वीही झालेत. काही बिझनेसमधून बाहेर गेले. कारण तुमच्यात जर बेसिक आयडिया पोन्टेशियल नसेल तर कॉपी रायटर हे क्षेत्र तुमच्यासाठी जड जाईल. माझ्याबाबतीतला माझा कॉपीरायटिंग क्षेत्रातला प्रवास हा थोडासा वेडावाकडा होता. मी शाळेत असताना चांगला विद्यार्थी होतो. मला मार्कस्‌ही बरे असायचे. विज्ञान, गणित या विषयांतही मला चांगले मार्क होते. बोर्डाच्या परीक्षेत गणित या विषयांत दुसरा आलो होतो. मात्र गणित माझा अतिशय नावडता विषय होता. मराठी मध्यमवर्गात माझी झडणघडण झाली आहे. आई वडिलांचा मी एकच मुलगा आहे. मला एक बहीण आहे. हे सगळी पार्श्वभूमी पाहता मी सहज डॉक्टर, इंजिनिअर झालो असतो. तसं काही झालं नाही. सायन्स स्ट्रिमला मी ऍडमिशन घेतली. 12 वीत असताना मला अतिशय वाईट मार्क्स पडले. दहावीत असताना बोर्डाचं सुवर्णपदक मिळवलेल्य मला गणितात भरपूर कमी मार्क्स पडले होते. मी अक्षरश: काटावर पास झालो. तरीसुद्धा सांगलीत एका वर्षासाठी मामाच्या ओळखीनं प्रायव्हेट कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळाली. पण पाच विषयांमध्ये नापास झालो. सायन्स मेरे बस की बात नही हैं हे त्यावेळी लक्षात आल्यावर मुंबईत आर्टस्‌ला ऍडमिशन घेतली. मेट्रो सिनेमाजवळ गव्हर्नमेन्टची व्होकेशन इन्स्टिट्युट आहे, त्या संस्थेत मी ऍडमिशन घेतली. ऍडमिशन घेताना सरांना आधीची सगळी परिस्थिती सांगितली.सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळं ऍप्टीट्युड टेस्टविषयी सरांना विचारलं. " तुला काय करायचंय हे तुला पक्कं ठाऊक आहे. मग ऍप्टीट्युडची काय गरज आहे. वर्गात बस आणि शिकायला सुरुवात कर," असं त्या सरांनी मला सांगितलं. त्यांच्या एका वाक्यानं माझं आयुष्य बदललं. धोबीतलावला गर्व्हन्मेंट इन्स्टिट्युट आहे हे कित्येकांना ठाऊक नाहीये. पण तिथल्या एका माणसाच्या त्या पुश अपनं मी आर्टस्‌ला गेलो. मी पान भरभरून ऍप्टीट्युड टेस्ट दिल्या असत्या आणि त्यातून काही निष्पन्न झालं नसतं. त्या माणसानं मला जी पायवाट सांगितली त्या पायवाटेवरून मार्गक्रमणा करत मी पुढे गेलो. माझ्या मनात जे काही आहे ते मी करून बघण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मी त्यात यशस्वी झालोही. मला असं वाटतं की जे तुम्हाला आवडतं ते जर तुम्ही एकदा करून बघण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटतील. तुम्ही त्यात यशस्वी व्हाल नाही व्हाल ही तर पुढची गोष्ट आहे. म्हणजे स्वत:ला चान्स दिला पाहिजे तर... देवेन संसारे - हो. कारण त्या तरुण वयात आपली कमीत कमी 17 ते 2 0 वर्षं नोकरी झाली पाहिजे, असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण उलट त्याच वयात आपल्या प्रत्येकाला गरज असते ती मार्गदर्शकाची. बहुतेकांना तो नाही मिळत.

लोकांना जे छंद म्हणून करायला आवडतं ते तुम्ही व्यवसाय म्हणून करतात. तर काय आहे या व्यवसायाचं स्वरुप ? अभय दखणे - देवेन म्हणाला त्याप्रमाणं या क्षेत्रात प्रत्येकानं करून बघितलं पहिजे. म्हणजे मार्गदर्शन करणारी दिशा दर्शक अशीमाणसं मिळत नाहीत याबाबतीत मी फार सुदैवी आहे. माझ्या आजुबाजूला इतकी हुशार, चांगली माणसं होती की त्यांना जे काही करता आलं ते नाही ते त्यांनी माझ्यातलं ओळखून मला करायला प्रवृत्त केलं. माझ्यात काय आहे हे मला काही कळलं नव्हतं. पण त्यांनी मला ते डेअरिंग करायला लावून माझ्याकडून करून घेतलं. मग ते मला जसजसं जमायला लागलं तेव्हा त्यातली मजा मला कळुन आली. त्यामुळे मला काम करताना फारच मजा येते. आपण आता एका विशिष्ट प्रकारच्या डेडलाईनमध्ये लिहिणा-यांविषयी म्हणजे कर्मशिअल रायटिंगची आवड असणा-यांबद्दल बोलत आहोत. त्याविषयी काही विस्तारानं सांगाला का ? अभय दखणे - कॉपी रायटिंग किंवा कर्मशिअल रायटिंग हा कोणत्या शाळेत शिकवला जाणारा विषय नाहीये. काही ठिकाणी अकॅडमिकमध्ये ते शिकवलंही जातं. नियम शिकणं म्हणजे काही लिखाण नाही. लिखाण करताना काय करू नये यापेक्षा काय करावं, याला महत्त्व दिलं पाहिजे. मुर्खपणाला लिमिट नाही. हुशारीला लिमिट आहे. लोकांना काय समजेल कसं समजेल याचाविचार करून लिहायला शिकलं पाहिजे. म्हणजे उदाहरण घ्यायचं झालं तर पत्राचं घेऊ या. पत्र जेव्हा आपण मित्राला मित्राला लिहितो तेव्हा त्या पत्राचा टोन बदलतो. वडीलधा-या माणसांना लिहितो... तेव्हा पत्राचा ढाचा बदलतो. म्हणजेच काय तर लोकांना काय हवंय काय नकोय याचा विचार करून कॉपी रायटिंग करावं.

तुम्ही इंजिनिअरिंगकडून आर्टस्‌कडे आलात. इंग्रजी साहित्यातून एम.ए. केलेत. तर कॉपीरायटर म्हणून काम करणा-या माणसाची शैक्षणिक पार्श्वभूमी काय असते ? देवेन संसारे - मी थोडा नशीबवान होतो. कारण मला इंजिनिअरिंग झेपत नाहीये हे माझ्या फर्स्ट इयरच्या सुरुवातीलाच लक्षात आलं होतं. कॉपीरायटिंग, जाहिरात कंपनीमध्ये इंजिनिअर आणि सी.ए. असणा-यांचं प्रमाण भरपूर आहे. आलोक नंदा आणि फेडी वली हे भारतातले दोन टॉपचे कॉपीरायटर सी.ए. आहेत. आलोक नंदांची स्वत:ची इंडिया टुडे ही जाहिरात कंपनी आहे. इंडिया टुडे ही भारतातली नावाजलेली जाहिरात कंपनी आहे. भाषेचा खेळ करणं हे इंजिनिअरिंग, मेडिकल, सी.ए.पेक्षा सेफ करिअर आहे, असं समजलं जातं आहे. त्यामुळे चांगले उच्चशिक्षित लोकं कॉपीरायटिंगकडे वळत आहेत. लोकांच्या मनात कॉपी रायटिंग, कॉपी राइट याविषयी संभ्रम आहे. वृत्तपत्रांमध्ये एखादी बातमी किंवा लेख दिला जातो. जर ती बातमी किंवा लेख संपादकीय चौकटीत बसत नसते तेव्हा त्या बातमीवर संस्कार केले जातात. जरी संस्कार करणारी व्यक्ती ही संदकीय विगातली उपसंपादक असली तरी ती एक प्रकारे कॉपीचं रिरायटिंग करत असते. हे काम एकप्रकारे कॉपी रायटिंगचंच आहे. जाहिरात कंपनीत कॉपीरायटिंगचं काम करणा-या व्यक्तीला ऍड कॉपी रायटर म्हणतात. कॉपी रायटर हा लेखक नसतो.कारण त्याला मनाला वाटेल तसं लिहिता येत नाही. तर कॉपी रायटिंगमध्ये लिहिण्याचा एक विशिष्ट ढाचा ठरलेला आहे. कॉपी रायटिंगमध्ये शब्दांतून लिहिलेलं विकता यायला पाहिजे. दुस-याला वाचताना खिळवून ठेवणं असं आपण लिहायला हवं. भारतातली कॉपीरायटिंगची भाषा ही इंग्रजीतली आहे. याचा अर्थ कॉपी रायटिंगमध्ये टिकण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्त्व असणं आवश्यक आहे का ? देवेन संसारे - होय. हे दुदैर्वी सत्य आहे. बिझनेसच्या दृष्टीनं याही क्षेत्रात काही अलिखित नियम आहेत. इंग्रजीवर प्रभुत्त्व असायलाच हवं. कल्पना सुचणं आणि सुचलेल्या कल्पना लोकांना विकणं हा प्रवास कसा असतो ? अभय दखणे - क्रियेटिव्ह लिखाण करताना मनाजोगतं लिहिता येत नाही. काही गरजा पूर्ण करत हे लिखाण करावं लागतं. कल्पनांना, सर्जनशिलतेला शिस्त लावावी लागते. उद्या जर कोणी आलं आणि आयत्या वेळेला म्हणालं की मला विशिष्ट पद्धतीनं एखादी जाहिरात बनवून हवी आहे. तर तुम्हाला ती तेवढ्या वेळेत सुचायला हवी. मग त्यावेळेला मला मूड लागतो वगैरेसारख्या मुद्द्यांना थाराच नसतो. म्हणजे याचा अर्थ काय आणि कसा विचार केलात तर तुम्हाला इतर सगळ्या गोष्टी सुचतील. हे आहे. यापाठी थोडासा अभ्यास असतो. थोडासा विचार असतो. एकदा त्या प्रश्नांची नॅक कळली की, सगळं काही सहज जमतं. कॉपीरायटिंगमधलं करिअर हा मुक्त छंदातला प्रकार नाहीये. तर त्याला काही एक प्रकारची शिस्त असते... अभय दखणे - हो. आणि हे फक्त कॉपी रायटिंगलाच लागू पडत नाही तर प्रिंट मीडियात काम करतानाही तिथल्या लिखाणालाही एक प्रकारची शिस्त आहे. म्हणजे मानात आलं आणि लिहून मोकळं झालं असं काही नाहीये. पहिल्या वाक्यात लोकांना धरून कसं ठेवायचं, दुसरा मुद्दा कुठे मांडायचा याची काही नियम असतात. हे तंत्र अनेक प्रतिभावंतांनी वापरलं आहे. हे तंत्र वापरलं की कल्पना आपोआपच सुचायला लागतात. त्या शिवाय निरीक्षण लागतं ती वेगळी गोष्ट आहे. कॉपी रायटिंगमध्ये भाषेला महत्त्व द्यावं लागतं. तुम्ही कॉपी रायटिंगकडून मालिकांच्या आणि मालिकांकडून सिनेमाच्या लिखाणाकडे वळलात. तर ही माध्यमं वेगळी आहेत. या माध्यमांशी तुम्ही स्वत:ला कसं काय जुळवून घेतलंत ? अभय दखणे - एकदा मी मान्य केलं की मी कमर्शिअल आर्टिस्ट आहे आणि कोणी मला सुचवलं तर मला सुचू शकतं. आता सॅच्युरेशनच्या बाबतीत म्हणाल तर तो प्रश्न माझ्याबाबतीतही निर्माण झाला होता. सतत करून करून कुठंतरी साचलेपण आलं होतं. मलाही वाटायचं की आता लाइट लिखाण केलं पाहिजे. पण ती संधी मिळत नव्हती. ती संधी मला मालिका आणि सिनेमाच्या लिखाणातून मिळाली. त्यामुळे मला कधी कोणत्याही माध्यमांचा प्रश्न आला नाही. नव्या लेखकांना यातला स्ट्रगल खूप जास्त आहे का ? अभय दखणे - स्ट्रगल कोणत्या गोष्टीत नाहीये. तर स्ट्रगल सगळीेकडे आहे. आणि मला जर माझ्या आवडीच्या गोष्टीत स्ट्रगल करायला मिळत असेल तर स्ट्रगल स्ट्रगल वाटत नाही.

कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला किती महत्त्व असतं ? अभय दखणे - जर तुम्ही व्हिज्युअल मीडियात काम करत असाल तर कॉपी रायटिंगमध्ये शुद्ध लेखनाला महत्त्व नाहीये. आणि जर तुम्ही प्रिंट मीडियामध्ये काम करत असाल तर शुद्ध लेखनाला महत्त्व दिलं पाहिजे. शिवाय हस्ताक्षरही नीट वळणदार असलं पाहिजे. शुद्धलेखन आणि वळणदार हस्ताक्षरातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो. आणि व्हिज्युअल मीडियात शुद्ध लेखन लागत नाही म्हणून शुद्ध लेखन चांगलं नसलं पाहिजे असं काही नाहीये. शुद्ध लेखनातून माणसाचा प्रामाणिकपणा कळून येतो... देवेन संसारे - हो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे आणि ती म्हणजे चित्रात झालेली चूक ही कळून येत नाही. पण लिखाणात झालेली चूक कळून येते. कारण कोणता शब्द हा दीर्घ असतो, -हस्व असतो हे सगळ्यांना ठाऊक असतं. त्यामुळे शक्यतो कोणी शुद्ध लेखनातल्या चुका करू नये. अनेक मराठी मुलं कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात जातात. आणि जेव्हा ही मुलं लेखनाच्या प्रांतात जातात तेव्हा ते कॉपी रायटर म्हणून जातात. जाहिरातींचा एक भाषांतरकार म्हणून जाणं आणि कॉपी रायटर म्हणून जात भेद तो काय आहे ? देवेन संसारे - जाहिरात क्षेत्रातले बहुतेक कॉपी रायटर हे इंग्रजीभाषेतून लिहिणारे आहेत. काही हिंदी भाषेतूनही लिहितात. जर एखादा मराठीतून लिहिणारा असेल तर तो ट्रान्सलेटर म्हणून जातो. माझ्या ऑफिसमधलाच मी तुम्हाला एक किस्सा सांगतो. साधारण 1994 मध्ये मी ज्युनिअर कॉपीरायटर म्हणून लागलो होतो. मला जाहिरात क्षेत्रात येऊन दोन वर्षं पण झाली नव्हती. माझ्या मित्राचा मित्र माझ्याकडे आला. तो मला म्हणाला की मला ब्रोशर लिहायचं आहे. मी त्याला मी 5 हजार रुपये चार्ज सांगितला. मी त्यांना त्यापद्धतीनं मी त्यांना करून दिलं. मग ते म्हणाले की मला मराठीत भाषांतर करून हवंय. मी ते माझ्या सिनिअर कॉपी रायटर्सना सांगितलं. त्यांनी त्याचे 250 रुपये घेतले. म्हणजे कॉपी रायटिंगच्या क्षेत्रात प्रादेशिक भाषेत थोडसे कमी पैसे मिळतात. ' र ' ला ' ट ' जोडून कधीच प्रादेशिक भाषातलं भाषांतर करू नये. कॉपी रायटिंग आणि क्रियेटिव्ह रायटिंगचं प्रशिक्षण देणा-या संस्था - सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबई फोन : 022-22621366 वेबसाईट : xaviercomm.org नासीर मुन्शी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज वेबसाईट : www.nmims.edu डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन जर्नालिझम गोखले एज्युकेशन सोसायटी, नाशिक फोन : 9120-25654069/25673188 वेबसाईट : www.123careers.net सिम्बॉयसेस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट वेबसाईट : www.sibm.edu फोन : 020-39116000/39116007/39116007

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी

डिपार्टमेंट ऑफ जर्नालिझम औरंगाबाद फोन : 0240-2400333 वेबसाईट:www.bamu.net

नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीडिपार्टमेंट ऑफ जर्नलिझमउमवी नगर, जळगावफोन: 257-2258428 / 2258438 वेबसाईट:www.nmu.ac.in

शिवाजी युनिव्हर्सिटी, कोल्हापूरडिपार्टमेन्ट ऑफ जर्नालिझमफोन: 0231- 2609000वेबसाईट:www.unishivaji.ac.in राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी, नागपूर फोन : 0712-2522456, वेबसाईट : www.nagpuruniversity.org महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय, वर्धाफोन : 07152-230901, 230904, 230905, 230907वेबसाईट : www.hindivishwa.org करिअर लेखनातलं (भाग - 2) करिअर लेखनातलं (भाग - 3)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2009 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close